PRASHAST अॅप २.० अंमलबजावणी व सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे १००% स्क्रिनिग/तपासणी पूर्ण करणे आदेश

आज दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी MPSP मुंबई यांनी VC मध्ये दिलेल्या सूचनेनुसार 

सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना कृपया सूचना देण्यात याव्यात. 

प्रशस्त 2.0 व्हिडिओ ट्युटोरियल बघण्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वर 

https://prashast.education.gov.in/

क्लिक करून PRASHAST video guide ला क्लिक करून आपल्या शाळेचा UDISE code टाकून  आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. 

यानंतर ओटीपी येईल.. 

लॉगिन झाल्यानंतर प्रशस्त aap मध्ये असणारे 10 व्हिडिओ शिक्षक यांनी पाहायचे आहेत. त्याशिवाय पुढील सर्वेक्षणाचा टॅब संबंधित शिक्षकाला ओपन होणार नाही.. 

 'Inclusion for All': *​📱 PRASHAST APP 2.0 - Sensitisation Video कसे पहावेत? 🎥

*👨‍🏫 शिक्षकांसाठी PRASHAST पोर्टलवर व्हिडिओ पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. 👇

​🌐 1) सर्वात प्रथम https://prashast.education.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

​☰ 2) वेबसाईट उघडल्यानंतर, उजव्या बाजूला वर असलेल्या मेनूवर (तीन आडव्या रेषांवर) क्लिक करा.

​⏯️ 3) मेनूमध्ये दिसणाऱ्या पर्यायांपैकी सर्वात खाली असलेल्या "PRASHAST Video Tutorials" या पर्यायावर क्लिक करा.

​🔐 4) लॉगिन करा (Login with OTP):

​👤 Role - Teacher दिसेल.

​🏫 तुमच्या शाळेचा UDISE Code टाका.

​📱 तुमचा नोंदणीकृत Mobile Number टाका.

​🔡 स्क्रीनवर दिसणारा Captcha अचूक टाकून 'SEND OTP' वर क्लिक करा आणि आलेला OTP टाकून लॉगिन पूर्ण करा.

​📺 5)  लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवर "PRASHAST Sensitisation Videos" दिसतील. यामध्ये Chapter 1, 2, 3 असे सर्व 10 व्हिडिओ उपलब्ध आहेत. ⏱️ या सर्व व्हिडीओचा एकूण वेळ अवघा 39 मिनिट 48 सेंकद आहे.

​🗣️ 6) उजव्या बाजूला वरती तुम्ही व्हिडिओची भाषा (English किंवा Hindi) निवडू शकता.

​🔍 7) तसेच तुम्ही तुमचे कोणते व्हिडिओ पाहायचे राहिले आहेत (Pending) किंवा पूर्ण झाले आहेत (Completed), हे पाहण्यासाठी 'All Videos' या फिल्टरचा वापर करू शकता.

🌟 सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी : हे सर्व व्हिडिओ वेळेत पूर्ण करून आपले ज्ञान अद्ययावत करावे.

Google play Store

 https://play.google.com/store/apps/details?id=com.dscs.app

आपण पाहिलेले व्हिडिओ ची नोंद केंद्र शासन स्तरावर घेतली जाणार आहे. 

आज दिनांक 22 व 23 ऑगस्ट 2026 शनिवार व रविवारी दोन दिवसामध्ये सर्व शिक्षक यांनी प्रशस्त AAP वरील व्हिडिओ पाहण्यासाठी सुचित करण्यात येत आहे.

काही अडचणी असल्यास आपल्या समूह साधन केंद्राच्या विशेष शिक्षकांशी संपर्क साधावा...

समावेशीत शिक्षण दिव्यांग विद्यार्थी चे स्क्रिंनिग (तपासणी) बाबत मार्गदर्शक सूचना नुसार सर्व घटकानी अंमलबजावणी व कार्यवाही करावी. 

 PRASHAST अॅप २.० ची अंमलबजावणी करणे आणि सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे १००% स्क्रिनिग (तपासणी) पूर्ण करण्याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयाने दिनांक 24 जून 2026 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 



समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

जा.क्र.मप्राशिप/समग्र शिक्षा/आयई/२०२६-२७/प्रति,

दिनांकः ई स्वाक्षरी गृहीत धरावी.

१) मा.आयुक्त, महानगरपालिका, सर्व.

२) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.

विषय: PRASHAST अॅप २.० ची अंमलबजावणी करणे आणि सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे १००% स्क्रिनिग (तपासणी) पूर्ण करण्याबाबत.

संदर्भ: भारत सरकारचे पत्र क्र.F. No. ९-६/२०२४-१९.१८ दिनांक: ०८ जून २०२६.

प्रशस्त (PRASHAST-Pre-Assessment Holistic Screening Tool) प्रणाली ही शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचा एक उपक्रम आहे. याचा मुख्य उद्देश नियमित शाळांमध्ये शिकणाऱ्या विशेष गरजा असलेल्या मुलांची (CWSN - Children with Special Needs) सुरुवातीच्या टप्यावरच ओळख पटवणे आणि त्यांची तपासणी (Screening) करणे हा आहे. 'प्रशस्त (PRASHAST-Pre-Assessment Holistic Screening Tool) अॅप द्वारे 'दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा, २०१६ (RPwD Act, २०१६) अंतर्गत अधिसूचित केलेल्या २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाशी संबंधित लक्षणांची तपासणी करण्यास मदत करते.

सुधारित PRASHAST App २.०० आता UDISE प्रणालीशी जोडण्यात आलेले आहे, ज्यामुळे शाळा, विद्यार्थी, वर्गशिक्षक, मुख्याध्यापक (HoS) आणि विशेष शिक्षक (Special Educators) यांची परस्पर सांगड (Mapping) सहजतेने घालणे शक्य झाले आहे. या एकत्रीकरणामुळे विद्यार्थी माहितीचे स्वयंचलित सिंक्रोनायझेशन (Synchronization), भूमिकेवर आधारीत प्रवेश (Hole-based access), जबाबदाऱ्यांचे वाटप आणि तपासणी (Screening) उपक्रमांचे निरीक्षण करणे सुलभ झाले आहे, परिणामी तपासणी प्रक्रियेची कार्यक्षमता आणि अचूकता वाढली आहे.

जानेवारी २०२६ मध्ये विभागामार्फत आयोजित सर्व समावेशक शिक्षण परिषद (Inclusive Education Summit) मध्ये मा. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये PRASHAST अॅपद्वारे सर्व मुलांचे १००% विद्यार्थ्यांची तपासणी (Screening) करण्याच्या आवश्यकतेवर भर दिलेला आहे. जेणेकरून अतिरिक्त मदतीची गरज असलेल्या मुलांची लवकर ओळख पटेल आणि सर्वसमावेशक शिक्षणाचे नियोजन व उपाययोजना अधिक बळकट करता येतील.

शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ दरम्यान PRASHAST App २.०० ची कालमर्यादेत आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी खालीलप्रमाणे उपक्रम आणि कालमर्यादा निश्चित करुन दिलेली आहे:

उपक्रम / क्रियाकलाप (Activity)

कालमर्यादा (Timeline)

दिक्षा (DIKSHA) द्वारे सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी संवेदनशीलता प्रशिक्षण

(Sensitization Training)

संबंधित शाळांमार्फत आयोजित केला जाणारा, शालेय स्तरावरील प्रशासकीय आणि जून-ऑगस्ट २०२६ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठीचा एक दिवसीय प्रत्यक्ष संवेदनशीलता प्रशिक्षण.

स्क्रिनिंगपूर्वी वर्गशिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांचे निरीक्षण करण्याचा कालावधी

मुख्याध्यापक/प्राचार्यासाठी Institutional/Admin लॉगिन तयार करणे आणि ते सक्रिय करणे

जून - जुलै २०२६

प्रशस्त अॅपमध्ये मुख्याध्यापक/प्राचार्याद्वारे (HoS) वर्गशिक्षक आणि विशेष शिक्षकांची नियुक्ती

ऑगस्ट २०२६

व त्याची संबधित वर्गाशी जोडणी (मॅपिंग)

*वर्ग शिक्षकाकडून Screening Part-1 ची छाननी करणे,

सप्टेंबर २०२६

विशेष शिक्षकांकडून (Special Educators) Screening Part-II ची छाननी करणे.

ऑक्टोबर २०२६

उपरोक्तप्रमाणे नमूद केल्यानुसार जिल्हा परिषद व महानगरपालिका यांना खालील बाबीवर कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात येत आहे.

(ii) PRASHAST App २.० हे अॅप कार्यान्वित होताच मुख्याध्यापक/प्राचार्य आणि इतर

संबंधित वापरकर्त्यासाठी संस्थात्मक लॉगिन (institutional login) सक्रिय केले जातील याची खात्री करावी.

आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांनी सप्टेंबर २०२६ व्या पहिल्या आठवड्यापर्यंत शाळेत प्रवेशित १००% विद्यार्थ्यांचे PRASHAST App २.० द्वारे तपासणी (screening) पूर्ण केले आहे याची खात्री करावी.

शिक्षकांना मार्गदर्शन व क्षमता वृद्धी करणे (capacity building) कार्यक्रमांना चालना देणे; आणि

(H) PRASHAST App २.० चा वापर आणि तपासणी प्रक्रीयेबाबत शिक्षक व विशेष

(iv) PRASHAST App २.० द्वारे तपासणी (screening) ची कामे वेळेत पूर्ण होतील याची खात्री करण्यासाठी प्रगतीचा नियमित आढावा घेणे.

भारत सरकारने संदर्भिय पत्रान्वये PRASHAST App २.० बाबत दिलेल्या वेळापत्रकाचे कालमर्यादेत आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, हि विनंती.


आपला विश्वासू,

Digitally signed by Date: 24-06-2026 17:05:43

(देविदास कुलाळ)

सहसंचालक (प्रशा),


प्रत : माहितीस्तव सविनय सादर,

१) शिक्षण संचालक (प्राथ.) महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत : माहितीस्तव व कार्यवाहीस्तव.

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.

२) प्रशासन अधिकारी/शिक्षणाधिकारी, महानगरपालिका, सर्व.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.