मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत विद्यार्थी सेल्फी अपलोड लिंक फ्लो चार्ट/युजर मॅन्युअल शिक्षण आयुक्तांच्या सूचना आदेश

 राज्यामध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या उपक्रमातंर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील १ लाख १ हजार शाळांनी आजामितीस सहभाग नोंदविला असून शाळा, विदयार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानातंर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील २ कोटी ११ लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा.मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून राज्यातील सर्व विदयार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाचा प्रारंभ केला आहे.


राज्य शासनाने या अभियानांतर्गत 

www.mahacmletter.in 

हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर पुढीलप्रमाणे सहभाग विदयार्थ्यांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

१. शैक्षणिक घोषवाक्य: अभियानाचा एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे विदयार्थ्यांच्या स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करणे.

२. मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी यांची सेल्फी: विदयार्थ्यांचे पालकांसमवेत मा. मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्रांचा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करणे.

या दोन स्वतंत्र उपक्रमामधील सहभागी विदयार्थ्यांमधून प्रत्येक जिल्हयातून प्रथम क्रमांकावरील पात्र विदयार्थ्याला रोख बक्षीस त्याला आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक यांना मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे.

३. वाचन प्रतिज्ञा : प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृध्दींगत होण्यासाठी 'वाचन सवय प्रतिज्ञा' मुलांनी घ्यावयाची आहे. त्यामुळे प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल तसेच विदयार्थ्यांकरीता उपरोक्त नमूद संकेतस्थळावर विदयार्थ्यांनी ऑनलाईन प्रतिज्ञा घ्यावयाची आहे.,, 

याकरीता www.mahacmletter.in या संकेतस्थळावर या दोन उपक्रमांपैकी एक उपक्रमाचा व्हिडीओ अपलोड करावयाचा आहे. त्याकरीता या सोबत जोडलेल्या मॅन्युअल/फ्लोचार्ट प्रमाणे शाळास्तरापर्यंत सर्व विदयार्थ्यांना सूचना पोहच होतील याची दक्षता घेण्यात यावी. वरील एक ते तीन वरील उपक्रम संकेतस्थळावर दि. १७/०२/२०२४ ते दि.२५/०२/२०२४ या कालावधीमध्ये अपलोड करावयाचे आहेत. त्याप्रमाणे सोबत जोडलेला फ्लोचार्टनुसार अंतिम दिनांकापूर्वी उपक्रमाची माहिती अपलोड करण्याच्या सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.


प्रत माहिती व पुढील कार्यवाहीसाठी,


(सूरज मांढरे, भा.प्र.से.)

आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे. 


सेल्फी अपलोड कशी करावी युजर मॅन्युअल पीडीएफ डाउनलोड. 

Download


Link. 

www.mahacmletter.in





विदयार्थी मित्रांनो 


महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बालकास शिक्षण गुणवत्तापूर्ण देण्यास राज्य शासन महत्वकांशी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे.  आजचे व उद्याचे सक्षम नागरिक म्हणून जीवन जगण्यास आपणास विविध प्रकारच्या ज्ञानाची गरज असते.  वाचन संस्कृतीचा विकास व्हावा. याकरीता आपणाकरीता शिक्षणविषयक घोषवाक्य व सेल्फी चा उपक्रम हाती घेतला आहे. आणि वाचन प्रतिज्ञाचा जागतिक विक्रम करण्याच्या पायरीवर आपण आहोत. 

आपण सर्वांनी सोबत च्या लिंकवर जाऊन आपला सहभाग नोंदविण्यास राज्य शासनाच्या वतीने आपणास अहवान करण्यात येत आहे. 

https://mahacmletter.in/


सोबत युझर मॅन्युअल व कार्यालयीन आदेश आणि फ्लो चार्ट जोडला आहे अवलोकन व्हावे


शालेय शिक्षण विभाग

महाराष्ट्र राज्य



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

6 Comments

  1. सर...मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत मुख्यमंत्र्याचे संदेश पत्र असेल तर कृपया शेअर करा.....

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.