RTE 25 % Admission 2024-25 Update - जुन्याच नियमाप्रमाणे दि 17 मे 2024 पासून खाजगी शाळांसाठी प्रवेश पुन्हा ऑनलाइन प्रवेश अर्ज करता येणार (अर्ज करण्यासाठी ची लिंक)

राज्यातील ९,१३८ खाजगी शाळामधे 'आरटीई' प्रवेश प्रक्रिया 

शाळा, जागांचा तपशील जाहीर; शुक्रवारपासून नोंदणी


आरटीईअंतर्गत नवीन प्रवेश प्रक्रियेत शुक्रवारी (१७ मे) विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहे. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केली होती, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे. याची पालकांनी नोंद घ्यावी. - 

शरद गोसावी,

प्राथमिक शिक्षण संचालक


 शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) केलेल्या बदलास मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर शिक्षण विभागाने आरटीईची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ववत केली आहे. आरटीई संकेतस्थळावर जाहीर केलेल्या जिल्हानिहाय सुधारित शाळांची संख्या आणि प्रवेश क्षमतेनुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात राज्यातील ९ हजार १३८ खासगी शाळांमधील १ लाख २ हजार ४३४ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या शुक्रवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.


वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. त्यासाठीची शुल्क प्रतिपूर्ती शिक्षण विभागाकडून केली जाते. मात्र, शुल्क प्रतिपूर्ती वेळेत होत नसल्याने खासगी शाळा संचालकांचा आरटीई प्रवेशांना विरोध होता. तसेच शुल्क प्रतिपूर्तीची २,४०० कोटी रुपयांची रक्कम थकित आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने कायद्यात बदल करून शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या खासगी शाळा आरटीईतून वगळल्या होत्या. या निर्णयाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने राज्य शासनाच्या अधिसूचनेला स्थगिती दिली. त्यामुळे जुन्याच पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. शिक्षण विभागाने बदललेल्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यावर राज्यातील ७६ हजार ५३ शासकीय शाळांतील ८ लाख ८६ हजार ४११ जागांसाठी केवळ ६९ हजार ३६१ अर्ज दाखल झाले होते. मात्र उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी आरटीई संकेतस्थळात बदल करण्यात आले आहेत.


नोंदणी व प्रवेश अर्ज करण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे. 

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login


https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.