महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग यांच्यातर्फे मराठा आरक्षण सर्वे करतानाच्या काही महत्त्वाच्या सूचना, वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे, अँप वापरताना येणारे संदेश, त्याचा अर्थ आणि उपाय (Important Instructions For Maratha Reservation Survey FAQs messages Displays On App Meaning Solution)

 1. प्रगणकांनी सॉफ्टवेअर अपलोड करण्यापूर्वी त्यांचा मोबाईल हा अँड्रॉइड असला पाहिजे हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

2. सर्वे सॉफ्टवेअर हे फक्त अँड्रॉइड मोबाईलवर चालते. अॅपल किंवा इतर ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या मोबाईलवर हे सर्वे सॉफ्टवेअर चालत नाही.

3. प्रगणकांकडे जर अँड्रॉइड मोबाईल नसेल तर त्यांनी अँड्रॉइड मोबाईलची व्यवस्था करून त्यांचे सिमकार्ड हे त्या मोबाईल मध्ये इन्सर्ट करणे आवश्यक आहे. ज्यामुळे रजिस्ट्रेशन करताना त्यांच्या मोबाईलवर ओटीपी येऊ शकेल.


4. रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर टाईप करून ओटीपी मागवायचा आहे. जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येणार नाही.

5. ओटीपी साठी रिक्वेस्ट दिल्यानंतर कमीत कमी पाच मिनिटे ओटीपी येण्यासाठी वाट पाहायची आहे.

6. ओटीपी मिळवण्यासाठी तीन चार वेळा ओटीपी साठी रिक्वेस्ट दिली असता एरर मेसेज येऊ शकतो.

7. सर्वे करत असताना मोबाईलची बॅटरी 25 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास सर्वे सॉफ्टवेअर बंद होऊ शकते. प्रगनकांनी त्यांच्या मोबाईलची बॅटरी ही 25 टक्क्यांपेक्षा खाली जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे.

8. सर्वे साठी जाण्या अगोदर सर्व प्रगणकांनी आयोगाचे आधार कार्ड त्यांच्यासोबत बाळगणे हे बंधनकारक आहे. तसेच आयोगाने दिलेला मार्कर पेन हा ही त्यांनी त्यांच्यासोबत सतत बाळगावा.

9. सर्वे संपल्यानंतर प्रगनकाने त्या घरावर गोल काढून त्याच्यामध्ये एम एस बी सी सी असे लिहावे. हे चिन्ह त्या घराचा सर्वे झाला आहे असे सूचित करते. जर एखाद्या घरावर असे चिन्ह नसेल तर त्याचा अर्थ त्या घराचा सर्वे झाला नाही असा होतो.

10. हा सर्वे प्रत्येक घरामध्ये जाऊन करायचा आहे. जर एखाद्या घरातील व्यक्तीने त्याची जात ही आरक्षित गटातील आहे असे सांगितले असता त्याचा सर्वे बंद होईल आणि प्रगनकाने पुढील घराकडे सर्वेसाठी जायचे आहे.

11. एखाद्या व्यक्तीने जर त्याची जात ही मराठा सांगितली असल्यास, त्याला त्याची पोट जात विचारायची आहे की तो कुणबी मराठा, मराठा कुणबी, किंवा कुणबी या जातीचा आहे का आणि असल्यास त्याच्याकडे त्याचे प्रमाणपत्र आहे का? ? जर त्या व्यक्तीकडे कुणबी मराठा, मराठा कुणबी किंवा कुणबी या जातीचे प्रमाणपत्र असल्यास तो सर्वे बंद होईल व प्रगनकाने पुढच्या घराकडे सर्वेसाठी जायचे आहे. जर त्या व्यक्तीने त्याच्याकडे कुणबी मराठा, मराठा कुणबी किंवा कुणबी या जातीचे प्रमाणपत्र नसल्यास तो सर्वे पुढे कंटिन्यू होईल आणि त्या व्यक्तीला सर्व प्रश्न विचारायचे आहेत.

12. एखाद्या व्यक्तीने जर त्याची जात ही ब्राह्मण असे सांगितले असता, त्या व्यक्तीला त्याचा धर्म विचारायचा आहे. जर त्या व्यक्तीने त्याची जात ब्राह्मण अशी सांगितली असल्यास तो हिंदू या धर्मातील आहे आणि त्याचा धर्म हिंदू असा सिलेक्ट करायचा आहे. असे करत असताना त्या व्यक्तीने सांगितलेल्या जातीच्या अनुषंगाने त्याचा धर्म सिलेक्ट करावा. असे करत असताना प्रगनकाने नजरचुकीने दुसरा धर्म सिलेक्ट करू नये याची काळजी घ्यावी.

13. एखाद्या व्यक्तीने जर त्याची जात मुस्लिम असे सांगितले असता त्याला सांगावे की मुस्लिम ही जात नसून धर्म आहे व त्याला त्याची पोट जात विचारावे. जर त्या व्यक्तीला त्याची पोट जात माहित नसेल तर इतर ऑप्शन सिलेक्ट करून त्या व्यक्तीची जात मुस्लिम अशी नमूद करावी. आणि धर्माच्या प्रश्नांमध्ये त्याचा धर्म मुस्लिम असा सिलेक्ट करावा,

14. प्रश्नावली संपल्यानंतर प्रगनकाने माहिती देणाऱ्याची सही घेण्यापूर्वी त्याला पुढील संदेश वाचून दाखवणे अनिवार्य आहे. "दिलेली माहिती मी स्वतः दिली आहे, वाचली आहे, बरोबर व सत्य आहे. ही माहिती चुकीची/ असत्य आढळल्यास होणाऱ्या परिणामासाठी मी जबाबदार राहील".

15. याच्यानंतर प्रगनकाने त्या व्यक्तीची सही एका कागदावर घेऊन त्या सहीचा फोटो अपलोड करायचा आहे. जर तो व्यक्ती सही करू शकत नसल्यास त्याचा अंगठा घ्यावा.

16. प्रगनकाने सर्वे देणाऱ्या व्यक्तीला सांगणे आवश्यक आहे की त्यांची बँकेतली सही आवश्यक नसून त्यांचे पहिले नाव शेवटचे नाव किंवा इनिशियल लिहिले असले तरी चालेल.

17. जर त्यांना सही किंवा अंगठा द्यायचा नसल्यास त्यांना विनंती करावी की त्यांच्या उजव्या अंगठ्याचा फोटो घेऊन का असे विचारा आणि त्यांनी अंगठ्याचा फोटो घेऊ दिल्यास तो अपलोड करावा. तो अपलोड केला तर चालेल

18. जर त्या व्यक्तीने सही देण्यास नकार दिल्यास त्या व्यक्तीला सांगायचे आहे की जर त्यांनी सही अथवा अंगठा दिला नाही तर हा फॉर्म रद्द करण्यात येईल व त्यांनी दिलेल्या माहितीचा वापर होणार नाही.

19 . सही किवा अंगठा देण्यास मनाई केले असता तो फॉर्म न भरता सर्वे मधून एक्झिट व्हावे आणि तुमच्या सुपरवायझरला किवा मास्टर ट्रेनरला याची माहिती द्यावी. माहिती देत असताना त्या व्यक्तीचे नाव त्याचा पत्ता संक्षिप्त स्वरूपात देणे आवश्यक आहे.


वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे


1. मला OTP मिळत नसल्यास मी काय करावे?

तुमचे नाव आणि फोन नंबर कदाचित आमच्या यादीमध्ये अपडेटेड नसेल. कृपया तुमच्या पर्यवेक्षक किंवा नोडल ऑफिसरशी संपर्क साधा आणि तुमचे नाव, फोन नंबर, जिल्हा आणि तालुका किंवा कॉर्पोरशनचे नाव द्या. ही माहिती मागासवर्गीय आयोगाकडे इंग्रजीत एक्सेल शीटमध्ये पाठवा. आयोग हि यादी आम्हाला पाठवून देईल आणि मग आम्ही ती अपडेट करू


2. एखादी जात जर लिस्ट मध्ये उपलब्ध नसेल तर काय करावे?

जर एखादी जात लिस्टमध्ये उपलब्ध नसल्यास others म्हणजे इतर या ऑप्शनला क्लिक करून लिस्ट मध्ये उपलब्ध नसलेली जात तेथे टाईप करावी.


3. सर्वे फक्त ओपन कॅटेगरीचा करायचा आहे का?

सर्वे सर्व हाऊसहोल्ड चा करायचा आहे. जर एखादी व्यक्ती आरक्षित गटातील असली तर त्याचा सर्वे बंद होईल व त्या प्रगनकाने दुसऱ्या घराचा सर्वे करण्यासाठी जायचे आहे.


4. सर्वेचे टायमिंग काय असावे?

सर्वेचे टाईम हे लोक घरी असतील अशा पद्धतीने आखायचे आहे. जेणेकरून घरातील करता व्यक्ती घरी असेल आणि तो सर्वे देण्यास उपलब्ध होईल.

5. प्रणालीमध्ये माझ्या गावाचे नाव का दिसत नाही?

तुमच्या गावाचे नाव दिसत नसल्यास, कृपया तुमच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे नाव आमच्यासोबत शेअर करा. आम्ही समस्येकडे लक्ष देऊ आणि बॅकएंडवर त्याचे निराकरण करू.

6. मला एरर मेसेज मिळाल्यास मी काय करावे?

प्रथम, कृपया तुम्हाला प्राप्त होत असलेला विशिष्ट त्रुटी संदेश ओळखा. तो प्रमाणीकरण संदेश असल्यास, योग्य डेटा प्रविष्ट केल्याची खात्री करा. जर त्रुटी सूचित करते की प्रश्नावलीतील सर्व फील्ड्सची उत्तरे दिली गेली नाहीत, तर फॉर्म पुढे जाणार नाही. सर्व प्रश्न हे कंपलसरी आहेत. सर्व प्रश्नाची उत्तरे भरा मग मॉड्यूल पुढे जाईल

7. एखाद्या व्यक्तीने सही करण्यास नकार दिला तर काय करावे जर एखाद्या व्यक्तीने सही करण्यास नकार दिला तर त्या व्यक्तीला सांगावे की जर त्यांनी सही किंवा अंगठा दिला नाही तर हा फॉर्म भरला जाणार नाही आणि या माहितीचा उपयोग होणार नाही. त्या व्यक्तीला प्रगनकाने कन्व्हेन्स करणे आवश्यक आहे. तरीही सही दिली नाही तर तो फॉर्म न भरता मास्टर ट्रेनरला किंवा सुपरवायझरला कळवावे.




वरील संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.