जिल्हा परिषद शाळा परिसर स्वच्छता व स्वच्छता गृहांबाबत ग्राम विकास विभाग आदेश

 जिल्हा परिषद शाळा परिसर स्वच्छता व स्वच्छता गृहांबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक चार मार्च 2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

क्रमांकः बैठक-२०२५/प्र.क्र.३१/१०५९४३१/आस्था-१५

दिनांक : ०४ मार्च, २०२६.

प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

विषय : जिल्हा परिषद शाळा परिसर स्वच्छता व स्वच्छता गृहांबाबत.

महोदया / महोदय,

शालेय शिक्षण विभांगातर्गत शाळांच्या सुविधाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे (VC) बैठक शुक्रवार, दि.२१ मार्च, २०२५ रोजी मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या आवाराची व स्वच्छता गृहांची स्वच्छता करण्यासाठी विशिष्ट कर्मचारी नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत याबाबत जबाबदारी स्विकारल्यास स्वच्छता ठेवणे शक्य होईल, असे मत मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांनी मांडले होते.

२. त्याअनुषंगाने मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) यांनी ५००० व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधील जिल्हा परिषदेच्या शाळामधील स्वच्छतागृहाची स्वच्छता ग्रामपंचयात कर्मचारी यांनी करावी असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार आपल्या स्तरावरुन उचित कार्यवाही करण्यात यावी.

आपला,

(कौस्तुभ राणे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत माहितीसाठी :

१. मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) यांचे खाजगी सचिव.

२. प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे स्वीय सहायक.

३. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी ही जबाबदारी घ्यायची आहे मग त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील शाळांच्या स्वच्छता बाबत काय निर्णय झाला आहे ते सांगावे की या शाळांची स्वच्छता ही पूर्वीप्रमाणेच विद्यार्थी आणि शिक्षक यांनी संयुक्तपणे करायची आहे

    उत्तर द्याहटवा

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.