ब्रेकिंग न्युज.
राज्यातील सर्व जिल्हा परिषद मध्ये बदली झालेले शिक्षक एकाच दिवशी म्हणजे 16 मे रोजी कार्यमुक्त होऊन 17 मे रोजी नवीन शाळेवर उपस्थित होतील..
दिनांक 4 मे 2023 रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या सन 2022-23 जिल्हा अंतर्गत बदल्यांबाबत शासन निर्णय निर्गमित करून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.
या विभागाच्या दिनांक ०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हांतर्गत बदल्या ह्या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने करण्याची कार्यवाही पुर्ण झालेली आहे.
२. यास अनुसरुन असे कळविण्यात येते की, सन २०२२ मधील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील ज्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये याचिकाकर्त्यांची बदली करण्यात येवू नये किंवा याचिकाकत्यांच्या बदलीस स्थगिती देण्याबाबत मा. न्यायालयाचे निर्देश आहेत, असे शिक्षक वगळता अन्य शिक्षकांना शासनाने संदर्भ क्र. २ येथील दि. २४.०२.२०२३ च्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार कार्यमुक्त करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी.
याचा अर्थ असा की दिनांक 24 फेब्रुवारी 2023 च्या आदेशानुसार दिनांक एक मे 15 मे 2023 दरम्यान बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश निर्गमित करणे व दिनांक 16 मे ते 31 मे 2023 दरम्यान शिक्षकांना कार्यमुक्त करून बदली झालेल्या शाळेत रुजू होण्याची कार्यवाही करावी असे निर्देश ग्राम विकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना दिले आहेत.
यामधील फक्त न्यायालयीन प्रकरणात असलेले शिक्षक यांच्याबाबत सदर कार्यवाही होणार नाही जे न्यायालयीन प्रकरणात नाही अशा शिक्षकांना दिनांक 31 मे पर्यंत आपल्या शाळेतून कार्यमुक्त होऊन बदली झालेल्या शाळेत रुजू व्हावे लागेल.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments