विनाअनुमती मुख्यालयात गैरहजर राहणाऱ्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 29 जुलै 2026 रोजी पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे
विनाअनुमती मुख्यालयात गैरहजर राहणाऱ्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत...
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशास विभाग
शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२६/प्र.क्र.२७१/मासैक
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : २९ जुलै, २०२६
परिपत्रक
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम ३ मध्ये प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने नेहमीच कर्तव्यपरायणता ठेवावी आणि शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय ठरेल अशी कोणतीही गोष्ट करता कामा नये, असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ मधील नियम ३४ अन्वये, कोणत्याही प्रकरणी अन्यथा स्पष्टपणे तरतूद केली नसेल तर, शासकीय कर्मचाऱ्याचा संपूर्ण वेळ शासनाच्या सेवेसाठी असतो. कार्यालयात/मुख्यालयात अनुपस्थित राहण्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे.
२. तथापि, सैनिक कल्याण विभाग व अधिनस्त कार्यालये सेवापूर्व शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर / नाशिक या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्याबाबतीत पुढीलप्रमाणे बाबी निदर्शनास आलेल्या आहेत-
अ) कार्यालयीन दिवशी विहित वेळेत कार्यालयात उपस्थित नसतात.
आ) अनुपस्थितीबाबत किंवा कार्यालयात उशिरा येण्याबाबत वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतली जात नाही.
इ) सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता विनाअनुमती मुख्यालय सोडून जातात.
कार्यालयीन शिस्त पालन आणि कार्यक्षम प्रशासनाच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे.
३. कार्यालयीन शिस्तीचे काटेकोर पालन करण्याकरिता आणि अशा गैरवर्तणुकीला आळा घालण्याकरिता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत :-
१) कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्याने सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय रजेवर जावू नये.
२) कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्याने कर्तव्य कालावधीत व रजा कालावधीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये.
३) सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणे किंवा रजा मंजूर नसताना गैरहजर राहणे ही बाब 'अनधिकृत गैरहजेरी' मानली जाईल. अशा गैरहजेरीच्या कालावधीसाठी रजा वेतन देय असणार नाही आणि संबंधित महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ नियम ४८ नुसार शिस्तभंगविषयक कार्यवाहीस पात्र राहील.
४) विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व कार्यालयातील विनाअनुमती अनुपस्थित राहणाऱ्या / विनाअनुमती मुख्यालय सोडून जाणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून ती संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांना कळवावी. अशी माहिती प्राप्त होताच संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना प्रथम सक्त सूचना देण्यात याव्यात.
५) अधिकारी/कर्मचारी वारंवार विनाअनुमती कार्यालयात गैरहजर राहिल्यास / विनाअनुमती मुख्यालय सोडून गेल्यास अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबन / शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याकरिता त्यांची नावे संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांना कळवावीत.
६) नियुक्ती अधिकाऱ्यांनी अशी नावे प्राप्त झाल्यापासून अथवा अशा गैरवर्तणुकीच्या बाबी अन्य प्रकारे त्यांच्या निदर्शनास आल्यापासून १ महिन्याच्या आत कसूरदार अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही सुरू करावी व तसा अहवाल शासनास सादर करावा.
४. संचालक, सैनिक कल्याण विभाग व संचालक, सेवा पुर्व शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर / नाशिक यांना सुचित करण्यात येते की, या सूचना त्यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणाव्यात.
५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२६०७२९१५४६४८०५०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Digitally signed by GANESH NIVRUTTI PAWAR Date: 2026.07.29 15:47:39 +05'30'
(गणेश पवार)
उपसचिव, महाराष्ट्र शासन
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 टिप्पण्या