CHATBOT PAT ऑनलाइन गुण नोंदणी महत्त्वपूर्ण अपडेट.


CHATBOT PAT ऑनलाइन गुण नोंदणी करताना येणाऱ्या काही अडचणी व त्यावरील उपाय पुढील प्रमाणे.


आपण एप्लीकेशन ओपन केल्यानंतर आपल्या शाळेतील काही विद्यार्थी एप्लीकेशन वर दिसून येतात तर काही विद्यार्थी दिसून येत नाही असे का?


कोरोना कालावधीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने स्वाध्याय उपक्रम सुरू केला होता सदर स्वाध्याय उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याच्या मोबाईलवरून भरायचा होता ज्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस स्वाध्याय उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला अशा विद्यार्थ्यांचे नावे यामध्ये आहेत इतर विद्यार्थ्यांचे स्टुडन्ट पोर्टल वरून नावे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे संपूर्ण नावे स्टुडन्ट हॉटेलची चेकबोट वर आल्यानंतर आपल्याला त्यांची देखील माहिती भरता येईल.


दुसऱ्या शाळेतून विद्यार्थी आला असेल तर तो दिसत नाही?

याची देखील उत्तर हेच आहे की स्टुडन्ट पोर्टलला आपण त्याला अटॅच केले असेल तर तो आपल्याला डेटा अपडेट झाल्यानंतर दिसेल..


जे जास्तीचे विद्यार्थी दिसत आहेत त्यांच्याबाबत काय करायचे?

शाळेत नसणारे या अगोदर शाळेत असणारे दुसऱ्या शाळेत गेलेले विद्यार्थी आपल्या शाळेत गुण भरताना दिसत आहेत सदर विद्यार्थ्यांची गुण आपण भरायचे नाही किंवा त्यांना अनुपस्थित देखील दाखवायचे नाही त्यांची माहिती प्रलंबित ठेवायची आहे जेव्हा स्टुडन्ट पोर्टलवरून CHATBOT वर माहिती अपडेट होईल अशावेळी सदर विद्यार्थी त्या त्या शाळेवर दिसतील व आपल्या शाळेवरून कमी होतील.


आपण विद्यार्थी माहिती भरत असताना वर्ग निवडला विषय निवडला व विद्यार्थी माहिती भरण्यास सुरुवात केली माहिती भरताना आपण मध्येच नंतरचा विद्यार्थी भरण्याचे ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला मुख्यमणीवर किंवा मागे येता येत नाही जर आपले आपण मागे आलात तर अगोदर भरलेली सर्व माहिती सेव न होता ती माहिती आपल्याला परत भरावी लागू शकते त्यामुळे काळजीपूर्वक शेवटचा विद्यार्थी माहिती म्हणजेच गुण भरल्यानंतर पुढील विद्यार्थ्यांचे गुण भरा हे ऑप्शन न निवडता त्यानंतरचे मेन्यू चे ऑप्शन निवडावे.

जर पुढील विद्यार्थ्यांची माहिती भरा असे ऑप्शन निवडले असेल तर आपल्याला भरलेलाच विद्यार्थी निवडून त्याचे गुण परत भरावे लागतील व त्यानंतर मेन्यू बदलून घ्यावा लागेल.

VSK राज्य समन्वयक यांचेशी आपल्याला आलेल्या काही प्रॉब्लेम बाबत चर्चा झाल्या नंतर राज्यस्तरावर याबाबत technical team  सोबत चर्चा सूरु आहे.


जर वर्गातील विद्यार्थी दिसत नसतील तर आपले स्टुडन्ट पोर्टल वरील विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट पाठवून ते स्टुडन्ट पोर्टलवर घ्यावे विद्यार्थी आपल्याला चाट बुक मध्ये देखील दिसतल.

जास्तीचे विद्यार्थ्यांना डिटॅच करावी म्हणजेच ज्या शाळेत केले आहेत त्या शाळेत दिसतील.आपण खालील मुद्द्याच्या अनुषंगाने PAT चे काम करा


1. ज्यांचे शालार्थ ID आहेत अशाच शिक्षकांनी गुण भरावेत,आश्रमशाळा व अन्य सेवार्थ मधील शिक्षकांनी भरू नये.


2 इयत्ता 5 वि इंग्रजी विषयाच्या गुणांकनात तफावत असल्याने सध्या इंग्रजी वगळून इतर गुण भरावेत,2 दिवसात इंग्रजी बाबत बदल होणार आहे.


3. जे विद्यार्थी  BOT मध्ये दिसत नाहीत त्यांचे गुण भरता येणार नाही,याबाबत DATA UPDATE  चे काम सुरू आहे.


4. काही वेळा इयत्ता select होते मात्र विद्यार्थी दिसत नाही ,काळजी करू नका ते नंतर भरण्यासाठी वेळ दिला जाईल.


5. जे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत किंवा दुसऱ्या शाळेतून  आलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत हजर किंवा गैरहजर काही करु नयेत. ते विद्यार्थी तसेच असुदेत. 


6. काही शिक्षकांच्या अन्य ठिकाणी बदल्या झाल्याने सध्याच्या शाळेत नाव दिसत नाही,त्या ठिकाणी  सध्या जैसे थे असू द्या.


7.ज्या शाळेवर शिक्षक नाहीत मात्र अन्य शाळेतील शिक्षक व्यवस्थापन करतात,अशा शाळेतील विद्यार्थ्यांचे गुण सध्या भरू नये.


सप्टेंबर 2023 ला सर्व deta update झाल्यानंतर त्या शाळेचे  गुण भरता येतील. ..काळजी नसावी


             


नमस्कार,


17 ऑगस्ट 2023 ते 19 ऑगस्ट 2023 दरम्यान घेण्यात आलेल्या बेसलाइन परीक्षेतील गुण भरण्यासाठी कृपया खालील सूचनांचे अनुसरण करा.


1. Android उपकरणांसाठी Play Store वरून Swiftchat ॲप  डाउनलोड करा आणि नोंदणी करा (link: https://bit.ly/Switftchat ) 


2. नोंदणी केल्यानंतर PAT महाराष्ट्र VSK चॅटबॉटवर जाण्यासाठी चॅटबॉट लिंक वापरा (link: https://bit.ly/PAT-MH)


3. बेसलाइन परीक्षेसाठी गुण कसे सबमिट करायचे हे समजून घेण्यासाठी दिलेल्या वापरकर्ता मॅन्युअलमधील सूचनांचे अनुसरण करा (user manual: https://bit.ly/PATManual)


4. दिलेल्या आधारभूत चाचणीतील सर्व प्रश्नांसाठी गुण सबमिट करावेत अशी सर्वांना विनंती.


5. दिलेल्या विषयाचे गुण सबमिट केल्यावर वेगळ्या विषयाचे गुण भरण्यासाठी होम मेनूवर जाऊ शकतात.


6. चुकून भरलेल्या मार्क होम मेनू मध्ये जाऊन परत भरता येईल आणि डेटा लेटेस्ट कॅप्चर होईल.


 


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

8 Comments

 1. जास्तीचे विद्यार्थी कसे detach करावे

  ReplyDelete
  Replies
  1. स्टुडन्ट पोर्टल क्लिअर केल्याबरोबर होतात

   Delete
 2. चुकून language तेलगू झाली तर ती मराठी कशी निवडावी...

  ReplyDelete
 3. परत सर्व विद्यार्थ्याचे मार्क भरता येतात

  ReplyDelete
 4. Udise invalid dakhvat ahe

  ReplyDelete
 5. शिक्षक कोड चुकीचा सांगत आहेत

  ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.