शैक्षणिक सत्र 2023-24 पासून सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार!

 राज्यातील सर्व विद्यार्थी व पालकांसाठी आनंदाची बातमी आहे! 

कारण शैक्षणिक सत्र 2023-24 पासून सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार! 

शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांनी घोषित केल्यानुसार शैक्षणिक सत्र 2023 24 पासून सरकारी व अनुदानित शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे.

या अगोदर सरकारी शाळांमध्ये व शासकीय अनुदानित शाळांमध्ये सर्व मुलींना अनुसूचित जाती मधील मुलांना अनुसूचित जमाती मधील मुलांना व दारिद्र्यरेषेखालील मुलांना वगळता इतर मुलांना आपला गणवेश विकत घ्यावा लागत होता. परंतु आता सरसकट सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे मोफत गणवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे आता जे विद्यार्थी सरकारी किंवा शासकीय शाळेत किंवा शासकीय अनुदानित शाळेत शिक्षण घेत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना गणवेश स्वतः खरेदी करायची गरज नाही शाळेतूनच त्यांना तो मोफत मिळेल.

अर्थातच ही योजना स्वयंअर्थसाहित व विनाअनुदानित शाळांसाठी लागू असणार  नाही अशा स्वयमअर्थसाहित व विनाअनुदानित शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र गणवेश विकत घ्यावा लागेल.

या अगोदर काही विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळायचा व काही विद्यार्थ्यांना तो स्वतः खरेदी करावा लागायचा यामुळे मुला-मुलांमध्ये भेदभाव दिसून यायचा. हा भेदभाव सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मोफत मिळत असल्यामुळे आता दूर होईल. यामुळे सदर निर्णयाचे शिक्षक व पालक वर्गांकडून स्वागत होत आहे.

शाळेमधून आपण मुला-मुलांमधले भेद जातीपाती मधले भेद दूर करण्याचा प्रयत्न करतो परंतु काही शासकीय योजनांमुळे विशिष्ट वर्गातील विद्यार्थ्यांनाच त्या योजना लागू होत असल्यामुळे असा भेद शाळेपासूनच सुरू होतो. परंतु आता सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार असल्यामुळे हा भेद काही प्रमाणात का होईना कमी होणार आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments