शिक्षण विभागातील या कर्मचाऱ्यांच्या पगारात दहा टक्के वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा संभाजीनगर येथील बैठकीत निर्णय

 आज दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ ची बैठक संभाजीनगर औरंगाबाद येथे पार पडली या बैठकीत शिक्षण विभागा अंतर्गत दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यापैकी एक म्हणजे समग्र शिक्षा मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमातंर्गत करार पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्य स्तरावरील कार्यालयात ६४ व जिल्हा स्तरावरील कार्यालयात ६१८७ असे एकूण ६२५१ कर्मचारी यांना याचा लाभ मिळेल. अतिरिक्त निधी राज्य शासनाच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल.

या कर्मचाऱ्यांच्या मानधनापोटी २२९ कोटी ५६ लाख एवढा वार्षिक खर्च येतो. मानधनात १० टक्के वाढ केल्यामुळे २५२ कोटी ५२ लाख इतका खर्च येईल.

वरील येण्याबरोबरच राज्यातील शाळा दत्तक योजना संदर्भात देखील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
संभाजीनगर येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या परिस्थितीत घेतल्या गेलेल्या सर्व मंत्रिमंडळ निर्णयाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.