Letest Update सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना.

 प्राथमिक शिक्षण संचालनालय दिनांक : १६/०५/२०२४ रोजी च्या परिपत्रका नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना पुढील प्रमाणे. 


नोंदणी व प्रवेश अर्ज करण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे. 

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login


https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new



सन २०२४-२५ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२


(सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वंयअर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येत आहे.


शासन संदर्भ क्र.७ नुसार प्रवेशप्रकीयेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रीया शुक्रवार दिनांक १७.०५.२०२४ ते ३१.०५.२०२४ या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


यापूर्वी सन २०२४-२५ या वर्षाकरिता आरटीई २५ टकके प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रीया स्थगित करण्यात आलेली आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी ऑनलाईन पदधतीने केलेल्या अर्जाच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टकके प्रवेश प्रक्रीयेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी.


१. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना-


• बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल, वंचित, आर्थिक व सामाजिकदृष्टया मागास घटकांतील बालकांना स्वंयअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा


(स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये इयत्ता १ ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेकरिता पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रीया विहित मुदतीत पुर्ण करावी.


• वचित घटकातील बालकांमध्ये तपशील


खालील प्रवर्गाचा समावेश होतो.


१ अनुसूचित जाती


२ अनुसूचित जमाती


 इतर मागासवर्ग (ओबीसी)


 विशेष मागासवर्ग (एस.बी.सी)

विमुक्त जाती (अ)

भटक्या जमाती (ब)

आर्थिक व सामाजिकदष्टया मागास घटक

एच.आय.व्ही. बाधित किंवा एच. आय. व्ही. प्रभावित बालके

भटक्या जमाती (क)

अनाथ बालके दिव्यांग बालके

भटक्या जमाती (ड)


• आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो.


२५ टक्के प्रवेश प्रक्रीयेकरीता विचारपूर्वक १० शाळांची निवड करण्यात यावी.


• पालकानी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनव्दारे निवास्थनाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त पाच वेळाच निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे.


• प्रवेशप्रक्रीयेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी.


• अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही सबब, शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी.


• प्रवेशप्रक्रीयेबाबत आपणास काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करुन समस्येचे निराकरण करण्यात यावे.


• पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी. (उदा. घरचा पता, जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, जातप्रमाणपत्र इ.)


• ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पून्हा अर्ज करता येणार नाही.


यापूर्वी २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा, एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.

पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करु नयेत.


२. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत २५ टक्के प्रवेशप्रक्रीयेकरीता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.


• निवासी पुरावा २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्या करिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हींग लायसंन्स, वीज देयक, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टैक्स देयक, घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, व राष्ट्रियकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राहय धरण्यात येईल.


• २५ टक्के प्रवेशप्रक्रीयेकरीता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास भाडेकरार ग्राहय धरण्यात येईल. सदरचा भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनिवार्य आहे. भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक/पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. व प्रवेश मिळाला असल्यास तो रद्द करण्यात येईल.


• जन्म तारखेचा पुरावा ग्रामपंचायात / मनपा/ नपा यांचा दाखला/ रुग्णलयातील एएनएम रजिस्टर मधील दाखला / अंगणवाडी/बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला/आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राव्दारे केलेले स्वंयनिवेदन ग्राहय धरण्यात येईल.


• सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे / बालकांचे सादर करावयाचे कागदपत्र तहसिलदार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसूल आधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा (वडिलांचा/बालकांचा) जातीचा दाखला. परराज्यातील जातीचा दाखला प्रवेशप्रक्रीयकरिता ग्राहय धरण्यात येणार नाही.


• आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशाकरिता विदयार्थ्याच्या पालकाचा आर्थिक वर्ष २०२२-२३ किंवा २०२३-२४ या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसिलदारांचा दाखला. उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा दाखला (सैलरी स्लीप), कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राहय धरण्यात येईल.


• दिव्यांग मुलांसाठी वैदयकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हाशल्य चिकीत्सक वैदयकीय अधिक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे ४० टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र


• पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकल पालक (सिंगल पॅरेंट) (विधवा, घटस्फोटीत आई अथवा वडिल यापैकी कोणताही एक) पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राहय धरण्यात येईल.


• आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयवेळी विदयार्थी व पालक यांचे आधारकार्ड व आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणांमुळे बालक व पालक आधार कार्ड सादर करणे शक्य झाले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकांचे आधारकार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधिन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून ९० दिवसाच्या आत बालकांचे आधारकार्ड शाळेकडे सादर करणे बर्धनकारक राहील. बालकाच्या आधारकार्डची विहीत कालावधीत पुर्तता न झाल्यास आटीई २५ टक्के आंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येईल.


अनाथ बालके (वंचित घटक) आवश्यक कागदपत्रे अ) अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची / बालसुधारगृहाची कागदपत्र ग्राहय धरण्यात येतील. ब) जर बालक अनाथालयात राहत नसेत तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. क) अनाथ बालकाच्या संदर्भात इतर कागदपत्र उदा. वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही.


• एच.आय.व्ही. बाधित / प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे जिल्हा चिकित्स/वैदयकिय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रूग्णालय यांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील.


घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे १) न्यायालयाचा निर्णय २) घटस्फोटित महिलेचा/बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा ३) बालक वंचित गटात असल्यास बालकांचे किंवा त्यांचे वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.


• न्यायप्रविष्ठ असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला १) प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचा पुरावा २) घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ठ असलेल्या महिलेचा अथवा बालकांच्या आईच्या रहिवासी पुरावा ३) बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे किंवा त्यांचे वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटक असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.


• विधवा महिला- १. पतीचे मृत्यु प्रमाणपत्र २) विधवा महिलेचा/बालकाच्या आईच्या आईचा रहिवासी पुरावा. ३) बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे व त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा


दाखला इ. कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.


३. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिध्दी देऊन ऑनलाईन सोडत (लॉटरी) काढण्याकरिता दिनांक निश्चित केली जाईल. उक्त तारखेस ऑनलाईन पध्दतीने सोडत (लॉटरी) काढण्यात येईल. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्क्रीयेसाठी एकाच टप्यात लॉटरी काढली जाईल. तसेच शाळेत आरटीई अंतर्गत उपलब्ध जागांएवढी एक प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) तयार केली जाईल. लॉटरी लागलेल्या विदयार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल. या कालावधीमध्ये विदयार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर पहिल्या प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) मधील अनुक्रमे विदयार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज पाठविला जाईल. मगच प्रतिक्षा यादीतील विदयायिांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा. या कालावधीत विदयार्थ्यांनी प्रवेश घेऊन शळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर दुसऱ्या प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) मधील अनुक्रमे विदयार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज एनआयसीव्दारे पाठविला जाईल. मगच दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विदयाथ्यर्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहीत मुदतीत प्रवेश घ्यावा. अशा पदधतीने आरटीई


प्रवेशपात्र शाळांची प्रवेश क्षमता पूर्ण होईपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या प्रतिक्षा यादीतील विदयार्थ्यांना एन.आय.सी. कडून मेसेज पाठविले जातील.


४ . सोडत (लॉटरी) झाल्यांनतर पडताळणी समितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगीनला विदयार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील. विदयार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विदयार्थ्यांना प्रवेशासाठी बोलविले आहे त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत पडताळणी समितीने प्राप्त करुन घ्यावी. कागदपत्राची प्राथमिक तपासणी करुन योग्य असलयास विदयार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी तसेच पालकाकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व ती नोंद करुन पालकांना परत करावे तसेच पालकांकडून हमीपत्र भरुन घ्यावे. ५. काही पालक मुळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतर होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक आलेले नाही तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात याव्यात. बालकांना प्रवेश घेण्याकरिता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा.

६ . कागदपत्रे तपासणी करण्याकरिता राज्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात यावी. पडताळणी समितीची रचना खालीलप्रमाणे-


७. पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरीता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी. गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला प्रवेशाकरीता तीन संधी देऊनही पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत आरटीई पोर्टल वर Not Approch करावे. पडताळणी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.


८. पडताळणी समितीने सविस्तर माहिती सर्वांना दिसण्यासाठी पोर्टलवर भरावी व दिसते का याची खात्री करावी.


९. पडताळणी समितीने मागील वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी विचारात घेवून पडताळणी विषयक कामकाज वेळेत होईल या दृष्टीने नियोजन करावे. पडताळणी समितीने रहिवासी पत्ता, गुगल वरील पत्ता व वय याची पडताळणी सर्व पात्र विद्यार्थ्यांची करावी. सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता जात प्रमाणपत्राची तर आर्थिक दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता उत्पन्न प्रमाणपत्राची पडताळणी करावी. या दृष्टीने आवश्यक सुविधा गट शिक्षण अधिकारी स्तरावर करण्यात यावेत.


१०. समितीने संबंधित विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यांनतर सदर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सुविधा आर.टी.ई. पोर्टलवर करण्यात येत आहे. पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीचे पत्र घेवून शाळेत जातील. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार नाही. जे विद्यार्थी कागदपत्रे तपासणीमध्ये अपात्र होतील त्यांची निवड रद्द करण्यात यावी व अशा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे तक्रारीची दाद मागता येईल. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचा निर्णय मान्य नसल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे दाद मागता येईल व त्यांचा निर्णय अंतिम राहील. शासन निर्णय दिनांक २१.०४.२०१४ नुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्हा, तालुका व न.पा./म.न.पा. स्तरावर तक्रार निवारण केंद्र व मदत केंद्राची स्थापना करावी.

११. प्रतिक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही.

१२. पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा.

१३. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.

१४. सदरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून त्याची अंमलबजावणी करावी.


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक)

शिक्षण संचालनालय, पुणे १.


प्रत माहितीस्तव सविनय सादर १. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई. २.

मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे १.


संपूर्ण परिपत्रक Pdf Download

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.