🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रति,
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती सर्व
प्रशासनाधिकारी नगरपालिका सर्व जिल्हा
............................................
विषय - सामूहिक कवायत संचालन माहिती सरल प्रणालीत भरणेबाबत..
दिनांक २६ जानेवारी २०२६ सोमवार सकाळी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या सामूहिक कवायत या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्ह्यातील सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये करणेबाबत आपणास यापूर्वीच पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. आपल्या अधिनस्त सर्व 100% प्राचार्य व मुख्याध्यापक यांचेकडून सदर माहिती भरून घ्यावी करिता खालील प्रमाणे कार्यवाही करावी
१. सर्वप्रथम www.education.gov.in
www.education.gov.in या वेबसाईड वर जाऊन school पोर्टल लॉगिन करावे
२. लॉगिन झाल्यानंतर प्रजासत्ताक दिन सामूहिक कवायत या tab वर क्लिक करावे
३. सामुहिक कवायत अपलोड पेज ओपन झाल्यानंतर तेथे शाळा नाव,udies क्रमांक.जिल्हा ,तालुका ही माहिती आधीच दिसेल
४. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकाचे नाव, मोबाईल नंबर ,ई-मेल id नोंदवा.
५. त्यानंतर कवायतीमध्ये किती विद्यार्थी व शिक्षक ,पालक सहभागी झाले ही संख्या अचूक नोंदवावी
६. कार्यक्रमाबददल् किमान 2/3 ओळीत माहिती प्रोग्रॅम detail मध्ये भरावी.
७. शेवटी प्रोग्रम फोटो (pdf मध्ये 1 MB मध्ये ) अपलोड करावा व सदर उपक्रमाचा व्हिडीओ देखील काढून त्याची लिंक बनवून व्हिडीओ लिंक या tab मध्ये पेस्ट करावी आणि सदर data व्हेरिफाय करून फायनल करावे .सदर काम सामूहिक कवायत पूर्ण झाल्यानंतर तात्काळ सकाळीच पूर्ण करावे. काही मुख्याध्यापकांना तांत्रिक अडचणी आल्यास केंद्रातील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्यावी. केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग असणाऱ्या 100% शाळांनी माहिती नोंदवली की नाही याची खात्री दुपारी बारा वाजेपर्यंतच करावी.
8. सोबत user मॅन्युअल फ्लो चार्ट
सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक( सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापन ) यांनी या सूचनेची गांभीर्याने नोंद घेऊन सूचनेप्रमाणे वेळेत कार्यवाही करावी.
शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व योजना
जिल्हा परिषद बुलढाणा
....................................
दि 25 जानेवारी 2026
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.






0 Comments