शिक्षक पद भरती 2023 अपडेट

 पेसा क्षेत्र शिक्षक भरती करीता कागदपत्र पडताळणी नंतर गैरहजर / उमेदवारांची यादी जाहिर करणे बाबत  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती २०२३ करीता शासन स्तरावरून प्राप्त झलेल्या यादीतील उमेदवारांना गुणवत्ता क्रमानुसार कागदपत्र पडताळणीसाठी दिनांक ०३/१०/२०२३, दिनांक ०४/१०/२०२३ व दिनांक ०६ / १० / २०२३ रोजी बोलविण्यात आलेले होते. कागदपत्र पडताळणी वेळापत्रकानुसार उपस्थित झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली असून गैरहजर असलेल्या यादीतील उमेदवारांना पुनश्च एक संधी देण्यात येत असून त्यांनी दिनांक १२ / १० / २०२३ रोजी बार गुरुवार सकाळी १०.३० ते सायं. ०५.०० वाजेपर्यंत जिल्हा परिषद, नंदुरबार येथे खालील नमूद कागदपत्रांच्या छायांकित (१ संच) प्रतींसह उपस्थित राहावे.

गैरहजर उमेदवारांची गुणानुक्रमे यादी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ http//zpndbr.in येथे प्रसिध्द करण्यात आली असून जिल्हा परिषद, नंदुरबार व तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालय, गटसाधन केंद्र येथे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे. नमुद केलेल्या दिनांकास उपस्थित न राहिल्यास तद्द्वंदतर आपली कोणत्याही प्रकारची तक्रार अगर दावा ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

सोबत जोडलेल्या वेळापत्रकामधील नियोजनानुसार कागदपत्र पडताळणीस उपस्थित न राहिल्यास पुढील होणा-या परिणामास संबधित उमेदवार जबाबदार राहतील याची नोंद घेण्यांत यावी.


१. शैक्षणिक व इतर कागदपत्रे

२. स्थानिक पेसा क्षेत्रांतर्गत रहिवासी असलेबाबत प्रकल्प कार्यालयाकडील दाखला

३. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र

 ४. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्य असल्यास तहसील कार्यालयाकडील दाखला

५. संगणक प्रमाणपत्र

६. TET/CTET/TAIT / गुणपत्रक / प्रमाणपत्र

७. शिक्षक अभियोग्यता / गुणपत्रक / स्वप्रमाणपत्र

८. आधार कार्ड / पॅन कार्ड

९. पासपोर्ट साईज फोटो

१०. व इतर आवश्यक ते सर्व कागदपत्र सोबत आणावेत

(वरिल कागदपत्रांचे स्वसाक्षांकित छायांकित प्रतीचा संच)


(सावन कुमार भा.प्र.से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.