शाळा व्यवस्थापन समिती/शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे पुनर्गठन करणेबाबत महत्त्वपूर्ण अपडेट

 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूर यांनी दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार शाळा व्यवस्थापन समिती किंवा शाळा व्यवस्थापन व विकास समिती पुनर्गठन करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


प्रत्येक दोन वर्षांनी सर्व शाळांमधील शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे पुनर्गठन हे RTE कलम २१ नुसार करणे अनिवार्य आहे. सोलापूर जिल्हयातील शाळा व्यवस्थापन समिती व शाळा व्यवस्थापन व विकास समिती पुनर्गठन यापूर्वी २०२१ मध्ये करण्यात आले होते.


काही शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन व विकास समिती या माहे सप्टेंबर २०२१ मध्ये पुनर्गठीत करण्यात आल्या होत्या. त्यांचा कार्यकाल माहे सप्टेंबर २०२३ मध्ये समाप्त होणार आहे. अशा सर्व शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन व विकास समित्यांचे पुनर्गठन विहित प्रक्रिया राबवून करुन घ्यावे.


तसेच शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे पुनर्गठन करताना शासन निर्णय क्रमांक पीआरई २०१०/प्र.क्र. २१७ /प्राशि १ दिनांक १९ जून २०१० चा आधार घेवून सर्व अटी व शर्तीचे पालन करावे. (उदा. एकूण समितीच्या ५० % महिला वर्ग निहाय प्रतिनिधित्व ध सर्व) पुनर्गठन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसाचे आत शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन व विकास समितीची पुनर्गठन प्रक्रिया अहवाल लिंक मध्ये भरावा. लिंक स्वतंत्रपणे आपणाला पाठविली जाईल.. 






वरील संपूर्ण परिपत्रक व शाळा व्यवस्थापन समिती किंवा शाळा व्यवस्थापन व विकास समिती पुनर्गठित करणे बाबत संपूर्ण प्रक्रिया पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.