परीक्षा पे चर्चा 2024 अपडेट - सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी प्रक्षेपण आयोजित करावे.. शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य

प्राथमिक शिक्षण संचालक यांची कार्यालयातून निर्गमित दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी च्या परिपत्रकानुसार परीक्षा पे चर्चा 2024 चे उपक्रम प्रक्षेपण आयोजित करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.


माननीय पंतप्रधान २९ जानेवारी २०२४ रोजी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे "परीक्षा पे चर्चा-२०२४" च्या आणखी एका रोमांचक आवृत्तीसाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. माननीय पंतप्रधानांचा संवाद दूरदर्शनद्वारे डीडी नॅशनल, डीडी न्यूज आणि डीडी इंडिया इत्यादीद्वारे थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच रेडिओ चॅनेल (ऑल इंडिया रेडिओ मीडियम वेव्ह, ऑल इंडिया रेडिओ एफएम चॅनल), वेबसाइटवर थेट वेब स्ट्रीमिंगद्वारे देखील उपलब्ध असेल. PMO, MOE, दूरदर्शन, MyGov.in आणि MoE चे YouTube चॅनेल, MoE चे Facebook Live आणि स्वयंप्रभा/दीक्षा चॅनेल यावर देखील सदर कार्यक्रम प्रक्षेपित केला जाणार आहे.


सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांना निर्देशित करण्यात येते की, आपल्या विभागातील / जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये संगणक, टि.व्ही. तसेच मोठ्या स्क्रीन बसविण्याची आवश्यक व्यवस्था करण्यासाठी संबंधित मुख्याध्यापक यांना आवश्यक ते निर्देश देण्यात याव्यात. बहुतांश शाळांमध्ये टीव्ही आणि लाईट जोडणीबाबत काही अडचणी असल्यास, त्या दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचे थेट भाषण पाहता ऐकता येईल याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावी. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIETs) यांनीही क्षेत्रीयस्तरावरील यंत्रणांशी समन्वय साधून जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता ६ वी ते १२ वी मधील सर्व विद्यार्थी थेट प्रक्षेपण पाहू/ऐकू शकतील याबाबत आवश्यक ती व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे. कार्यक्रमानंतर, कार्यक्रम पाहणाऱ्या मुलांची छायाचित्रे आणि तपशील कृपया MyGov या पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत.


प्रत्येक जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी किंवा निवडलेल्या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना आकर्षित करणाऱ्या मोठ्या स्क्रीन बसवता आली तर अधिक लोकांपर्यंत सदरचा कार्यक्रम प्रक्षेपित करता येऊ शकेल. अतिदुर्गम भागात जेथे टीव्ही पाहण्याची सुविधा शक्य नाही, अशा ठिकाणी रेडिओ/ट्रान्झिस्टरची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरुन शालेय मुले पंतप्रधानांचे मार्गदर्शन व संवाद ऐकू शकतील, या संदर्भात, समग्र शिक्षा अंतर्गत उपलब्ध निधीचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तथा इतर अनुदानित शाळांना टीव्ही इत्यादी भाड्याने घेणे आणि इतर व्यवस्थेसाठी करता येऊ शकेल,

विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राचे भविष्य आहेत, आणि या भावी राष्ट्रनिर्मात्यांसाठी शिक्षण हे अधिक आनंददायी आणि कमी ताणतणावपूर्ण बनवण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी आपल्या माननीय पंतप्रधानांच्या कल्पनेनुसार परीक्षांचा उत्सव 'परीक्षा पे चर्चा २०२४ साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी उचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेमार्फत संचालनालयास सादर होईल, याची दक्षता घ्यावी.


(शरद गोसावी)

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक

शिक्षण मंडळ तथा नोडल अधिकारी

महाराष्ट्र राज्य, पुणे 


संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.