राज्यातील शिक्षक संवर्गातील पदोन्नती प्रक्रिया तूर्तास स्थगित आदेश ०५/०८/२०२६

शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी शिक्षक संवर्गातील पदोन्नती संदर्भात पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे. 

जा.क्र.प्राशिसं/टे-३०१/२०२६

दिनांक- ५/८/२०२६

प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सर्व

विषय- मा. उच्च न्यायालय मुंबई, खडपीठ नागपूर येथे दाखल रिट याचिका क्र ५९४३/२०२६ च्या अनुषंगाने कार्यवाही करणेबाबत

संदर्भ-१. शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-२०२६/प्र.क्र.२४४/टीएनटी-१/दि.२९/७/२०२६

२. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचे पत्र क्र प्राशिसं/ड-३०१/शिक्षक संवर्ग पदोन्नती/२०२६/दि.१४/५/२०२६

३. रिट याचिका क्र.४५७४/२०२६ या प्रकरणी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी पारित केलेला दि.१०/७/२०२६ रोजीचा न्यायनिर्णय

४. संवालनालयाचे पत्र क्र.१/२०१४५७१/२०२६/दि.१०/७/२०२६

५. संचालनालयाचे पत्र क्र. १/२०५२७३५/दि.३०/७/२०२६

विषयांकित प्रकरणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दि.२९/७/२०२६ मध्ये जिल्हा परिषद आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठीची कालबध्द कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. त्यानुसार संचालनालयाचे संदर्भ क्र.५/१/२०५२७३५/दि.३०/७/२०२६ रोजीच्या पत्रान्वये आपणांस कार्यवाही करणेबाबत कळविण्यात आलेले होते.

परंतु शालेय शिक्षण विभागाच्या दि.२९/७/२०२६ रोजीच्या शासन निर्णयाला मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल रिट याचिका क्र. ५९४३/२०२६ अन्वये आव्हान देण्यात आले असून मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने २९-७-२०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयातील खड ४(अ) च्या अमलबजावणीस स्थगिती देण्यात आलेली आहे.

त्यामुळे सन २०२६ च्या माहे ऑगस्ट मधील (शासन निर्णयातील ४ अ नुसार) चालू वर्षी करावयाच्या पदोन्न्तीबाबतची कार्यवाही शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत.


Digitally signed by Sharad Shankargiri Gosavi Date: 05-08-2026 18:49:44

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक)

महाराष्ट्र राज्य पुणे-१


प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तव

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व

प्रत माहितीस्तव सविनय सादर-

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुबई-३२

२. मा. आयुक्त (शिक्षण), आयुक्त शिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे


जिल्हा परिषद आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठीची कालबध्द कार्यपध्दती विहित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 29 जुलै 2026 रोजी पुढील प्रमाणे शासनादेश निर्गमित केला आहे. 


जिल्हा परिषद आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठीची कालबध्द कार्यपध्दती विहित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- २०२६/प्र.क्र. २४४/टीएनटी-१

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक : २९ जुलै, २०२६.


संदर्भ :

१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, एसआरव्ही-२०१८/प्र.क्र. १५९/कार्यासन-१२, दि. ०१.०८.२०१९.

२) शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचे पत्र क्र. प्राशिसं/ड-३०१/शिक्षक संवर्ग पदोन्नती / २०२६, दि. १४.०५.२०२६.

३) रिट याचिका क्र. ४५७४/२०२६ या प्रकरणी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी पारीत केलेला दि. १०.०७.२०२६ रोजीचा न्यायनिर्णय.

प्रस्तावना :

जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक इत्यादीं पदांवर त्या-त्या पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार पदोन्नती देण्यात येते. सदर पदोन्नती ज्येष्ठता-नि-पात्रता या आधारावर दिली जाते. मा. सर्वोच्च न्यायालयाने अंजूमन ईशात-ए-तालिम ट्रस्ट विरुध्द महाराष्ट्र शासन या प्रकरणात दि.०१.०९.२०२५ रोजी पारीत केलेल्या न्यायनिर्णयानुसार टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण होणे ही पदोन्नतीसाठीची आवश्यक पात्रता ठरविली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये प्रत्येक वर्षाचा दि. ०१ सप्टेंबर हा पदोन्नती प्रक्रिया सुरु होण्याचा दिनांक ठरविण्यात आला आहे. या आधारावर संदर्भ क्र. २ अन्वये पदोन्नती संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. संदर्भ क्र. २ येथील दि. १४.०५.२०२६ रोजीच्या पत्रास मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका क्र. ४५७४/२०२६ अन्वये आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणांचा न्यायनिर्णय दि. १०.०७.२०२६ रोजी पारीत झाला असून त्याद्वारे संदर्भक्र. २ येथील दि. १४.०५.२०२६ रोजीचे पत्र रद्दबातल ठरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यात पदोन्नती प्रक्रियेत एकसुत्रता असावी, जेणेकरुन विद्यार्थी हित व शिक्षकांना दिलासा मिळेल या दृष्टीने कार्यवाही करण्यासंदर्भात शासनास निर्देश देण्यात आले आहेत. सदर निर्देशांची अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :

संदर्भ क्र. २ येथील दि. १४.०५.२०२६ रोजीचे पत्र दि. १०.०७.२०२६ रोजीपासून रद्दबातल ठरविण्यात येत आहे.

२. जे शिक्षक TET/CTET उत्तीर्ण असणे या अर्हतेबरोबरच सेवाप्रवेश नियमानुसार आवश्यक असणारा अनुभव व अन्य अर्हता धारण करीत आहेत, त्यांचा समावेश पदोन्नतीसाठीच्या विचारक्षेत्रात करण्यात यावा.

३. दि. १०.०७.२०२६ पूर्वी ज्या जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशा पदोन्नत्यांना संरक्षण देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पदोन्नती आदेश निर्गमित झाले आहेत, त्या ठिकाणची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजण्यात येईल.

३. पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशा पदोन्नत्यांना संरक्षण प्रदान करण्यात आले असले तरी जे शिक्षक अन्यथा पदोन्नतीसाठी पात्र ठरले असते, मात्र दि. १४.०५.२०२६ रोजीच्या शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या पत्रामुळे अपात्र ठरले, असे शिक्षक यानंतर पदोन्नत झाल्यास पदोन्नतीच्या संवर्गातील त्यांची सेवाज्येष्ठता ही निम्न संवर्गातील परस्पर ज्येष्ठतेच्या आधारे निश्चित करण्यात यावी.

४. पदोन्नती प्रक्रियेत संपूर्ण राज्यात एकसुत्रता असावी यासाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दती निश्चित करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

अ) या चालू वर्षी करावयाच्या पदोन्नतीबाबत-

1. माहे ऑगस्ट २०२६ च्या पहिल्या आठवडयात पदोन्नती समितीची बैठक घेण्यात यावी.

॥. पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास विचार क्षेत्रातील उमेदवारांचा सेवा कालावधी व TET/CTET सह अन्य अर्हता विचारात घेण्यात यावी.

पात्र उमेदवारांची पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात यावी.

IV. संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर व कोणत्याही परिस्थितीत दि.३१.०८.२०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यानंतरच पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजण्यात येईल.

ब) पुढील वर्षी पासून करावयाच्या पदोन्नतीबाबत-

1. प्रत्येक वर्षाच्या दि. ०१ जानेवारी रोजी आवश्यकता असल्यास तात्पूरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात यावी. यासंदर्भात आलेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन अंतिम सेवाज्येष्ठता यादी दि. ३१ जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात यावी.

॥. तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्याची आवश्यकता नसल्यास दि. ०१ जानेवारी रोजी अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात यावी.

।।।. दि. १५ फेब्रुवारी ते दि. २२ फेब्रुवारी या कालावधीत पदोन्नती समितीची बैठक आयोजित करण्यात यावी. बैठकीच्या दिनांकास विचार क्षेत्रातील उमेदवारांचा सेवा कालावधी व TET/CTET सह अन्य अर्हता विचारात घेण्यात यावी.

IV. पात्र उमेदवारांची शिफारस करण्याची कार्यवाही पुढील एक आठवडयात करण्यात यावी.

V. दि. ३१ मार्च पर्यंत पदोन्नतीचे आदेश निर्गमित करुन पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.

VI. दि. ३१ मार्च पर्यंत पदोन्नती आदेश निर्गमित करण्यात आले तरी पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये. असे शिक्षक दि. ०२ मे रोजी पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होतील या दृष्टीने त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे.

५. उपरोक्त प्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करणे सर्व जिल्हा परिषदांसाठी अनिवार्य असेल. या कार्यपध्दतीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांची असेल. अशा प्रकारे कार्यवाही करताना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

६. सदर आदेश संदर्भ क्र. ३ येथील न्यायनिर्णयान्वये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तसेच ग्राम विकास विभागाचे अनौपचारीक संदर्भ क्र. ०१/२०२६/आस्था-१४, दि.२८.०७.२०२६ अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०७२९१९१०२२२६४९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


Digitally signed by ABASAHEB ATMARAM KAWALE Date: 2026.07.29 19:11:10 +05'30'

(आबासाहेब कवळे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई.

२) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

३) मा. उप मुख्यमंत्री (नगर विकास / राज्य उत्पादन शुल्क) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

४) मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

५) मा. उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

६) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई

७) मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

८) मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

९) मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

१०) मा. राज्यमंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

११) मा. विधानसभा/विधानपरिषद सदस्य (सर्व)

१२) सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

१३) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

१४) शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक/योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे

१५) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक

१६) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

१७) सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक/योजना)

१८) सर्व गट शिक्षणाधिकारी

१९) निवड नस्ती - टीएनटी-१

संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा

Download

विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 10 जुलै 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहे.

जा.क्र.प्राशिसं/टे-३०१/२०२६

दिनांक- १०/०७/२०२६

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व जिल्हे

विषय :- विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत.

संदर्भ :- १. या कार्यालयाचे पत्र प्राशिसं/ड-३०१/शिक्षक संवर्ग पदोन्नती/२०२६ दि १४/०५/२०२६

२. मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्र. ४५७४/२०२६ मधील निर्णय दि.१०/०७/२०२६

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संचालनालयाचे पत्र दिनांक १४/०५/२०२६ नुसार विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे बाबत निर्देश या कार्यालयामार्फत देण्यात आले होते.

तथापि मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक ४५७४/२०२६ मधील निर्णय दि.१०/०७/२०२६ नुसार मा. न्यायालयाने संचालनालयाचे पत्र प्राशिसं/ड-३०१/शिक्षक संवर्ग पदोन्नती/२०२६ दि.१४/०५/२०२६ रद्द केले आहे. तरी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत पुढील शासन निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये.

Digitally signed by Sharad Shankargiri Gosavi Date: 10-07-2026 19:41:00


(शरद गोसावी)

 शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१


प्रत माहितीस्तव सविनय सादर-

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई-३२

२. मा.आयुक्त (शिक्षण), आयुक्त शिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे



विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 14 मे 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.


प्राशिसं/ड-३०१/शिक्षक संवर्ग पदोन्नती/२०२६

दि. 14.05.2026

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व जिल्हे

विषय :- विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत.

संदर्भ : १. मा. उच्च न्यालालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक २७८५/२०२६,२७३७/२०२६ मधील निर्णय दिनांक २९/०४/२०२६

२. मा. उच्च न्यालालय मुंबई येथील याचिका क्रमांक ६३९१/२०२६ मधील आदेश दिनांक ०६/०५/२०२६

३. मा. उच्च न्यालालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक २६०६/२०२६ मधील आदेश दिनांक २५/०३/२०२६

४. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक दिनांक ०८/०५/२०२६

मा. सर्वोच्च न्यायालयाने अंजुमन-इशात-ए-तालीम या प्रकरणी शिक्षकांना पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET-MAHATET/CTET) उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. याबाबत राज्यातील शिक्षकांकडून मा. उच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये विविध न्यायनिवाडयामध्ये देखील शिक्षक पात्रता परीक्षा (TET-MAHATET/CTET) उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. (मा. उच्च न्यायालयातील याचिकेतील आदेशाच्या प्रती सोबत जोडल्या आहेत.)

यास्तव शिक्षकाची विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक या पदावर पदोन्नती करताना सेवाज्येष्टतेनुसार शिक्षक पात्रता परीक्षा (TET-MAHATET/CTET) उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांचा पदोन्नतीसाठी विचारात घेण्यात यावे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या विविध पदावरील पदोन्नतीची कार्यवाही सूरू आहे. पदोन्नती करताना सेवा जेष्ठता-नि-गुणवत्ता आधारे पदोन्नती करण्यात येते परंतू शिक्षकांना पुढील पदावर पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा (TET-MAHATET/CTET) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, त्यामुळे पदोन्नतीसाठी जेष्ठतेसह ही पात्रता देखील तपासणे आवश्यक आहे.

सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक ०१/०९/२०१९ अन्वये पदोन्नतीसाठीच्या तरतूदी नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्यातील ५.१.३ मध्ये निम्न संवर्गातील किमान सेवेची गणना करण्याची तरतूद देण्यात आलेली आहे, त्यानुसार प्रतिवर्षी निवड सूची वर्षाच्या (सध्या २०२५-२६ निवडसूची वर्ष पहिल्या तारखेस म्हणजेच दिनांक १ सप्टेंबर या तारखेस (म्हणजेच दिनांक ०१/०९/२०२५ रोजीची विचार क्षेत्रातील कर्मचारी यांची निम्न पदावरील किमान सेवा तसेच पदोन्नतीसाठीची इतर आवश्यक अर्हता पूर्ण झाली पाहिजे अशी तरतूद आहे.

तसेच दिनांक ०१/०९/२०२५ रोजी अर्हता धारक कर्मचारी विचारात घेतल्यानंतर पदोन्नतीची पदे रिक्त रहात असल्यास पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास निम्न पदावरील किमान सेवेची अट पूर्ण करणाऱ्या व पदोन्नतीसाठीची इतर आवश्यक अर्हता पूर्ण करणाऱ्या कर्मचारी यांचा विचार करण्याबाबत तरतूद आहे.

उक्त शासन निर्णयातील ५.२ मध्ये सेवाज्येष्ठता सूचीबाबत तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार ज्या पदावर पदोन्नती द्यावयाची आहे त्या पदाच्या निम्नस्तरीय पदाची निवडसूची वर्षाच्या (सन २०२५-२६ निवडसूचीसाठी) लगतच्या वर्षाची (म्हणजेच दिनांक ०१/०१/२०२५ रोजीची) अंतिम ज्येष्ठतासूची तयार करावी अशा तरतूद आहेत.

यावरून हे स्पष्ट होते की, सध्या निवड सूची वर्ष २०२५-२६ सुरु असून त्यासाठी ०१/०९/२०२५ रोजीची पात्रता विचारात घ्यावी लागेल व त्यासाठी दिनांक ०१/०१/२०२५ रोजीच्या ज्येष्ठता सूचीच्या आधारे पदोन्नतीची कार्यवाही करावी लागणार आहे. तसेच पदोन्नतीसाठी पदे शिल्लक रहात असल्यास पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास अर्हता धारण करणारे कर्मचारी यांना विचारात घेवून रिक्त राहणाऱ्या पदांवर पदोन्नतीची कार्यवाही करता येईल अथवा पुढील वर्षाच्या निवड सुचीनुसार पदोन्नतीची कार्यवाही करता येईल.

वरील प्रमाणे शिक्षकांच्या विविध पदावरील पदोन्नतीची कार्यवाही करताना उतरत्या क्रमाने शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक याप्रमाणे केल्यास त्या त्या गटातील पदे रिक्त होवून जास्तीत जास्त पदोन्नतीसाठी उमेदवार उपलब्ध होवून पदोन्नतीची रिक्त पदे भरली जातील व पदोन्नतीची कार्यवाही करता येईल. सदर पदोन्नतीची कार्यवाही वेळेत पूर्ण झाल्यास खालची शिक्षकांची पदे रिक्त होतील त्यामुळे रिक्त होणारी पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक या सारखी अध्यापकीय पदे पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीची कार्यवाही पूर्ण करता येईल.

काही जिल्हा परिषदामधील पदोन्नतीबाबत मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यामध्ये वेळीच शपथपत्र दाखल करून याचिका निकाली काढून त्यानुसार पदोन्नतीची कार्यवाही करता येईल. याबाबत शासकिय विधिज्ञ/जिल्हा परिषदांचे वकील यांचेशी संपर्क साधून तात्काळ कार्यवाही करावी.

वरील बाबी विचारात घेवून शिक्षकांच्या पदोन्नतीची कार्यवाही मा. न्यायालयाचे आदेश व प्रचलित तरतूदी विचारात घेवून पदोन्नतीची कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी संचालनालयास अहवाल सादर करण्यात यावा.


Digitally signed by SHARAD SHANKAR SHARAD SHANKARGIRI Date: 14-05-2026 17:01:48 IRI GOSAVI 

(शरद गोसावी.)

शिक्षण संचालक, 

प्राथमिक शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे-१

प्रतिलिपी :

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ यांना माहितीस्तव सविनय सादर

२. मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर



पदवीधर प्राथमिक शिक्षकास, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर वेतन निश्चिती बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे. 

जा.क्र.जिपला/शिक्षण (प्रा)/कार्या-09/कावि- 98/2026 शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, लातूर

दिनांक : 17.04.2026

शुध्दीपत्रक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक जिपअ-2021/प्रा.क्र. 142/आस्था-4 दि. 26 सप्टेंबर 2023 नुसार सदर्भ क्रमांक 05 अन्वये जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, प्राथमिक पदवीधर मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्या आदेशातील अट क्र.3 मध्ये प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक पदोन्नतीपुर्वीच पदोन्नतीच्या पदाच्या वेतनश्रेणीत किंवा वरिष्ठ वेतनश्रेणीत वेतन आहरण करीत असेल तरीही पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्याच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये निश्चितपणे वाढ होत असल्याने त्यांची एक वेतनवाढ देवून वेतननिषिती करण्यात यावी."

याऐवजी

पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक पदाचे व केंद्रप्रमुख पदाचे उपरोक्त नमूद कामकाज लक्षात घेता पदवीधर प्राथमिक शिक्षकास, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्याच्या कर्तव्य व जबाबदा-यांमध्ये निश्चितपणे वाढ होते. त्यामुळे पदवीधर प्राथमिक शिक्षकास, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर, पदोन्नती स्विकारल्यानंतरचे वेतन निश्चिती करताना, महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम 1981 मधील नियम 11 (1) तरतुदीनुसार एक वेतनवाढ देवून त्याची वेतन निश्चिती करण्यात यावी." असे वाचावे व सदर आदेशाची संबधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी.


PS

 (राहुल कुमार मीना, भा.प्र.से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर.


प्रतिलीपी माहितीस्तव व योग्य त्या कार्यवाहीस्तव ०:-

1) मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद लातूर.

2) गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती, सर्व संबधित जि.लातूर

3) मुख्याध्यापक, जि.प. प्रशाला / कै.प्रा.शा./प्रा.शा. सर्व संबंधित.


4) संबंधितास (कार्यालय प्रमुखामार्फत)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा




जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत ग्रामविकास विभागाने दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ दिल्यास येणा-या आर्थिक भाराबाबतची माहिती विहीत प्रपत्रात मागविण्यात आली आहे. तथापि, आपल्या कार्यालयाची माहिती स्मरणपत्र पाठवून देखील अद्यापपर्यंत अप्राप्त आहे.

२. सदर प्रकरणी नमूद करण्यात येते की, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीची वेतनवाढ ही पदोन्नतीच्या दिनांकापासून देय करण्याबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्र.११४५२/२०२४ दाखल केली आहे. पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्याच्या अनुषंगाने शासनावर येणा-या आर्थिक भाराबाबतची माहिती अप्राप्त असल्याने प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यास विलंब होत आहे.

३. तरी पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम ११ (१) (अ) अन्वये पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्यात आली असल्यास तसा अहवाल सादर करावा अन्यथा आर्थिक भाराबाबतची माहिती विहीत विवरणपत्रामध्ये शुक्रवार दि.२९.११.२०२४ पर्यंत शासनास तात्काळ सादर करावी, ही विनंती.


(दिपाली पवार) 

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन


प्रत,

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (ठाणे, रायगड, सातारा, सांगली, पुणे, धुळे, नंदूरबार, उस्मानाबाद, जालना, नांदेड, लातूर, परभणी, बीड, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला)

२) निवडनस्ती (आस्था-४)




महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 9 October 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

संदर्भ :- शासनाचे समक्रमांक दि.२०.०३.२०२४ चे पत्र व दि.१४.०५.२०२४ चे स्मरणपत्र

महोदय, उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ दिल्यास येणा-या आर्थिक भाराबाबतची माहिती विहीत प्रपत्रात मागविण्यात आली आहे. तथापि, आपल्या कार्यालयाची माहिती स्मरणपत्र पाठवून देखील अद्यापपर्यंत अप्राप्त आहे.

२. सदर प्रकरणी नमूद करण्यात येते की, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीची वेतनवाढ ही पदोन्नतीच्या दिनांकापासून देय आहे अगर दि.२६. सप्टेंबर, २०२३ च्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून देय आहे, याबाबत अनेक जिल्हा परिषदांकडून मार्गदर्शनाकरीता पत्रव्यवहार प्राप्त होत आहे. त्यानुषंगाने सदरहू पदांना पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्याच्या अनुषंगाने त्याकरीता शासनावर येणा-या आर्थिक भाराबाबतची माहिती आवश्यक आहे. सदरहू माहिती आपल्या कार्यालयाकडून विहीत कालावधीत प्राप्त होत नसल्याने प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यास विलंब होत आहे.

३. तथापि, ब-याच जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम ११ (१) (अ) अन्वये पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देण्यात येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास येत आहे. तरी ज्या जिल्हा परिषद कार्यालयांकडून यापूर्वीच वेतनवाढ लागू केली असल्यास तसा अहवाल सादर करावा अन्यथा आर्थिक भाराबाबतची माहिती विहीत विवरणपत्रामध्ये तात्काळ शुक्रवार दि.१८.१०.२०२४ पर्यंत शासनास सादर करावी, ही विनंती.


आपली, 

 (दिपाली पवार)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन


प्रत,

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व)

२) निवडनस्ती (आस्था-४)






 महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 14 मे 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


स्मरणपत्र-१


दिनांक:-१४.०५.२०२४


प्रति,


मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व) (पालघर, रत्नागिरी, गडचिरोली, अहमदनगर, कोल्हापूर व सोलापूर वगळून)


विषय :- जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत.


संदर्भ :- शासनाचे समक्रमांक दि.२०.०३.२०२४ चे पत्र


महोदय,


उपरोक्त विषयांकीत प्रकरणी संदर्भाधीन पत्रान्वये मागविलेली आपल्या कार्यालयाची माहिती अद्याप अप्राप्त आहे. तरी सदरहू माहिती संदर्भाधीन पत्रात नमूद केलेल्या विहीत विवरणपत्रामध्ये तात्काळ शासनास सादर करावी, ही विनंती.


आपली

(दिपाली पवार)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.