बदली अपडेट 2023 - आंतरजिल्हा बदलीसाठी नवीन अर्ज व 2022 मध्ये केलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती देखील करता येणार

आगोदर शिक्षक Profile Update झाल्या नंतर बदली पोर्टल सुरू होणार? 


आंतरजिल्हाबदली 2023 करिता ज्या शिक्षकांची माहिती शिक्षक बदलीपोर्टलवर यापुर्वी नोंदविलेली नाही त्या शिक्षकांची दिलेल्या लिंक मध्ये माहिती नोंदविणेबाबत. तसेच यापुर्वी दिलेल्या माहितीमध्ये काही दुरुस्ती असेल तर ती अद्ययावत करणेबाबत.


शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रीया राबवायची असल्यामुळे यापुर्वी सन 2022 मध्ये शिक्षण सेवक असलेल्या ज्या शिक्षकांची बदली पोर्टलवर माहिती नोंदविलेली नाही. त्यांचे बाबतीत पंचायत समिती स्तरावर या कार्यालयाकडून पुरविण्यात आलेल्या लिंकमध्ये माहिती मंगळवार दिनांक 05/12/2023 ला दुपारी 04.00 वाजेपर्यंत नोंदविण्यात यावी. तसेच नोंदविलेल्या माहितीची गटशिक्षणाकिारी यांचे स्वाक्षरीनिशी प्रमाणित करून हार्ड कॉपी दिनांक 06/12/2023 ला सकाळी 11.00 वाजेपर्यंत खास दुतामार्फत जिल्हा बदली नियंत्रण कक्षामध्ये सादर करावी.


तसेच ज्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीकरिता अर्ज भरावयाचा आहे व त्यांची यापुर्वी नोंदविलेली शिक्षकांची माहिती (Profile Data) मध्ये काही बदल करावयाचा असेल तर त्याबाबतचा मुळ कागदपत्रावरून / मुळ सेवापुस्तकावरून पडताळणी करून गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीनिशी सादर करावी. सदर बाबतीत विलंब झाल्यास व त्यामुळे एकही शिक्षक आंतरजिल्हा बदलीचा अर्ज भरण्यापासून वंचित राहील्यास त्याकरिता जिल्हा कार्यालय जबाबदार राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी. सहपत्र - बदली पोर्टलवर रजिस्ट्रेशन असलेल्या शिक्षकांची यादी.


 शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जिल्हा परिषद बुलडाणा

 महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत शासन निर्णय निर्गमित करून पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू


6 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची सुविधा मिळणार.


आजवर बदलीपासून वंचित असलेल्यांना अर्ज करण्याची संधी मिळणार.


ज्यांनी यापूर्वी अर्ज केले आहे त्यांना अर्ज एडिट करून मिळणार- जिल्हा बदलवू शकतील.


दिनांक 6 डिसेंबर नंतर प्रत्यक्ष बदली प्रक्रिया सुरू होणार.


जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीव्दारे करण्याबाबत सुधारित धोरण संदर्भाधीन दि.०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे. तथापि, शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भाधीन दि.२१/०६/२०२३ च्या शासन निर्णयान्वय तसेच दि.०३/११/२०२३ रोजीच्या पत्रानुसार प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत.

(अ) शासन निर्णय दि.०७/०४/२०२१ मधील परिच्छेद क्र.२.१ नुसार जे शिक्षक कर्मचारी दि. ३० जून, २०२३ रोजी बदलीस पात्र असतील, अशा शिक्षकांनाच अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी.

(ब) तसेच सन-२०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र असूनही रिक्त जागेअभावी त्यांना बदली मिळाली नव्हती. अशा शिक्षकांना सन-२०२२ मध्ये भरलेल्यांना अर्जामध्ये जिल्हा बदलण्यास एडीट करण्यास संधी देण्यात यावी.

(क) मा. न्यायालयीन प्रकरणात व विभागीय आयुक्तांकडील अपील प्रकरणात बदल्यांबाबतचे स्पष्ट आदेश दिलेले असतील त्या शिक्षकांना संधी देण्यात यावी. तथापि, असे करतांना संबंधित शिक्षकांनी सदर न्यायालयीन / विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रत अर्जासोबत पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे.

उपरोक्त (अ) मधील नमूद बदलीपात्र शिक्षकांसाठी रोष्टर (बिंदुनामावली) प्रसिध्द करण्याची व अवलोकनाची कार्यवाही करावी. तसेच बदलीपात्र शिक्षकांना अर्ज सादर करण्याची मुदत दि.०६/१२/२०२३ पर्यंत देण्यांत येत असून तद्नंतर बदलीची कार्यवाही सुरु करण्यात येईल. वरीलप्रमाणे सूचना सर्वसंबंधितांना निदर्शनास आणून देण्याची व त्यानुषंगाने पुढील कार्यवाही करण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दक्षता घ्यावी, ही विनंती


आपला,

(देशमुख)

उप सचिव, महाराष्ट्र शासनवरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.