महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयातील निर्गमित परिपत्रकानुसार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत शाळा मूल्यांकनाबाबत पुढील प्रमाणे नवीन निर्देश देण्यात आले आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्या शाळपती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातारवण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राविण्यासाठी दि. ३०.११.२०२३ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
२/- या अभियानाच्या अनुषंगाने शाळांना माहिती भरण्यासाठी सरल मधील शाळा पोर्टलव्दारे टॅब उपलब्ध करुन देऊन शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणं, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, मनपा स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाच वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
३/- त्याअनुषंगाने शाळांकडून भरलेल्या माहितीचे केंद्र पातळीवरून मूल्यांकन करून सर्वोत्तम गुणांकन असणारी प्रथक क्रमांकावरील एक शाळा (प्रत्येक गटातून एक प्रमाणे) ब्लॉक पातळीवर मूल्यांकनासाठी ऑनलाईन प्रणालीमार्फतच पाठविण्यात यइन याच पध्दतीनं जिल्हापातळीवर प्रत्येक ब्लॉकमधून प्रथक क्रमांकाची शाळा (प्रत्येक गटातून एक प्रमाणे) विभाग पातळीवर प्रत्येक जिल्हयातून प्रथम क्रमांकाची एक शाळा (प्रत्येक गटातून एक प्रमाणे) राज्यस्तरावर प्रत्येक विभागातून एक सर्वोत्तम गुण असणारी शाळा (प्रत्येक गटातून एक प्रमाणे) याप्रमाणे मूल्यांकनासाठी ऑनलाईन प्रणालीमार्फतच पाठविण्यात येईल, तसेच तालुका पातळीवरुन पड मूल्यांकन करताना शाळांचे लगतच्या स्तरावरुन दिलेले शाळांचे गुण दिसणार नाहीत. या सर्व प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकार आपल्या स्तरावरुन स्वतंत्रपणे कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही, याची नोंद घ्यावी. ऑनलाईन प्रणालीव्दारचे सर्व माहिती यामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार असून त्याप्रमाणे दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कामकाज पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
शिक्षण उपसंचालक (प्रशासन) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पण
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments