महाराष्ट्रात आता 36 नव्हे तर 58 जिल्हे.. अजून एकूण 22 जिल्हे प्रस्तावित!

 महाराष्ट्र राज्यामध्ये आता असलेल्या 36 जिल्ह्या ऐवजी 58 जिल्हे होऊ शकतात याचे कारण म्हणजे राज्यात जवळपास 22 नवीन जिल्ह्यांची मागणी होत आहे व ते प्रस्तावित देखील आहेत एक मे 1960 रोजी 26 जिल्ह्याचे आपलं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं अनेक जिल्हे हे लोकसंख्या आणि आकाराच्या दृष्टीने मोठे होते मात्र प्रशासकीय कामासाठी नागरिकांची गैरसोय होऊ लागली त्यानंतर आजपर्यंत आपल्या राज्यात नवीन 10 जिल्ह्याची भर पडून ते 36 जिल्हे झाले. मात्र अजूनही गावातून येणाऱ्या नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्ण दिवस प्रवासात जातो त्यामुळे आता राज्यात आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे.




महाराष्ट्र राज्यात एकूण नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव व यादी समोर आली आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 10 मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांची नवीन मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य तयार झाली त्यानंतर तब्बल वीस वर्षांच्या कालखंडात म्हणजेच तब्बल दोन दशकात आणखी दहा नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली मात्र आजही आणखी काही जिल्हे तयार करण्याची मागणी होत आहे.

वास्तविक महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील एका शेवटच्या टोकावरील गावातील नागरिकांना जर जिल्हा मुख्यालयाला भेट द्यायची असेल तर त्याला पूर्ण दिवस खर्च करावा लागतो यामुळे नागरिकांच्या वेळात वेळेचा तसेच पैशांचा अपव्य होतो.

जिल्ह्याची कामे करण्यासाठी नागरिकांना तब्बल एक ते दोन दिवस घालवावे लागतात त्याचा खर्च तो वेगळाच अशा परिस्थितीत खेड्यापाड्यातील नागरिकांना देखील जिल्ह्यांची दळणवळण सुलभ व्हावे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात एकूण 22 नवीन जिल्हे तयार करण्याचे नियोजन प्रस्तावित आहे या 22 जिल्ह्यांची मागणी शासनाकडे प्रस्तावित आहे.

महाराष्ट्र राज्यातील सुरुवातीचे 26 जिल्हे.

भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर महाराष्ट्रात 26 जिल्हे तयार करण्यात आले यामध्ये ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुबुलढाणा, हमदनगर अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होता.


महाराष्ट्र राज्यातील नवीन तयार झालेले दहा जिल्हे.


 रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असे दोन नवीन जिल्हे तयार झाले.

औरंगाबाद जिल्ह्याची विभाजन होऊन जालना व औरंगाबाद असे दोन नवीन जिल्हे तयार झाले.

 धाराशिव जिल्ह्याचे विभाजन झाले आणि नवा लातूर जिल्हा तयार झाला

 बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन झाले आणि मुंबई उपनगर हा जिल्हा तयार झाला.

 अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन अकोला व वाशिम असे दोन जिल्हे तयार झाले.

धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन धुळे व नंदुरबार असे दोन जिल्हे तयार झाले.

 परभणी जिल्ह्याचे विभाजन झाले आणि नवीन हिंगोली जिल्हा तयार झाला.

 विदर्भातील भंडारा या जिल्ह्याचे विभाजन होऊन त्यातून नवीन गोंदिया जिल्हा तयार करण्यात आला.

 ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि नवीन पालघर जिल्हा बनवण्यात आला.


महाराष्ट्रात नवीन प्रस्तावित असलेले 22 जिल्हे.


नाशिकचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन नवीन जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

ठाणे जिल्ह्याचे पुन्हा एकदा विभाजन करून मीरा-भाईंदर आणि कल्याण असे दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये जव्हार हा नवीन जिल्हा तयार होऊ शकतो.

पुणे जिल्ह्यातून विभाजन करून शिवनेरी जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.


रायगड मधून महाड हा वेगळा जिल्हा तयार करण्यात येऊ शकतो.

सातारा जिल्ह्यातून माणदेश नावाचा वेगळा जिल्हा तयार होऊ शकतो.

रत्नागिरी मधून मंडणगड नावाचा नवीन जिल्हा तयार करण्याची नियोजन आहे.

बीड या जिल्ह्यामधून आंबेजोगाई नावाचा वेगळा जिल्हा तयार होऊ शकतो.

लातूर मधून उदगीर नावाचा जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.

जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.

बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन होऊन खामगाव हा नवीन जिल्हा तयार होऊ शकतो.

अमरावती जिल्ह्याचे विभाजन होईल आणि अचलपूर नावाचा नवीन जिल्हा प्रस्तावित आहे.

यवतमाळ जिल्ह्यातून विभाजित होऊन पुसद नावाचा नवीन जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.

भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून साकोली नावाचा नवीन जिल्हा प्रस्तावित आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन प्रस्तावित असून त्यातून चिमूर नावाचा नवीन जिल्हा तयार होऊ शकतो.

गडचिरोली या जिल्ह्याचे देखील विभाजन करणे प्रस्तावित असून अहेरी नावाचा नवीन जिल्हा तयार केला जाऊ शकतो.


वरील जिल्हे शासन स्तरावर प्रस्तावित आहेत शासन स्तरावरून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती होईल हे  अजून तरी निश्चित नाही.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.