मुख्याध्यापकाचा प्रभार कोणाकडे देण्यात यावा.. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांच्या कार्यभाराबाबत.

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांच्या कार्यभाराबाबत. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकांचा प्रभार कार्यभार कोणत्या शिक्षकांकडे नियमाप्रमाणे सोपवण्यात यावा यासाठी परतुर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी मार्गदर्शक परिपत्रक काढले आहे त्यानुसार पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत. 

जिल्हा परिषद शाळांमधील ज्या शाळेचा पट 150 पेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी मुख्याध्यापक पद आर टी 2009 अंतर्गत संदर्भ दिनांक 30 सप्टेंबर 2013 नुसार पद मंजूर करण्यात आलेले आहे. इतर शाळांना मुख्याध्यापक उच्चश्रेणीपद मंजूर नाही याबाबत तालुका अंतर्गत मुख्याध्यापक पदाचे कार्यभाराबाबत साशंकता आहे याबाबत खालील प्रमाणे कार्यवाही करून अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2015-16 पासून करण्यात यावी. 

१) ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर असून कार्यरत मुख्याध्यापक यांनी कर्तव्य सूची प्रमाणे कार्यभार सांभाळणे आपणावर बंधनकारक राहील परंतु सदरचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ प्राथमिक शिक्षकांकडे मुख्याध्यापकाचा कार्यभार देण्यात यावा. 

२) ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर नाही परंतु पदवीधर शिक्षकांचे पद मंजूर आहे त्या ठिकाणी सेवा जेष्ठ पदवीधर शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा.  पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ प्राथमिक शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. 

३) ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्याध्यापक व पदवीधर पद मंजूर नाही त्या ठिकाणी सेवा जेष्ठ प्राथमिक शिक्षकांकडे प्राध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. 

४) वरील एक ते तीन बाबी व्यतिरिक्त स्थानिक पातळीवर अडचणी समस्या असतील अशा ठिकाणी स्वतः गटशिक्षणाधिकारी यांनी ज्या शिक्षक प्राथमिक पदवीधर मुख्याध्यापक आजच्या कार्यभाराबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित वेळोवेळी केलेले असतील त्यांनी मुख्याध्यापकांच्या कर्तव्य सूची प्रमाणे कार्यभार सांभाळणे संबंधितावर बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी. 

याबाबत सर्व केंद्रभूंनी त्यांच्या अंतर्गत संबंधित शाळांना एक प्रत देऊन आपण स्वतः लक्ष घालून पदभार सोपवावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास लेखी स्वरूपात सादर करावा तसेच शाळेच्या विकासासाठी तसेच पर्यावेक्षण संनियंत्रण व्यवस्थापन आर्थिक शैक्षणिक सामाजिक कार्य व्यवस्थित पार पाडणे अन्यथा नियमानुसार एम सी एस आर 1981 नुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित केली जाईल याची नोंद घ्यावी.  मुख्याध्यापक कार्य बारा बाबत तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. 



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.