MAHATET 2024 Exam Maharashtra Update - टीईटी २०२४ परीक्षा नवीन शुद्धिपत्रक ऑनलाइन अर्ज कसा भरावा MSCE ची अधिकृत सूचना

दिनांक: 30/09/2024

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 4

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - 2024

प्रसिद्धीपत्रक

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा सन २०२४ चे आयोजन दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी करण्यात आले आहे. सदर परीक्षेचे आवेदनपत्र दिनांक ०९/०९/२०२४ रोजी सुरु केले असून आवेदनपत्र दिनांक ३०/०९/२०२४ रोजी रात्री ११.५९ पर्यंत भरु शकतात. परंतु परीक्षा शुल्क दिनांक ०३/१०/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंत करु शकता,


(अनुराधा ओक)

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ०४





शुद्धिपत्रक 
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः बैठक-२०२१/प्र.क्र./१५३/टीएनटी-१ दि.३० जून २०२२ अन्वये राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबिय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्यात आले नुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नवीन टेंब उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

२) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रक क्र. दिव्यांग-२०२१/प्र.क्र.५४/दि.क.२ दिनांक-१३ सप्टेंबर २०२२ अन्वये Mental behavior / Mental illness (मानसिक बर्तन/ मानसिक आजार) / Multipal disability (बहुविकलांग) हा टैब ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये उपलब्ध करुन दिला आहे.

३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. आरटीई २०१३/प्र.क्र.९१/प्राशि-१ दिनांक २३ ऑगस्ट २०१३ अन्वये राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करील ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची मुभा राहील. या मुद्या नुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदनपत्रामध्ये नवीन विकल्प दिला आहे.





महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ Maharashtra Teacher Eligibility Test - 2024


कृपया प्रत्येक सूचना वाचून नोंदणीला जा.

सूचना :

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.

१. पोर्टल लॉगीन,

२. ऑनलाईन नोंदणी.

३. आवेदनपत्र भरणे.

४. अर्जातील माहितीची पडताळणी करणे.

५. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे,

६. आवेदन पत्राची प्रिंट घेणे.

१ ऑनलाईन नोंदणी


अर्ज भरण्याविषयीच्या सूचना www.mahatet.in या संकेतस्थळाच्या Homepage वरील डाव्या बाजूस असलेल्या 'महाटीईटी-२०२४ उपक्रम • मधील लॉगीन या बटणावर क्लिक करून 'उमेदवाराची नवीन नोंदणी या बटनावर क्लिक करा उघडलेल्या पेजवरील अर्ज भरण्याविषयीच्या सूचना काळजीपूर्वक वाचून पानाच्या शेवटी असलेल्या मी वरील सर्व सूचनांचे वाचन केले आहे. आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ साठी अर्ज भरू इच्छितो / इच्छिते, या पर्यायासमोरील चेक बॉक्स सिलेक्ट करा, नोंदणी फॉर्म भरण्यासाठी नवीन नोंदणी या बटनावर क्लिक करा.

नवीन नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.

अर्जदाराचे प्रथम युजर नेम /पासवर्ड / नाव/प्रथम नाव/ मधले नाव / आडनाव / ई-मेल आयडी/ मोबईल क्रमांक वरील माहिती अचूक भरून झाल्यावर "Submit" या बटनावर क्लिक करा. नोंदणी. नोंदणीकृत केलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी नवीन युजर नोंदणीसाठी वापरता येईल.


२. पोर्टल, लॉगीन

www.mahatet.in या संकेतस्थळाच्या Homepage वरील डाव्या बाजूस असलेल्या 'महाटीईटी-२०२४ उपक्रम मधील लॉग इन

(परीक्षार्थी) या Tab वर क्लिक करा. उघडलेल्या पेजवरील उजव्या बाजूस असलेल्या रकान्यात आपला TET रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड भरून "Submit" या बटनावर क्लिक करा. पासवर्ड विसरला असल्यास "फॉरगॉट पासवर्ड" या पर्यायाचा वापर करा.


आवेदनपत्र भरणे

प्राप्त झालेल्या TET युजरनेम आणि पासवर्ड द्वारे Login करून अर्ज भरण्याच्या पुढील टप्प्यावर, जा, लॉगीन केल्यानंतर आवेदनपत्र भरण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.


i) अर्जदारा विषयी माहिती -

एस.एस.सी. प्रमाणपत्रा प्रमाणे अर्जदाराचे प्रथमनाव, वडिलांचे / पतीचे नाव, आडनाव भरा. जर नावात कोणता बदल असेल तर बदलेल्या नावाची माहित दया.

अर्जदार पुरुष, स्त्री अथवा ट्रान्सजेन्डर आहे हे ते अचूकपणे निवडा.

एस.एस.सी. प्रमाणपत्रानुसार जन्म दिनांक, एस.एस.सी. प्रमाणपत्र क्रमांक, उत्तीर्णतिचे वर्ष, महिना व बैठक क्रमांक अचूकपाने भरा. आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक यापैकी एक पर्याय निवडून उघडलेल्या चौकटीत संबंधीत क्रमांक अचूक नमूद करा.

राष्ट्रीयत्व भरा आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्यास 'होय' अथवा नसल्यास 'नाही' वर क्लिक करा.


ii) अर्जदाराच्या संपर्काविषयी माहिती-

यामध्ये सर्व्हे क्रमांक, घर क्रमांक, गल्ली क्रमांक, शहराचे / गावाचे पोस्ट (असल्यास) ठिकाण टाईप करावे. जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडावे iii) अर्जदाराच्या जातीचा प्रवर्ग आणि इतर माहिती-

जातीचा प्रवर्ग Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

दिव्यांग असल्यास होय' अथवा नसल्यास नाही पर्याय निवडा. होय पर्यायावर क्लिक केल्यास दिव्यांगत्वाचा प्रकार, दिव्यांगत्वाची टक्केवारी, प्रमाणपत्र क्रमांक, लेखनिक हवा की नाही याची माहिती अचूकपणे नोंदवा (दिव्यांग व्यक्तींना लेखनिक पुरविण्याबाबत तसेच अनुग्रह कालावधीबाबत अनुज्ञेयता मार्गदर्शक सूचना www.mahatet.in या संकेतस्थळावर तपासून पहाव्यात.)


iv) अर्जाचा स्तर (पेपर । / पेपर ।।) -

ज्या वर्गासाठी (स्तरासाठी) शिक्षक पात्रता परीक्षा द्यावयाची आहे ते Dropdwon लिस्ट मधून अचूकपणे निवडा. इयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर १) आणि इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर २) साठी अर्जदार पात्र असल्यास आणि दोन्ही परीक्षेस बसण्यास इच्छुक असल्यास 'Both / दोन्ही साठी हा पर्याय निवडा. (दोन्ही पेपरसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.


v) परीक्षा माध्यम आणि केंद्राविषयी माहिती-

अर्जदाराने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यसाठी जे माध्यम निवडलेले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरले जाईल. द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. यापरीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल. प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य असेल. तसेच प्रथम भाषा (उर्दू बंगाली/गुजराती/तेलगु/सिंधी/कन्नडा/हिंदी) निवडल्यास 

द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल.

उर्दू माध्यम निवडले असल्यास, दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी (non-language sections) उर्दू आणि इंग्रजी भाषेत (द्विभाषिक) प्रश्न असतील.

जर मराठी / इंग्रजी किंवा इतर माध्यम (जर की कन्नडा, तेलगु, गुजराती, हिंदी, सिंधी आणि बंगाली) निवडलेले असल्यास दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी (non-language sections) मराठी आणि इंग्रजीभाषेत (द्विभाषिक) प्रश्न असतील. guage अर्जदार ज्या जिल्हा केंद्रावर परीक्षा देणार आहे. है. तो जिल्‌हा Dropdown लिस्ट मधून अचूकपने निवडा.


vi ) शैक्षणिक पात्रता-

शैक्षणिक पात्रता या मुद्यामध्ये पेपर १ (कनिष्ठ प्राथमिक स्तर) या साठी एस.एस.सी. पात्रतेविषयी माहिती भरावी तसेच एच.एस.सी. ची, पदवी, पदव्युतर पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रता (असल्यास) त्याची माहिती, कोर्स, बोर्ड / विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण, टक्केवारी/ श्रेणी व शततमक/श्रेणी याबाबत अचूकपणे नोंद करावी. पेपर २ (वरिष्ठ प्राथमिक स्तर) या साठी एस.एस. सी. आणि पदवीची पात्रतेविषयी माहिती भरावी, तसेच एच.एस.सी. पदव्युतर पदवी आणि इतरशैक्षणिक पात्रता (असल्यास) त्याची माहिती, कोर्स, बोर्ड / विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्तगुण, एकूण गुण, टक्केवारी / श्रेणी व शततमक / श्रेणी याबबात अचूकपणे नोंदकरावी.


vii) व्यावसायिक पात्रता-

व्यावसायिक पात्रता मध्ये शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड. किंवा समकक्ष) अथवा शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड. किंवा समकक्ष) बाबतची माहिती पदवी / पदविकेचे नाव, विद्यापीठ / परीक्षा मंडळ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी, शततमक / श्रेणी अचूकपणेनोंदवा. अर्जेदार शिक्षणशास्त्र पदवी किंवा शिक्षणशास्त्र पदविका दोन्ही उत्तीर्ण असल्यास दोन्हींची माहिती अचूकपणे नोंदवा. पदव्युतर शिक्षणशास्त्र पदवी (असल्यास) त्याविषयीची माहिती नोंदवा.


TET Update


अर्जदाराने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरले जाईल.


🔥द्वितीय भाषा अचूकपणे निवडा.

➡️ या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल. 

➡️प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य असेल. 

➡️तसेच प्रथम भाषा (उर्दू / बंगाली / गुजराती / तेलगू / सिंधी / कन्नड / हिंदी) निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल.


उर्दू माध्यम निवडले असल्यास, दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी (non-language sections) उर्दू आणि इंग्रजी भाषेत (द्विभाषिक) प्रश्न असतील.


जर मराठी / इंग्रजी किंवा इतर माध्यम (जसे की कन्नड, तेलगु, गुजराती, हिंदी, सिंधी आणि बंगाली) निवडलेले असल्यास दोन्ही पेपर करित्ता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी (non-language sections) मराठी आणि इंग्रजीभाषेत (द्विभाषिक) प्रश्न असतील



महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4 कार्यालयातून निर्गमित दिनांक 9 सप्टेंबर 2018 24 रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा बाबत प्रसिद्ध पत्रकार नुसार ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. 


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-१०/११/२०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे.


इ. १ली ते ५वी व इ.६ वी ते इ.८वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक - ०९/०९/२०२४ पासून सुरु होत असुन दिनांक ३०/०९/२०२४ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधितांनी याची नोंद घ्यावी. ही विनंती.

दिनांक व कालावधी

ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी

०९/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४

प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढुन घेणे

२८/१०/२०२४ ते १०/११/२०२४

३. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक व वेळ

दि.१०/११/२०२४ वेळ १०.३० AM ते १३.०० PM

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ

दि.१०/११/२०२४ वेळ १४.०० PM ते १६.३० PM


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४



महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 (MAHATET) जाहिर प्रकटन


प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) प्रविष्ठ होणेकरिता शैक्षणिक / व्यावसायिक अर्हता प्राप्त परीक्षार्थीकडून अर्ज मागविणेबाबत.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ वेळापत्रक


१. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी

०१/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४


प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर। दिनांक व वेळ

२८/१०/२०२४ से १०/११/२०२४


शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 11 दिनांक व वेळ


दि.१०/११/२०२४ वेळ १०.३० AM ते १३.०० PM दि.१०/११/२०२४ वेळ १४,०० PM ते १६.३० PM


* काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, उमेदवारासाठी अद्यायावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल,


टिप:

१. परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मुल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासननिर्णय परिषदेच्या वेबसाईट https://mahatet.in वर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सुचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा.


२. अर्ज भरताना परीक्षाथीनी इ.१० वी, इ.१२ वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादि बाबतची माहिती मुळ प्रमाणपत्रावरुनच भराबी, स्कैन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कंन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणा पत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावयाची असल्याने सोबत देवावी.

३. सदर परीक्षेत प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क Email, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करुन ठेवावा, पेपर। (प्राथमिक स्तर) व पेपर II (उच् प्राथमिक स्तर) दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ठ होता इच्छिणान्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी (प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर) असा बिकल्प निवडावा, जेणेकरुन परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची उगवश्यकता नाही.

४. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ Online अर्ज करता येईल, ऑफलाईन आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन, बैंकिंग, क्रेडिटा डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही) परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. नीतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरुपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.

५. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही,

६. ऑनलाईन आवेदनपत्रासोवत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही, तसेच, आवेदनपत्र/कागदपत्रे (प्रमाणपत्रे) गटशिक्षणाधिकारी/शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.

७. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मुळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल,

८. एका पेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही,


९. सन २०१८ व २०१९ च्या टीईटी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली आहे. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही? याबाबत खात्री करुन वस्तूनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी. आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहिल, तसेच या २०१८ व २०१९ यादी मध्ये समाविष्ठ असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ठ झाल्यास कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी.

१०. सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द केले जातील, त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासाचे,


हेल्पलाईन नंबर

९०२८४७२६८१/८२/८३


माहिती स्त्रोत

दुरध्वनीद्वारे सहाय्य उपलब्धता वेळ सकाळी १०.०० ते सायं ६,००


सविस्तर माहितीकरिता संकेतस्थळ

 https://mahatet.in

स्थळ : पुणे

दिनांक : ०१/०९/२०२४

उपायुक्त

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४


संपूर्ण प्रसिद्ध पत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा. 

Download


महाराष्ट्रासाठी शिक्षक अभियोग्यता परीक्षा म्हणजेच टीचर्स एलिजिबिलिटी एक्झामिनेशन TET 2024 मध्ये ऑगस्ट महिन्यात होणार असल्याचे संकेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष यांनी दिले आहेत. 


वर्ग पहिली ते आठवीसाठी शिक्षक म्हणून काम करण्यासाठी सदर परीक्षा आवश्यक करण्यात आलेली आहे. 


 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेकडे अनेक उमेदवार डोळे लावून बसले आहेत. परंतु परीक्षा परिषदेतर्फे टीईटी घेण्याबाबत तयारी सुरू असून, येत्या ऑगस्ट महिन्यात ही परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे उमेदवारांना आणखी काही दिवस परीक्षेची वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे. काही जिल्ह्यांत पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या असून, काही ठिकाणी लोकसभा व विधानपरिषदेच्या आचारसंहितेमुळे नियुक्तीची प्रक्रिया रखडली आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु, टीईटी घोटाळा समोर आल्यावर २०२१ नंतर एकही टीईटी परीक्षा घेतली गेली नाही. त्यातच टीईटी परीक्षा ऑनलाइन घ्यावी की ऑफलाइन यावर लवकर निर्णय झाला नाही. मात्र, आता टीईटी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असून, त्यादृष्टीने परीक्षा परिषदेतर्फे तयारी केली जात आहे. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे म्हणाले, परीक्षा परिषदेतर्फे टीईटी घेण्याबाबत तयारी सुरू आहे. त्यासाठी आवश्यक कार्यशाळा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा येत्या ऑगस्ट महिन्यात घेण्याचे नियोजन आहे.




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ही वेबसाईट.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.