अपार आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थी नावात दुरुस्ती करण्याची सुविधा गटशिक्षणाधिकारी लॉगिन वर उपलब्ध अर्ज फॉरमॅट पीडीएफ डाउनलोड

सर्व माध्यमाच्या सर्व मुख्याध्यापकांना कविण्यात येते की, ‍UDISE मधील APAAR ID Generate करतांना As Per Record नुसारविद्यार्थ्यांचे नाव चुकीचे झाले असल्यास सदर विद्यार्थ्यांचे नाव दुरूस्त करण्याची सुविधा तालुका Login ला आलेली आहे तरी ज्या शाळांचे एक किंवा दोन विद्यार्थ्यांचे Correction असल्यास सोबत जोडण्यात आलेला SO3 Form भरुण देण्यात यावा व दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे Correction असल्यास सोबत जोडण्यात आलेला Formate ची Excel File तयार करुन देण्यात यावी.


विद्यार्थी नावात दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला SO3 Form पीडीएफ डाउनलोड.

Download


महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयाने दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी 'APAAR दिवस' साजरा करणेबाबत पुढील  प्रमाणे निर्देश दिले आहेत.



संदर्भ : १) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O. No.१-२७/ २०२३-DIGED-Part (१) दि. ०२/०९/२०२४.

२) कार्यालयाचे जा.क्र. मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२४- २५/२८८१ दि. २५/०९/२०२४.

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरु केला आहे. दि. २५ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत राज्यातील ६५ (३१%) लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून APAAR आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून दि. ३० नोव्हेंबर, २०२४ पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

केंद्र शासनाचे निर्देश विचारात घेवून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन / सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये 'APAAR दिवस' साजरा करण्यात यावा.

सदर दिवशी APAAR आयडी बनविण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहिम राबविण्यात यावी.

जिल्हा स्तरावरून APAAR आयडीबाबत शाळेच्या मुख्याध्यापक यांची ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करून सर्व शाळांचा आढावा घेवून संबंधितांना सूचना दयावा.

दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी प्रशासनाधिकारी मनपा, गटशिक्षणाधिकारी यांनी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून APAAR आयडी तयार करण्याची कार्यवाहीचा आढावा घ्यावा.

सर्व जिल्ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे APAAR आयडी उपलब्ध करून देण्याबाबत विशेष प्रयत्न करावे.


(आर. विमला, भा.प्र.से.) 

राज्य प्रकल्प संचालक,

म.प्रा.शि.प., मुंबई


यु-डायस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक, इयत्ता १ली ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांना APAAR आयडी दि. ३० नोव्हेंबर, २०२४ पर्यंत उपलब्ध करून देणेबाबत MPSP ने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


संदर्भ : १) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. F. No.१- २७/२०२३-DIGED-Part (१) दि. २१/१०/२०२४.

२) कार्यालयाचे जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/ २०२४-२५/३१५४ दि. २३/१०/२०२४ रोजीचे पत्र.

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये यु-डायस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक, इयत्ता १ली ते १२वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला APAAR आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरु केला आहे. सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याबबत केंद्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली दि. ०६/११/२०२४ रोजी झालेल्या आढावा मिटिंगमध्ये सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना APAAR आयडी तयार करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहे.

राज्यातील जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर व तालुका स्तरावरील डेटा एन्ट्री ऑपरेटर व MIS-Coordinator यांना APAAR आयडी तयार करण्याचे प्रशिक्षण देवून सर्व मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण घेण्याकरिता कळविण्यात आले आहे. प्रशिक्षण दरम्यान केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले सादरीकरण, व्हिडिओ, मार्गदर्शक सूचना अडचणी सोडविण्यासाठी टोल फ्री नंबर, कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना व ऑनलाईन प्रात्यक्षित करून दाखविण्यात आले आहे. पालकांकडून शाळास्तरावर उपलब्ध करून दिलेल्या संमती पत्रानुसार APAAR आयडी तयार करण्यात यावे.

याबाबत आपणास कळविण्यात येते की, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२४ पर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी शाळा स्तरावरून उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा स्तरावर विशेष मोहिम राबविण्यात यावी. APAAR आयडी संदर्भात केंद्र शासनाकडून वारंवार पाठपुरावा होत आहे. त्यामुळे सदर बाब प्राधान्याने हाताळावी, ही विनंती.


सोबत : केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले पत्र.


आर. विमला,

राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.



यु-डायस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक, इयत्ता १ली ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करणेबाबत मार्गदर्शक सूचना 


संदर्भ : १) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O.No.۹- २७/२०२३-DIGED-Part (१) दि. ०२/०९/२०२४ रोजीचे पत्र.

२) कार्यालयाचे जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/ २०२४-२५/२८८१ दि. २५/०९/२०२४ रोजीचे पत्र.

३) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. F.No.१-२७/ २०२३-DIGED-Part (१) दि. २१/१०/२०२४ रोजीचे पत्र.


उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये केंद्र शासनाकडून देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांला APAAR आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरु केला आहे. संदर्भिय पत्र क्र. १ व २ नुसार राज्यातील प्रथम प्राधान्याने यु-डायस प्रणालीमधून इयत्ता ९वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याकरिता संदर्भिय पत्रात नमूद आहे.

संदर्भिय क्र. ३ नुसार केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करण्यासाठी कळविण्यात आले असून यु-डायस सॉफ्टवेअरमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे. APAAR आयडी उपलब्ध करुन देण्यासाठी संदर्भिय क्र. १ व २ नुसार मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून दिल्या आहे. त्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे सर्व विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करण्याची कार्यवाही पूर्ण करून घेण्यात यावी.


APAAR आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देताना पुढील मुद्यांच्या प्रामुख्यांने समावेश करण्यात यावा :-

APAAR आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने संदर्भिय पत्र क्र.०१ व ०२ नुसार केंद्रशासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना व या कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना व प्रशिक्षण जिल्हयाचे सर्व संगणक प्रोग्रामर व तालुक्याचे MIS Coordinator यांना देण्यात आले असून शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्याकरीता कळविण्यात आले आहे.

APAAR आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने Parent Teacher Meeting (PTMs) शाळास्तरावर आयोजित करुन पालकांकडून ना-हरकत प्रमाणपत्र (consent form) भरुन घेण्यात यावे.

APAAR आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण गट स्तरावरुन प्रशिक्षण देण्यात यावे व दररोज आढावा घेण्यात यावा.

APAAR आयडी तयार करण्याचा राज्यस्तरावरुन दररोज आढावा घेण्यात येईल तसेच, विद्या समिक्षा केंद्रामार्फत त्याचा आढावा घेण्यात येईल. याचप्रमाणे, जिल्हा व तालुका स्तरावरुन APAAR आयडी तयार करण्याबाबत दररोज आढावा घेण्यात यावा व सदर अहवाल विभागीय उपसंचालक, शिक्षण संचालक, आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयास पाठविण्यात यावा.

APAAR आयडी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्यानंतर सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना सदर आयडी हा विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर प्रिंट करण्यासाठी कळविण्यात यावे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्येक आठवडयाला आढावा घेऊन ज्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना APAAR आयडी तयार करुन का दिले नाहीत याबाबत आढावा घ्यावा व त्याबाबतचा अहवाल आयुक्त कार्यालयास व या कार्यालयास पाठविण्यात यावा.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी जिल्हयातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्याने दि.२०/११/२०२४ पर्यंत APAAR आयडी उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे.


सोबत : केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले संदर्भिय पत्र.


 (आर. विमला, भा.प्र.से.)

राज्य प्रकल्प संचालक,

म.प्रा.शि.प., मुंबई.


प्रत: माहितीस्तव सविनय सादर,

मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई


प्रत: उचित कार्यवाहीस्तव -

१) मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

२) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

३) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.

५) शिक्षणाधिकारी (माध्यमिक व उच्च माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.


महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार यु-डायस प्लस प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करणेबाबत मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे. 


केंद्र शासनाकडून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांला APAAR आयडी तयार करून घेण्याकरिता कळविले आहे. APAAR आयडी तयार करण्यासाठी केंद्र शासनाने यु-डायस प्रणालीच्या विद्यार्थी प्रणालीमध्ये (SDMIS) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना एक महिन्याचा कालावधीमध्ये प्रथम प्राधान्याने इयत्ता ९वी ते इयत्ता १२वी च्या विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याकरिता संदर्भिय पत्रात नमूद आहे.

यु-डायस प्लस प्रणालीमधून APAAR आयडी तयार करण्यासाठी राज्य कार्यालयाकडून पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे.


APAAR आयडी उपयोगिता :-

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

APAAR आयडी हा १२ अंकी असून एकमेव असणार आहे. विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित असणार आहे.

यु-डायस प्लस प्रणालीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आधार Validation झाले आहे त्याच विद्यार्थ्यांचे APAAR आयडी Generate होतील.






APAAR आयडीमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा (OoSC) मागोवा घेणे, गळतीचे प्रमाण कमी करण्यात मदत करणे, इ. बाबीं डिजिटल नियंत्रित करण्यात येतील.

APAAR आयडी तयार झाल्यानंतर Digi locker ला जोडण्यात येणार आहे. Digi locker ला जोडल्यामुळे विद्यार्थ्यांने शिक्षण क्षेत्रामध्ये साध्य केलेले लक्ष्य, इयत्ता १०वी व १२वी बोर्ड परीक्षेचे निकाल, holistic report card and extracurricular accomplishments ऑनलाईन पध्दतीने बघता येईल.

APAAR आयडी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत इतर जिल्हा व राज्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने पाठविणे सुलभ होईल.

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे APAAR आयडी विद्या समिक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार असून त्या माहितीवर Graphical Analysis करण्यात येईल व प्रगती करण्याच्या अनुषंगाने नवीन उपक्रम राबविण्यात येतील.

जबाबदारी :-

महाराष्ट्र राज्याकरिता राज्यस्तरावरून राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा महाराष्ट्र राज्य हे Nodal Officer असणार आहेत.

APAAR आयडी तयार करण्याबाबत राज्यस्तरावरील MIS-Coordinator, जिल्हा स्तरावरील Coordinator यांचे APAAR आयडी Creation बाबतचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

शाळा स्तरावर APAAR आयडी Create करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी Parent Teacher Meeting आयोजित करून Consent by Father/Mother/Legal Guardian of Student for APPR ID Generation हा फार्म भरून घेवून पुढील कार्यवाही करावी. याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना https://apaar.education.gov.in/resource या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

यु-डायस प्लस प्रणाली व विद्या समिक्षा केंद्रामार्फत राज्यामध्ये APAAR आयडी तयार करणे व व्यवस्थापन करणे याकरिता सहकार्य करण्यात येणार आहे.

APAAR आयडी तयार करणे व वापर करण्याबाबत राज्य व जिल्हाररावर प्रशिक्षण देऊन सर्वांना APAAR आयडीबाबत संकेत स्थळावरून माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

केंद्र शासनाने APAAR आयडी संदर्भात किंवा तांत्रिक सहाय्य मिळण्यासाठी   https://apaar.education.gov.in/ 

हे पोर्टल विकसित केले आहे व १८००-८८९-३५११ हा टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे.


सोबत : केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले संदर्भिय पत्र.


(आर. विमला, भा.प्र.से.)

राज्य प्रकल्प संचालक,

म.प्रा.शि.प., मुंबई. 


संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


 संपूर्ण भारतात कुठेही प्रवेश घेण्यासाठी आता एक विद्यार्थी एक राष्ट्रीय आयडी तयार करण्याची केंद्र शासनाने सुचित केले आहे. 


APAAR Automated Permanent Academic Account Registry  नेमकं काय आहे? त्याचा उपयोग काय? 


विद्यार्थी, पालक आणि शाळांसाठी APAAR ID चा वापर

✓ APAAR आयडी अद्वितीय स्वरूपाचा असेल आणि एक राष्ट्र, एक विद्यार्थी म्हणून काम करेल सर्व वापराच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना ओळख देणारे ओळखपत्र आणि विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसर्‍या शाळेत, राज्य इ. मध्ये हस्तांतरित करणे सोपे होईल.

✓ हे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या ओळखपत्रासह सक्षम करेल.

✓ हा युनिक आयडी आजीवन असेल आणि शैक्षणिक संसाधनांमध्येही प्रवेश करण्यात मदत होईल 

✓ APAAR आयडी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि यशाचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त ठरेल;

✓ APAAR आयडी गळती झालेल्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे;

✓ APAAR आयडी डिजीलॉकर इकोसिस्टममध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार असेल जे विद्यार्थ्यांच्या सर्व उपलब्धी जसे की परीक्षेचे निकाल, समग्र अहवाल कार्ड, हेल्थ कार्ड, शैक्षणिक परिणाम याशिवाय विद्यार्थ्यांच्या इतर उपलब्धी मग ते ऑलिम्पियाड, क्रीडा, कौशल्य प्रशिक्षण किंवा कोणतेही क्षेत्र डिजिटली संग्रहित करेल.

विद्यार्थी भविष्यात त्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा रोजगाराच्या उद्देशाने क्रेडिट स्कोअर वापरू शकतात.

✔APAAR आयडी अनेक वापराच्या प्रकरणांसाठी देखील वापरला जाईल उदा., NTA द्वारे घेतलेल्या प्रवेश चाचण्या, प्रवेश, शिष्यवृत्ती वितरण, सरकारी लाभ हस्तांतरण, पुरस्कार जारी करणे, विद्यार्थी, शिक्षक आणि इतर वापरकर्त्यांसाठी. 

विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि कामगिरीचा आढावा घेण्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र Automated Permanent Academic Account Registry (APAAR ) ID पालकांच्या पूर्वसंमतीने निर्माण करण्यात येणार आहे.


विद्यार्थ्यांसाठी स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी (APAAR) आयडी तयार करण्याच्या संदर्भात  केंद्र शासनाच्या सूचना पुढीलप्रमाणे. 


2. तुम्हाला माहिती आहे की NEP 2020 विद्यार्थ्यांना जागतिक नागरिक किंवा भविष्यातील नेते होण्यासाठी प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करते जे सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये विविधता स्वीकारणारे जागतिक नागरिक म्हणून विकसित होण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी सक्षम करेल. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि यशाचा मागोवा घेण्याच्या या प्रयत्नात, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक अद्वितीय आयडी तयार केला जाईल जो "एक राष्ट्र. एक विद्यार्थी आयडी" चे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करेल. हा युनिक आयडी आजीवन असेल आणि शैक्षणिक संसाधनांमध्येही प्रवेश करण्यात मदत होईल.


APAAR आयडी डिजीलॉकर इकोसिस्टममध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार असेल जे विद्यार्थ्यांना परीक्षेचे निकाल, सर्वांगीण अहवाल कार्ड, शिकण्याचे परिणाम यांसारख्या विद्यार्थ्यांच्या सर्व उपलब्धी डिजिटली संग्रहित करण्यास अनुमती देईल आणि विद्यार्थ्यांच्या इतर यशांव्यतिरिक्त ते OLYMPIAD, क्रीडा, कौशल्य प्रशिक्षण किंवा कोणतेही क्षेत्र असेल. विद्यार्थी भविष्यात त्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा रोजगाराच्या उद्देशाने क्रेडिट स्कोअर वापरू शकतात.


3. या प्रयत्नात, MoE प्रत्येक विद्यार्थ्याच्या आधार क्रमांकावर आधारित APAAR आयडी तयार करेल ज्यासाठी पालकांची स्वतंत्र संमती आवश्यक आहे. असा गोळा केलेला डेटा गोपनीय ठेवला जाईल आणि इतर सरकारी वापरकर्त्यांसोबत डेटा शेअर करताना आधार क्रमांक मास्क केला जाईल.


4. वरील बाबी लक्षात घेता, 16 ते 18 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सलग 3 दिवस विशेष पेटीएम धारण करून पालकांची संमती (परिशिष्ट- I) मिळविण्यासाठी कृपया तुमच्या अखत्यारीतील शाळांना निर्देश द्यावेत आणि यापैकी काही असल्यास दिवस शाळेला सुट्ट्या आहेत, नंतर दुसर्‍या दिवशी सुट्ट्या असू शकतात. APAAR ID चा वापर परिशिष्ट II मध्ये जोडलेला आहे. संमतीच्या आधारावर, शाळा डेटा भरताना UDISE डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांना संमती दिलेल्या होय किंवा नाही म्हणून चिन्हांकित करू शकतात.


वरील संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.