Mahavachan Utchav Update - राज्यातील सर्व शाळांमध्ये 'महावाचन उत्सव' माहिती त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याबाबत MPSP चे निर्देश

 महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक यांनी दिनांक 15 मे 2019 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये 'महावाचन उत्सव' माहिती त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


महावाचन उत्सवाच्या कार्यवाहीबाबत दि. २२/११/२०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच दिनांक ०४/१२/२०२३ रोजी महावाचन उत्सव या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेला आहेत.


राज्यातील सर्व शाळांमध्ये "महावाचन उत्सव" हा उपक्रमांतर्गत विषय थिम राबविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यांचा समावेश करण्याबाबतची थिम सर्व जिल्हा व महानगरपालिकांमध्ये राबविण्याबाबत दिनांक १६/०१/२०२४ अवगत करण्यात आले होते. सदर पत्रामध्ये विद्यार्थ्यांनी पृष्ठाच्या शीर्षस्थानी विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, शाळेचे नाव आणि तालुका, जिल्हा याचा उल्लेख करुन शाळेच्या मुख्यापकांनी शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून एका पानांचे लेखन दि. ३१ जानेवारी १०२४ पर्यंत गट शिक्षणाणिकारी यांच्याकडे जमा करावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.


त्या अनुषंगाने सदर थिम जिल्ह्यात राबविताना जिल्ह्यातील एकूण शाळा संख्या, एकूण विद्यार्थी संख्या आणि सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्यांची माहिती भरण्याकरीता Google link देण्यात आली होती. या Google link मध्ये माहिती भरुन दि. ०८/०२/२०२४ पर्यंत पाठविण्याबाबत सूचना संदर्भीय पत्र क्र. ४ अन्वये देण्यात आल्या होत्या. त्या link मधील माहितीच्या अनुषंगाने जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमात सहभागी शाळा व सहभागी विद्यार्थी संख्या दर्शविणारी पाठविण्यात आली होती. या संदर्भात सर्व जिल्हयांमध्ये राबविण्यात आलेल्या महावाचन उत्सवाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण याबाबतच्या उपक्रमात सहभागी झालेल्या शाळांमधील सहभागी विद्यार्थ्यांनी केलेल्या लेखनाचे मूल्यमापन / तपासणी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई या संस्थेकडून करुन घेण्यात येणार आहे. याकरीता सर्व जिल्ह्यातील प्रत्येक ब्लॉकमधील, शाळांमधील विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या लेखनाच्या केलेल्या प्रती TISS या संस्थेला tissmahavachan@gmail.com या ईमेलवर दि. २० मे २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पडताळणीसाठी पाठवाव्यात. सदर प्रती पाठविण्याकरीता प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक (3-5 वर्ग), उच्च प्राथमिक (6-8 वर्ग), माध्यमिक (9, 10 वर्ग), उच्च माध्यमिक (11 आणि 12 वर्ग), भाषावार (मराठी, हिंदी आणि इंग्रजी) यानुसार विविध वर्गातील तसेच (सरकारी, अनुदानित आणि खाजगी) शाळेच्या प्रकारनुसार किमान 15 ते 20 नमुना पत्रके पाठवावीत. फाईल पाठविताना पुढील नामकरण पद्धतीचा वापर (ब्लॉकचे नाव-जिल्हा कोड-वर्ग-प्रकार (सरकारी/अनुदानित/खाजगी)- भाषा (मराठी/हिंदी/इंग्रजी-फाइल क्रमांक) उदा., नगर-एएच-3-जी-एम-एफ1; नगर-एएच-4-ए-ई-एफ2; नगर-एएच- 5-पी-एच-एफ3. पाठविण्यात यावी.


याबाबत काही अडचण असल्यास टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मधील खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात यावा.


1. श्रीमती. सरिता सीटी (टीआयएसएस प्रिन्सिपल इन्वेस्टिगेटर) मोबाईल 9833085358 (प्राथमिक)

2. श्रीमती. सुवर्णा गायकवाड (TISS वरिष्ठ Mgr.) मोबाईल 7400294765 (माध्यमिक)

तसेच खालील ड्राइव्हमध्ये महावाचन उत्सवाचे व्हिडिओ अपलोड करण्यात यावेत.


https://drive.google.com/drive/folders/11bseWGywXtZzkfC3b_YdvP9pgBUsPfiL?usp=drive_link


TISS यांच्याकडून तपासणी दरम्यान उपरोक्त नमूद प्रतिनिधी यांचा सर्व शिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकारी या डाटा पडताळणीसाठी फोन केला जाईल त्यामुळे सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे ऑनलाईन / व संकलीत केलेल्याची माहिती व सहभागाची संख्या याची एकत्रीत माहिती असणे आवश्यक आहे. तसेच सदर माहिती TISS या संस्थेस उपलब्ध करुन देण्याबाबत गट शिक्षणाधिकारी यांना आपल्यास्तरावरुन सूचना देण्यात याव्यात.


(प्रदीपकुमार डांगे भा.प्र.से.)

राज्य प्रकल्प संचालक,

म.प्रा.शि.प., मुंबई.


प्रत :- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स स्कूल ऑफ स्किल एज्युकेशन, कौशल्य केंद्र बिल्डिंग, पहिला मजला, न्यू कॅम्पस, देवनार फार्म रोड, मुंबई-4000 88.




वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.