इयत्ता पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत SCERT चे निर्देश.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे ने दि.२९/०२/२०२४ इयत्ता पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत शासन निर्णय दि. ०७ डिसेंबर २०२३ नुसार अंमलबजावणी करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम २०२३ (सुधारणा) अधिसूचनेनुसार इयत्ता ५ वी व ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन पद्धती २०२३-२४ पासून लागू करणेबाबत संदर्भ क्र. ७ नुसार निश्चित करणेत आलेली आहे. सदर शासन निर्णयानुसार अंमलबजावणी संदर्भात नियोजन करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने संदर्भ क्र. ७ मध्ये नमूद केल्यानुसार राज्य नियंत्रण समिती गठीत करणेत आलेली आहे. संदर्भ क्रमांक ८ अन्वये आपणास सनियंत्रण समितीच्या बैठकीचे इतिवृत्त मधील सूचना व संदर्भ क्र.७ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाहीची अंमलबजावणी करणेबाबत कळविण्यात आले होते. संदर्भ क्रमांक ८ अन्वये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांना इयत्ता ५ वी व ८ वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून पुरविण्यात येतील असेही कळविण्यात आले होते. तथापि संदर्भ क्र. ७ व ९ अन्वये शासन निर्णयानुसार सदर प्रश्नपत्रिका ह्या शाळास्तरावर तयार करणेत याव्यात असे नमूद केलेले असल्याने इयत्ता ५ वी व ८ वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करणेबाबत आपल्या अधिनिस्त सर्व शाळांना अवगत करावे. इयत्ता ५ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांचा अधिकचा सराव होणेकरिता परिषदेच्या वेबसाईटवर नमुना सराव प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते अपलोड केलेले आहेत. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी त्यांचे स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करणे तसेच संदर्भ क्र. ७ अन्वये शासन निर्णयानुसार इयत्ता ५ वी व ८ वी च्या वार्षिक परीक्षेबाबत कार्यवाही करणेबाबत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना अवगत करावे.


सोबत :- शासन निर्णय दिनांक ०७ डिसेंबर २०२४


 (राहूल रेखावार, भा.प्र.से.)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.