"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान टप्पा-३ (सन २०२५-२६) बाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालयाने दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ : १. शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१३८/एसडी-६, दिनांक १६/१०/२०२५.
२. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. आशिका/मुमंमाशासुशा/२०२५/१४४/१/१५१४२४८ /२०२५, दि.३०/१०/२०२५
३. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. आशिका/मुमंमाशासुशा/२०२५/१४४/१/१५६९५४३ /२०२५, दि.२८/११/२०२५,
४. संचालनालयाचे पत्र जा.क्र. शिसंमा/मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा/ए-२/विद्या शाखा/२०२५-२६/१५७५७४२ दि.०२/१२/२०२५
५. संचालनालयाचे पत्र जा.क्र. शिसंमा/मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा/ए-२/विद्या शाखा/२०२५-२६/५५६४ दि.१०/१२/२०२५.
६. संचालनालयाचे पत्र जा.क्र. शिसंमा/मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा/ए०२/विद्या शाखा/२०२५-२६/५६०६ दि.१५/१२/२०२५
७. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण२०२५/प्र.क्र.१३८/ एसडी-६ दिनांक १५/१२/२०२५
८. संचालनालयाचे पत्र जा.क्र. जा.क्र. शिसेमा/मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा/ए-२/विद्या शाखा/२०२५-२६/५५०७ व ५५०६ दि.१८/१२/२०२५
९. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. आशिका/आस्था-१४४/ मुर्ममाशासुशा/२०२५/१६१४३५९/२०२५, दि.१९/१२/२०२५.
१०. संचालनालयाचे पत्र क्रमांक जा.क्र. शिसंमा/मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मुदतवाढ/ए-२/विद्या शाखा/२०२५-२६/५६६२/दि.१९/१२/२०२५
११. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. आशिका/मुर्ममाशासुशा/२०२५/आस्था-१४४/१६३५३४१/२०२५, दि.३०/१२/२०२५
१२. संचालनालयाचे पत्र क्रमांक जा.क्र. शिसंमा/मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मुदतवाढ/ए-२/विद्या शाखा/२०२५-२६/५७१७/दि.३१/१२/२०२५
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, संचालनालयाच्या संदर्भ क्रमांक ४, ५, ८, १० व १२ च्या पत्रान्वये सन २०२५-२६ मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३ या अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता राबविण्यात येत आहे. असे सूचित करण्यात आलेले आहे.
शिक्षण आयुक्तालयाच्या संदर्भ क्रमांक २ च्या पत्रान्वये सदर अभियान राबविण्याबाबतच्या सर्वकष सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तसेच संदर्भ क्रमांक ७ च्या शासन निर्णय दिनांक १५/१२/२०२५ अन्वये शाळांच्या गुणांकनाबाबतच्या सुधारित सूचना देण्यात आलेल्या आहेत.
उक्त प्रकरणी दोन्ही शासन निर्णयातील सुचना आपले स्तरावर सविस्तर गुणांकन करणाऱ्या समितीच्या निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच दिनांक १६/१०/२०२५ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक ४ मध्ये नमूद उपक्रमाबाबत शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या उपक्रम/अभियान/योजनांची अद्ययावत स्थिती गुणांकन करताना विचारात घेण्यात यावी.
तथापि, दिनांक ०२/०१/२०२६ रोजी ५०३० शाळांनी माहिती अपूर्ण भरलेली आहे. (जिल्हानिहाय दिनांक ०२/०१/२०२६ रोजीचा अहवाल सोबत जोडला आहे.) प्रलंबित शाळांनी माहिती अंतिम करण्यास दिनांक ०४/०१/२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी सर्व शाळांनी माहिती अंतिम होईल याची दक्षता घेण्यात यावी.
केंद्रस्तरावर मूल्यांकन बाबतची माहिती दिलेली आहे. केंद्र स्तरावर विहित कालावधीत दिनांक ०९ जानेवारीपर्यंत 100% शाळांचे मूल्यांकन पूर्ण करण्यात यावे. (सोबत अहवाल जोडला आहे.)
सदर अभियान कालमर्यादित आहे सदर काम वेळेत पूर्ण होण्याबाबत आपल्या स्तरावरुन आपल्या जिल्हयातील सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांची व्ही.सी. आयोजित करून मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३ अभियानामध्ये माहिती भरण्यास सूचित करावे. तसेच आपल्या अधिनस्त सर्व १०० टक्के शाळा अभियानात माहिती भरतील याची दक्षता घ्यावी.
(डॉ. सुचिता पाटेकर)
शिक्षण उपसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा
महत्वाची सूचना
1. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-3 मध्ये शाळांना माहिती भरुन अंतिम करण्यासाठी दिनांक 05/01/2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे.
2. वरील कालावधीत शाळांनी त्यांच्या स्तरावरुन माहिती अंतिम न केल्यास शाळांनी भरलेली माहिती ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्येच अंतिम असल्याचे गृहीत धरुन ती Auto Finalized करण्यात येईल, याची संबंधित सर्व शाळांनी नोंद घ्यावी.
3. केंद्र स्तरावरुन शाळांनी भरलेल्या माहितीचे मूल्यांकन करण्यासाठी दिनांक 25/12/2025 पासून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. तरी, वेळापत्रकानुसार दिनांक 09/01/2026 पर्यंत केंद्र स्तरावरील मूल्यांकन पूर्ण करणे आवश्यक आहे, याची संबंधित समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) यांनी नोंद घ्यावी.
महत्वाची सूचना
1. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-3 मध्ये दिनांक 19.12.2025 रोजीच्या पत्रान्वये निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार शाळांना माहिती भरुन अंतिम करण्यासाठी दिनांक 29/12/2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
2. तथापि, अदयापही ब-याच शाळांची माहिती अंतिम झालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळांना माहिती अंतिम (Finalize) करण्यासाठी दिनांक 01/01/2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे, याची नोंद घ्यावी.
3. तसेच शाळांनी माहिती भरण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता तातडीने दिलेल्या मुदतीत माहिती अंतिम (Finalize) करावी.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पप्पा क्रमांक ३ रजिस्ट्रेशन लिंक.
https://education.maharashtra.gov.in/schoolMMSSS/users/login/4
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन माहिती ऑनलाईन करण्यासाठी कोरा पीडीएफ फॉरमॅट
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 अपलोड करण्यासाठी फोटो यादी डाउनलोड
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 टाईप करावयाची माहिती डाउनलोड
महत्वाची सूचना!
1. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-3 मध्ये दिनांक 28.11.2025 रोजीच्या पत्रान्वये निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार शाळांना माहिती भरून अंतिम करण्यासाठी दिनांक 19/12/2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
2. तथापि, अद्यापही अनेक शाळांची माहिती अंतिम झालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळांना माहिती अंतिम (Finalize) करण्यासाठी दिनांक 29/12/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
3. शाळांनी माहिती भरण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता, दिलेल्या मुदतीत तातडीने माहिती अंतिम (Finalize) करावी.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान टप्पा-३ (सन २०२५-२६) राबविणे बाबत ..
संदर्भः १. शासन निर्णय, क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१३८/एसडी-६. दि. १६ ऑक्टोबर, २०२५
२. या कार्यालयाचे पत्र क्र. आशिका/मुमंमाशासुशा/२०२५/१४४, दि. ३०/१०/२०२५
३. शासन निर्णय, क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१३८/ एसडी-६, दि. १५ डिसेंबर, २०२५
संदर्भाधिन विषयांकित प्रकरणी, संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३ हे अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता राबविण्यात येत आहे.
संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये सदर अभियान राबविण्याबातच्या सर्वकष सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तसेच संदर्भीय शासन निर्णय दि. १५/१२/२०२५ अन्वये शाळांच्या गुर्णाकनाबाबतच्या सुधारित सुचना देण्यात आलेल्या आहेत.
उक्त प्रकरणी दोन्ही शासन निर्णयातील सुचना आपले स्तरावरुन सविस्तर गुणांकन करणा-या समितीच्या निर्दशनास आणून द्याव्यात. तसेच दि. १६/१०/२०२५ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. ४ मध्ये नमूद उपक्रमाबाबत शाळेमध्ये राबविण्यात येणा-या केंद्र व राज्यशासनाच्या उपक्रम/अभियान/योजनांची अद्ययावत स्थिती गुणांकन करताना विचारात घेण्यात यावी.
तथापि आज दि. १९/१२/२०२५ रोजी ३८०२२ शाळांनी माहिती भरण्यास सुरुवात केल्याने दिसून येते तर २६६७६ शाळांनी माहिती अंतिम केलेली आहे. प्रलंबित शाळांना माहिती अंतिम करण्यास दि. २९/१२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी सर्व शाळांनी माहिती अंतिम होईल याची दक्षता घेण्यात यावी.
केंद्रस्तरावर मुल्यांकनासाठी समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) यांच्या लॉगिनला दि. २५/१२/२०२५ रोजी उपलब्ध करुन देण्यात येईल.
सचिन्द्र प्रताप सिंह, भा.प्र.से.)
आयुक्त, शिक्षण
महाराष्ट्र राज्य, पुणे
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-३ अभियानातील गुणांकन पद्धतीबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
वाचा:
- १) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्र. संकीर्ण२०२५/प्र.क्र.१३८/एसडी-६. दि.१६.१०.२०२५.
२) आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आशिका /२०२५/मुमाशासुंशा/आस्था-१४४/१५४७८०४/२०२५ दि.१८.११,२०२५.
प्रस्तावना :-
सन २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत अनुक्रमे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा १ व टप्पा २ हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता राबविण्यात आले होते. संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-३ हे अभियान सन २०२५-२६ मध्ये काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयातील शाळा मुल्यांकनाचे सर्व निकष हे सर्व शाळा व्यवस्थापन/शाळा प्रकार यांना लागू होत नसल्याने तशी आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत विविध निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे. सदर निवेदनांच्या अनुषंगाने संदर्भ क्र.२ अन्वये आयुक्त (शिक्षण) यांच्याकडून प्राप्त प्रस्तावास अनुसरुन, संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयातील गुणांकन पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.
शासन निर्णय :-
संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयातील प्रस्तावित केलेले शाळा गुणांकनांचे निकष हे सर्व शाळा व्यवस्थापन / शाळा प्रकार यांना यथास्थित लागू होत नसल्याचे संदर्भ क्र. २ अन्वये प्राप्त प्रस्तावात नमूद केले आहे. संदर्भ क्र.२ अन्वये प्राप्त प्रस्तावास अनुसरुन ज्या शाळांना संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयातील काही विशिष्ट गुणांकन निकष लागू होत नाहीत, त्या शाळांचे गुणांकन केवळ त्यांना लागू होणाऱ्या निकषांच्या गुणांच्या आधारेच करण्याबाबत, आणि अशा प्रकारे शाळांनी प्राप्त केलेले गुण टक्केवारीमध्ये रूपांतरित करून त्या टक्केवारीच्या आधारे शाळांचे मुल्यांकन करण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे.
२. तसेच शैक्षणिक संपादणूक (क-१) या घटकामध्ये विषयनिहाय विदयार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता (PAT नुसार) तपासताना सदरची संकल्पना ही इ.१ ते ८ वीच्या वर्गासाठी लागू आहे. त्यामुळे विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी शैक्षणिक संपादणूक तपासताना PAT ऐवजी CCE संपादणूक पातळी /इ.१०वी-१२वी निकाल/इ. ९वी व ११वी चा सत्र-१ व २ चा निकाल आवश्यकतेनुसार तपासण्यात यावे.
३. याबाबबतची पुढील आवश्यक कार्यवाही आयुक्त (शिक्षण) यांच्या स्तरावरुन करण्यात येईल.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५१२१५१६११००३०२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
TUSHAR VASANT MAHAJAN
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन माहिती ऑनलाईन करण्यासाठी कोरा पीडीएफ फॉरमॅट
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 अपलोड करण्यासाठी फोटो यादी डाउनलोड
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 टाईप करावयाची माहिती डाउनलोड
"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान टप्पा-३ (सन २०२५-२६) राबविणे बाबत.. शिक्षण आयुक्तांनी दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पप्पा क्रमांक ३ रजिस्ट्रेशन लिंक.
https://education.maharashtra.gov.in/schoolMMSSS/users/login/4
संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१३८/एसडी-६, दिनांक १६ ऑक्टोबर, २०२५ २. क्र. आशिका/मुमंमाशासुशा/२०२५/१४४/१/१५१४२४८/२०२५, दि. ३०/१०/२०२५
सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि. ०१.०१.२०२४ ते दि. १५.०२.२०२५ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.
२/- सन २०२४-२५ (टप्पा-२) मध्ये सदर अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.२९.०७.२०२४ ते दि. १५.०९.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानात जवळपास ९७.६२८ शाळांनी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले.
३/-संदर्भ क्र.१ वरील शासन निणर्यान्वये शासनाने सन २०२५-२६ मध्ये देखील "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा ३" या अभियानाचा कालावधी दि. ०३ नोव्हेबर २०२५ ते दि.३१ डिसेंबर २०२५ यादरम्यान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर अभियान राबविण्याबाबत सूचना संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये देण्यात आलेल्या आहेत.
४/- या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र, तालुका, जिल्हा, मनपा, विभाग, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करुन ते सोबत जोडले आहे. शासन निर्णय, दि. १६/१०/२०२५ अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करुन माहिती अंतिम करावयाची आहे.
५/- सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरुपाचे असून त्याचा मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो. त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच शाळांकडून वा इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल. त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही. याची देखील नोंद घ्यावी. याबाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचित करावे.
वरीलप्रमाणे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीनुसार व कार्यपद्धतीनुसार विहित वेळापत्रकाप्रमाणे कामकाजाचे अचूक नियोजन करुन सदर टप्पा-३ अभियान हे यशस्वीरित्या पार पाडले जाईल याची सर्वांनी वैयक्तिकरित्या दक्षता घ्यावी.
Digitally signed by SACHINDRA PRATAP SINGH Date: 28-11-2025 18:11:59
(सचिन्द्र प्रताप सिंह, मा.प्र.से.)
आयुक्त,
शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३" अभियान (सन २०२५-२६)
१. शाळामूल्यांकन वेळापत्रक :
अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा सोमवार, दि.०१/१२/२०२५ ते शुक्रवार दि. १९/१२/२०२५
ब) केंद्रस्तर/युआरसीः
दि.२०/१२/२०२५ शनिवार (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दि.०९/०१/२०२६ शुक्रवार सायं.०५.०० वा. पर्यंत
क) तालुका : दि. २२/१२/२०२५ सोमवार (केंद्र/युआरसी पातळीवरुन अंतिम झालेली) ते दि. १६/०१/२०२६ शुक्रवार सायं.०५.०० वाजेपर्यंत
ड) जिल्हा:
दि.०१/०१/२०२६ गुरुवार (तालुका पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि. २२/०१/२०२६
गुरुवार सायं. ०५.०० वा. पर्यत
इ) मनपाः
दि.०१/०१/२०२६ गुरुवार (ब्लॉक पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि.२२/०१/२०२६
गुरुवार सायं. ०५.०० वा. पर्यत
ई) विभाग :
दि.१५/०१/२०२६ गुरुवार ते दि. २८/०१/२०२६ बुधवार सायं. ०५.०० वाजेपर्यत
उ) राज्य : दि. २७/०१/२०२६ मंगळवार ते दि.०३/०२/२०२६ मंगळवार सायं. ०५.०० वाजेपर्यत
२. मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक -
विवरण
स्तरसमिती करीता लॉगइन सुविधा
गो लाईव्ह
मूल्यांकनाचा अंतिम दिनांक
२. केंद्रस्तर समिती
२०/१२/२०२५ ते ०९/०१/२०२६
३. तालुका तालुकास्तर समिती
२२/१२/२०२५ ते १६/०१/२०२६
मनपा/जिल्हा मनपा/जिल्हास्तर समिती
०१/०१/२०२६ ते २२/०१/२०२६
४. विभाग विभागस्तर समिती
१५/०१/२०२६ ते २८/०१/२०२६
५. राज्य राज्यस्तर समिती
२७/०१/२०२६ ते ०३/०२/२०२६
केंद्र सर्व: प्रत्येक सहभागी शाळांचे मूल्यांकन करणे अभिप्रेत आहे.
तालुका : प्रत्येक केंद्रातून प्रत्येक गटातून पहिली १ शाळा तालुक्याने मूल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.
जिल्हा : तालुक्यातील पहिली १ शाळा प्रत्येक गटातून १ शाळा जिल्हा समितीने मूल्यांकन करावे, त्या मधून निवड होईल.
मनपा : युआरसीमधील पहिली १ शाळा प्रत्येक गटातून १ शाळा समितीने मूल्यांकन करावे, त्या मधून निवड होईल.
विभाग : जिल्हयातील पहिली १ शाळा प्रत्येक गटाकरीता मूल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.
राज्यस्तर : प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकामधील शाळांमधून प्रत्येक गटातील १ शाळा मूल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक 1
मुद्दा निहाय रेकॉर्ड तयार करण्यासाठी पीडीएफ डाउनलोड.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन हे अभियान राबविणे पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
वाचा:
- १. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. मुमंअ-२०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दि.३०.११.२०२३
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. मुमंअ-२०२४/प्र.क्र.५२/एसडी-६. दि.२६.०७.२०२४
प्रस्तावना :-
संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.०१.०१.२०२४ ते दि.१५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.
तसेच संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक ०२ अन्वये सन २०२४-२५ (टप्पा-२) मध्ये सदर अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.२९.०७.२०२४ ते दि.१५.०९.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानात जवळपास ९७,६२८ शाळांनी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले.
या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरुपात पारितोषिके देण्यात आली व या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनास देण्यात आली. त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागविण्याकरीता निधी उपलब्ध झाला. अर्थात या भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यामध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैत्यन निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले ही बाब अधिक महत्वाची आहे. विविध प्रकरचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला.
उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन २०२५-२६ मध्ये देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा ३ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णयः-
सन २०२५-२६ मध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा-३" हे अभियान राबविण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
१. अभियानाची व्याप्ती-:
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे.
या अभियानासाठी शाळांची विभागणी अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.
सदर अभियान अ) बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र ब) वर्ग अव वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच क) उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर खालीलप्रमाणे राबविण्यात येईल.
२. अभियानाची उद्दिष्टे :-
1) शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे.
ii) शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे.
iii) शालेय शिक्षणाच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे.
३. अभियानाचा कालावधी:-
i) दि.२४ ऑक्टोबर, २०२५ ते दि. ०२ नोव्हेंबर, २०२५ हा कालावधी अभियानाच्या पूर्व तयारीसाठी असेल. या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता आयुक्त (शिक्षण) यांच्या मार्गदर्शनानुसार विभागाच्या अधिकाधिक क्षेत्रीय कार्यालयांनी घ्यावी. सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी, याबाबत सर्वतोपरी प्रयत्न या कालावधीत करण्यात यावेत.
ii) दि. ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल. सदर अभियानाचा कालावधी दि.३१ डिसेंबर, २०२५ रोजी पूर्ण होईल.
iii) दि.०१ जानेवारी २०२६ ते दि.०७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी.
iv) त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभसंपन्न होईल.
४. अभियानाचे स्वरूपः-
४.१ अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल.
अ) पायाभूत सुविधा - ३८ गुण
ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी - १०१ गुण
क) शैक्षणिक संपादणूक - ६१ गुण
मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा ३ संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
मुख्य मंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा टप्पा २👇
शिक्षण आयुक्तांनी दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन राबविणे बाबत शाळा मूल्यांकनाचे सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे निश्चित केले आहे.
शासन निर्णयान्वये सन २०२४-२५ मध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २" हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. या कार्यालयाच्या संदर्भ क्र.२ व ३ वरील पत्रान्वये या बाबतच्या सविस्तर सूचना व शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरील मूल्यांकन यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे.
२/- सदर अभियानांतर्गत सदयस्थिती शाळास्तरावरुन माहिती भरण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले होते. तथापि, या बाबत अनेकवेळा सूचना देऊनही अदयापही शाळांकडून माहिती भरुन तो अंतिम केलेली नाही. त्याअनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
अ) सदर अभियानात भाग घेणाऱ्या ज्या शाळांनी आपली माहिती अपूर्ण भरलेली असेल, त्या सर्व शाळांची माहिती राज्यस्तरावरून दि.०६/०९/२०२४ रोजी आहे त्या स्थितीत अंतिम करण्यात येणार आहेत. यानंतर या शाळांच्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. व सदरची शाळा मूल्यांकनासाठी केंद्र प्रमुख यांच्या लॉगिनला पाठविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
ब) या अभियानात शाळांचा मागील वर्षी (सन २०२३-२४ मध्ये) प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा निम्न क्रमांकासाठी या वर्षीच्या अभियानात विचार केला जाणार नाही. या वर्षीच्या मूल्यांकनात मागील वर्षातील स्तरापेक्षा (क्रमांक) वरच्या स्तरावरील क्रमांक मिळविण्यास या वर्षीच्या निकषाप्रमाणे शाळा पात्र होत असल्यास त्या क्रमांकास शाळा पात्र असतील.
३/- मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे सुधारित वेळापत्रक (अंतिम) :
अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा दिनांक ०६/०९/२०२४
ब) प्रत्येक स्तरावरील मूल्यांकनांचा अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे राहील.
मूल्यांकनाचा अंतिम दिनांक
केंद्रस्तर
सोमवार, दि.०९/०९/२०२४. सायं.०५.०० वा. पर्यंत गुरुवार,
तालुकास्तर
दि.१२/०९/२०२४, सायं. ००५.०० वा. पर्यंत
मनपा/जिल्हास्तर
सोमवार, दि. १६/०९/२०२४, सायं.०५.०० वा. पर्यंत
विभागस्तर
गुरुवार, दि. १९/०९/२०२४, सायं.०५.०० वा. पर्यंत
राज्यस्तर
सोमवार, दि. २३/०९/२०२४, सायं.०५.०० वा. पर्वत
४/- वरील सुधारित वेळापत्रक हे अंतिम असून यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तरी, उक्त सूचना व सुधारित वळापत्रकानुसार सर्व शाळांची वेळेत माहिती भरली जाईल व प्रत्येक स्तरावर शाळांचे योग्य पध्दतीने मूल्यांकन पादृष्टीने कार्यवाहो करण्याची दक्षता घ्यावी. जाईल
अस्पचन (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ अभियान शाळा मूल्यांकन सुधारित वेळापत्रक
शिक्षण आयुक्त यांनी "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन" रबविणे बाबत पुढील प्रमाणे सुधारित आदेश दिले आहेत.
सुधारित शाळा मूल्यांकन वेळापत्रक :
अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा दिनांक ०२/०९/२०२४
ब) केंद्रस्तर : दि.१०/०८/२०२४ शनिवार (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दि.०६/०९/२०२४ शुक्रवार सायं. ०५.०० वा. पर्यंत क) तालुका : दि.१५/०८/२०२४ गुरुवार (केंद्र पातळीवरुन अंतिम झालेली) ते दि.०८/०९/२०२४ रविवार सायं. ०५.०० वा. पर्यंत
ड) जिल्हा :
दि.२०/०८/२०२४ मंगळवार (तालुका पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि.११/०९/२०२४
बुधवार सायं. ०५.०० वा. पर्यंत
३)मनपा : दि. २०/०८/२०२४ मंगळवार (युआरसी पातळीवरुन अंतिम झालेल्यांचे मूल्यांकन) ते दि.११/०९/२०२४ बुधवार
सायं. ०५.०० वा. पर्यंत
ई) विभाग: दि. २५/०८/२०२४ रविवार ते दि.१५/०९/२०२४ रविवार सायं.०५.०० वा. पर्यंत उ) राज्य : दि. ३०/०८/२०२४ शुक्रवार ते दि. १९/०९/२०२४ गुरुवार सायं.०५.०० वा. पर्यंत
महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी दिनांक 29 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान टप्पा-२ राबविणेबाबत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. , २) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, पुणे, ३) शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे, ४) शिक्षण संचालक (योजना), शिक्षण संचालनालय, पुणे., ५) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व), ६) आयुक्त, मनपा (सर्व), ७) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व), ८) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व), ९) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व), १०) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) जिल्हा परिषद (सर्व), ११) शिक्षण निरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर) बृहन्मुंबई, १२) मुख्याधिकारी, नगरपालिका (सर्व), १३) गटविकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व) यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ २०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३ २. शासन निर्णय, क्रमांक: मुमंअ २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६, दिनांक २६ जुलै, २०२४
विषयांकित प्रकरणी, संदर्भ क्र.१ वरील शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.०१.०१.२०२४ ते दि.१५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी पेक्षा अधिक विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी
ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे. त्याबददल आपल्या सर्वांचे अभिनंदन ! २/- या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले ही बाब अधिक महत्वाची आहे. विविध प्रकरचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला.
३/- उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन २०२४-२५ देखील "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २" हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्यावाचतचा संदर्भ क्र.२ वरील शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये अभियानाची व्याप्ती, अभियानाची उदिदष्टे नमूद करण्यात आलेली आहेत. १. "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २० या अभियानाचा कालावधी दि.५ ऑगस्ट २०२४ ते दि.०४ सप्टेंबर २०२४ या दरम्यान एक महिना कालावधीसाठी राहील.
२. शाळा मूल्यांकनासाठी अ) पायाभूत सुविधा ३३ गुण ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी ७४ गुण क) शैक्षणिक संपादणूक ४३ गुण यानुसार एकूण १५० गुणांसाठी मूल्यांकन करण्यात येईल.
३. सोबत जोडलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.
४. वरील संपूर्ण अभियान कार्यकाळात समिती बैठका आयोजन, शासन निर्णयाची अंमलबजावणी, शासनाच्या वेळोवेळी येणा-या सूचनांची अंमलबजावणी समिती अध्यक्षांच्या नेतृत्वात पूर्ण करणे निर्णयाची सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी सदस्य सचिव यांची राहील. नजिकच्या नियंत्रण अधिका-यांनी अभियानाच्या यशस्वीतेकरीता सर्वतोपरी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. ५. अभियानाकरीता मंजूर करण्यात आलेला निधी कोषागारातून आहरित करणे, सर्व क्षेत्रिय कार्यालयांना आवश्यकतेनुसार आयुक्त यांचे मान्यतेने वितरित करणे, निधीचा विनियोग योग्य पध्दतीने होत आहे याची शहानिशा करणे शासनाकडून आवश्यक त्या निधीकरिता पाठपुरावा करणे या सर्व बाबीसाठी लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी संचालक (प्राथमिक) यांच्या संनियंत्रणाखाली सदर कामकाज विहित मुदतीत पूर्ण करावे.
६. अभियानाची राज्य स्तरावरील व्यापक प्रचार-प्रसिध्दी सर्व घटकांपर्यंत करण्याबाबतची जबाबदारी संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्याकडे देण्यात येत आहे.
७. तालुका/जिल्हा/मनपा/विभाग स्तर व राज्य स्तरावरील कार्यालयांमध्ये अभियान कक्षाची निर्मिती करण्यात यावी. अनुक्रमे सदर जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्रशासन अधिकारी (मनपा), विभागीय शिक्षाण उपसंचालक व राज्य स्तरावर सहसंचालक (अंदाज व नियोजन) यांची राहील.
८. अभियानाकरिता आवश्यक असणारे मनुष्यबळ घेण्याची मुभा सर्व स्तरावरील कार्यालय प्रमुख यांना असेल, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शालेय पोषण आहार, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक व अन्य विभागस्तरावर विविध शासकीय कार्यालय,
उदा. राज्य विज्ञान संस्था, मिपा इ. यामधील मनुष्यबळ आवश्यकतेनुसार अधिनस्त कार्यालयास तथा विभागातील उपसंचालक यांच्या कार्यालयात घेण्याची परवानगी देण्यात येत आहे. या बाबत समन्वय अधिकारी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक यांना नेमण्यात येत आहे, विभागीय उपसंचालक यांनी प्रकरणी दक्षतापूर्वक आवश्यक ते आदेश वेळोवेळी निर्गमित करावेत.
९. मूल्यांकन समितीने आवश्यकतेनुसार शाळा मूल्यांकनाची पध्दती प्रत्येक स्तरावर निश्चित करावी. १०. 'सरल प्रणाली' मधील शाळा (संकेतस्थळ) पोर्टलवर मूल्यांकनाकरीता व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक शाळा स्तरावर शाळा लॉगिनमध्ये या अभियानाच्या मूल्यांकनाची प्रश्नावली समोर पीडीएफ छायाचित्र व त्यासमोर शब्दांत विवरण नमूद करण्याचो सुविधा देण्यात आलेली आहे. यूजर मॅन्युअल (User Manual) तयार करुन ते संकेतस्थाळाबर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
११. वरीलप्रमाणे संपूर्ण उपक्रमाचे संनियंत्रण व उक्त घटकातील आपसातील समन्वय या बाबत दैनंदिन देखरेख ठेऊन कार्यक्रम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविला जाईल याची दक्षता घेणे तसेच या बाबत सर्व टिप्पण्या/लेखे/सांख्यिकी माहितों संकलित करणे/जतन करणे व यासंदर्भात मा. मंत्री कार्यालय/मा. प्रधान सचिव व कार्यालय व आयुक्त यांना दैनंदिन अहवालाव्दारे अवगत करणेसाठी शिक्षण उपसंचालक (मुख्यालय) यांना कार्यक्रम समन्वय अधिकारी म्हणून पदनिर्देशित करणेत येत आहे.
४/- या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, मनपा स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करुन ते सोबत जोडले आहे. शासन निर्णय, दिनांक २६.०७.२०२४ अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करुन माहिती अंतिम करावयाची आहे.
५/- सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरुपाचे असून त्याचा मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो. त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थिती बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच शाळांकडून वा इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही, याची देखील नोंद घ्यावी. या बाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचित करावे.
वरीलप्रमाणे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीनुसार व कार्यपध्दतीनुसार विहित वेळापत्रकाप्रामणे कामकाजाचे अचूक नियोजन करुन सदर टप्पा-२ अभियान हे यशस्वीरित्या पार पाडले जाईल याची सर्वानी वैयक्तिकरित्या दक्षता घ्यावी.
( आयुक्त (शिक्षण)
- महाराष्ट्र राज्य पुणे
प्रत माहिती व पुढील कार्यवाहीसाठी,
१. वरिष्ठ तांत्रिक संचालक, एनआयसी, पुणे
. श्री. मुकुंद साईनकर (से.नि. अधिकारी) समन्वयक, एनआयसी, पुणे २
प्रत - १. श्री. अमोल हुक्केरीकर, विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई
२. स्विय सहायक, मा. मंत्री (शालेय शिक्षण) मंत्रालय, मुंबई ३२
३. स्विय सहायक, मा.प्रधान सचिव, (शालेय शिक्षण) मंत्रालय, मुंबई ३२
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर Download क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.














2 Comments
टप्पा 3 चे रजिस्ट्रेशन कसे करावे त्याची लिंक काय आहे
ReplyDeleteअजून सुरू व्हायचे आहे
Delete