शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्विस रेकॉर्डस बाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
क्र. शिसंमा/दि २०२६-२७/टि-६, बी
दिनांक :- ०९/०४/२०२६
प्रति,
श्री. पवन जोशी, बिझनेस अॅनालिस्ट, (शालार्थ सिस्टीम) महाआयटी, मुंबई.
विषय :- शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्विस रेकॉर्डस
संदर्भ- मा. आयुक्त (शिक्षण) यांचे कार्यालयात दि.०८/०४/२०२६ रोजी झालेली चर्चा
शालार्थ प्रणालीवर योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकीत वेतन, वैद्यकीय बील माहे १५. फेब्रुवारी २०२६ पासून खाजगी अनुदानित शाळांमधील अदा करता येणार नाही. ज्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे शालार्थ प्रणालीवरील कागदपत्रे डि.डि.ओ-२/शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक/सचिव रिजेक्ट झाली असल्यास त्याबाबत वैध/अवैधचा निर्णय संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी तातडीने देणे अनिवार्य असेल. तसेच डिडिओ २ स्तरावरील लॉगीन मधून डिजिटल सर्विस रेकॉर्डस या प्रणाली अंतर्गत अपलोड झालेल्या नोंदी संदर्भात आवक नोंदीबाबत कार्यवाही न केल्यास डिडिओ २ यांना त्या देयकांचे MTR 44 A जनरेट करता येणार नाहीत. अशा सुचना संचालनालयाचे पत्र क्र १६८५२९६ दि.२२/०१/२०२६ अन्वये देण्यात आल्या होत्या.
दि.०८/०४/२०२६ च्या मा मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील निर्देशा प्रमाणे पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येत आहे.
ज्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता किंवा शालार्थ आयडी मान्यता आदेश तपासणी अधीक्षक ते विभागीय अध्यक्ष या स्तरावर अमान्य केलेले आहेत तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे डी.डी.ओ-१ स्तरावर काम अद्याप पूर्ण झाले नाही अशा कर्मचाऱ्यांची वेतन व भत्ते अदा करता येणार नाहीत.
Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 09-04-2026 21:26:1
डॉ महेश पालकर
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रतः-
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक), जि. प सर्व
३) शिक्षण निरिक्षक (उत्तर/ दक्षिण पश्चिम) मुंबई.
४) प्रशासन अधिकारी महानगरपालिका/नगरपालिका / नगर परिषद, सर्व.
५) अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (माध्यमिक/प्राथमिक) सर्व.
उपरोक्त आपणास याव्दारे सूचित करण्यात येत आहे की अधीक्षक यांनी त्यांच्या स्तरावरील सर्व प्रलंबित कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासणी माहे एप्रिल २०२६ अखेर पूर्ण करावी.
शिक्षणाधिकारी / विभागीय शिक्षण उपसंचालक / विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावरील तपासणी कामकाज माहे मे. २०२६ पूर्वी पूर्ण करावे.
शालार्थ प्रणाली मधून वेतन व भत्ते घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता व शालार्थ आय डी आदेश कार्यालयीन अभिलेखा प्रमाणे असल्याची खातरजमा करणेबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 27/03/2026 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
प्रति,
१) विभागीय अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य, माध्यमिक उच्च माध्यमिक, विभागीय शिक्षण मंडळ सर्व
२) विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
३) शिक्षण अधिकारी मनपा सर्व
४) प्रशासन अधिकारी मनपा सर्व
५) शिक्षण निरीक्षक (मुंबई उत्तर/दक्षिण/पश्चिम)
६) शिक्षणाधिकारी (माध्यमिक प्राथमिक) सर्व
७) प्रशासन अधिकारी नगरपालिका सर्व
विषयः- शालार्थ प्रणाली मधून वेतन व भत्ते घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता व शालार्थ आय डी आदेश कार्यालयीन अभिलेखा प्रमाणे असल्याची खातरजमा करणेबाबत.
संदर्भः-
१) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६बी.दि.१६.०७.२०२५/१३२८५३२
२) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६बी.दि.२२.०१.२०२६./१६८५२९६
३) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६बी.दि.०४.०३.२०२६./१७५७८५७
४) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६बी.दि.०५.०३.२०२६./१६८५२९६
५) शासन शुध्दीपत्रक क्र. एसएसएन-२०१७/(२०-१७) टीएनटी-२.दि.२३.०८.२०१७
६) शासन निर्णय क्र.: शालार्थ-१११८/प्र.क्र.३०/टीएनटी-३.दि.१०.०६.२०२२
७) शासन निर्णय क्रः एसएसएन-२०१७/(२०-१७) टीएनटी-२.दि.३०.०१.२०२६
संदर्भीय पत्र.क्र १ अन्वये शालार्थ आयडी देताना अनुसरावयाच्या कार्यपध्दती आणि कर्मचारी अभिलेखे डिजीटलाईझ करणेबाबतच्या विस्तृत सुचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार जुलै २०२५ व तदनंतरच्या कालावधीमध्ये खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता बाबतच्या संचिका, शालार्थ मान्यता आदेशांच्या संचिका व या आदेशंच्या प्रती आपणास प्राप्त झाले आहेत किंवा कसे? सदरील मान्यता आदेश आपल्या कार्यालयाकडून निर्गमित झाले आहेत का ? याबाबतची खातरजमा करणेबाबत संदर्भाधिन पत्रान्वये वेळोवळी कळविण्यात आले आहेत. याकरिता आपणास पुरेसा अवधी देण्यात आलेला आहे.
राज्य शासनाकडून शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतन वय भत्ते या पोटी रक्कम अदा केली जाते व त्यामुळे राज्य शासनाच्या ध्येय धोरणानुसार वेतनापाटी अदा करावयाच्या रकमांचा पारदर्शक व गुणात्मक दृष्टीकोनातून हिशोब ठेवणे अनिवार्य आहे.
यासंदर्भात सद्यस्थिती विचारात घेता पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
१. दिनांक १८ नोव्हेंबर २०१६ पासून शालार्थ आयडी मान्यता आदेश देण्याबाचतची कार्यपद्धती कार्यान्वित करण्यात आली आहे. या तारखेनंतर ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ प्रणालीत नाव नमूद करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांच्या शालार्थ मान्यता आदेश असल्याची प्रत आपल्या कार्यालयाकडून किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून निर्गमित झाली आहे का ? याची खातरजमा ०१ एप्रिल २०२६ पूर्वी करणे अनिवार्य आहे
२. खाजगी शाळांमध्ये अनुदानित तत्त्वावरील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडे शिक्षणाधिकारी किंवा विभागीय उपसंचालक यांनी वैयक्तिक मान्यता चे आदेश निर्गमित केलेले आहेत, हे आदेश आपल्या कार्यालयाकडून निर्गमित झाले आहेत काय याची खातरजमा दि ०१ एप्रिल २०२६ पूर्वी करणे अनिवार्य आहे.
३. वैयक्तिक मान्यता आदेश व दि.१८ नोव्हेंबर २०१६ नंतरचे शालार्थ आणि मान्यता आदेश हे आपल्या कार्यालय अभिलेखाप्रमाणे जावक नोंदवही मध्ये नोंदविलेले आहेत काय? याची खातरजमा करणे आवश्यक आहे. आपल्या अधिनस्त अधीक्षक वेतन पचक व भविष्य निर्वाह निधी या कार्यालयाकडे हे आदेश प्रथम देयकासोबत संबंधित कर्मचाऱ्यांच्या किंवा सक्षम प्राधिकारी शिक्षणाधिकारी किंवा विभागीय उपसंचालक यांच्या कार्यालयाकडून या आदेशाची प्रत. त्यांच्या कार्यालयाकडे प्राप्त आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. यामधील पडताळणी अपूर्ण असल्यास सदर काम दि. ०१ एप्रिल २०२६ पर्यंत प्रथम पूर्ण करावे
४. ज्या कर्मचान्यांच्या वैयक्तिक मान्यता आदेश आणि शालार्थ मान्यता आदेश (लागू असल्यास) याबाबतच्या नस्ती व जावक क्रमांक कार्यालयामध्ये सदर आदेश प्राप्त आहेत काय याची खातरजमा दि. १ एप्रिल २०२६ पूर्वी होणार नाही त्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करता येणार नाहीत.
५. ज्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता व शालार्थ मान्यता आदेश तसेच रुजू अहवाल नियुक्ती आदेश संकेतस्थळावर अपलोड केलेले नाही अशा कर्मचाऱ्यांची वेतनभत्ते दि.०१ एप्रिल २०२६ पासून देय करण्यात येणार नाहीत.
६. ज्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आयडी मान्यता आदेश व नस्ती याबाबत अधिक्षक वेतन पथक शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, व विभागीय अध्यक्ष या सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांपैकी कोणत्या एका अधिकाऱ्याने शालार्थ प्रणाली वरील कागदपत्रांची खातरजमा करण्यामध्ये प्रकरण नाकारले असल्यास त्या प्रकरणांचा पाठपुरावा संबंधित संस्था व शाळा मुख्याध्यापकांनी दि. ०१ एप्रिल २०२६ पूर्वी करणे अनिवार्य आहे अन्यथा अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जोपर्यंत नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी मान्यता (लागू असल्यास) याबाबतची खातरजमा होणार नाही तोपर्यंत अशा कर्मचाऱ्यांना वेतनभत्ते अदा केली जाणार नाहीत.
७. ज्या कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांबाबत संशय, किंवा अभिलेखांशी जुळत नाहीत, किंवा कागदपत्रे प्रणाली वरती अद्यावत केलेली नाहीत अशांच्या बाबतीत एकस्तर वरिष्ठ अधिकारी म्हणून सुनावणी घेऊन त्यांच्या वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडीबाबत आदेश पुढील ६० दिवसाच्या आत करण्यात यावे. दि.२३.०८.२०१७, दि.१०.०६.२०२२, व दि.२७.०१.२०२६ च्या शासन निर्णयामध्ये सुचित केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब आवश्यकते प्रमाणे करावा. सुनावणी आदेशात वैयक्तिक मान्यता योग्य असल्याचे मत नोंदवले गेल्यास अशा कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते नंतर अदा करण्याबाबत कार्यवाही करावी.
या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन सर्व क्षेत्रस्तरावर करणे अनिवार्य आहे. शासनाच्या आर्थिक निधीचा दुरुपयोग झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
Digitally signed by
PALKAR MAHESH MADHUKAR Date:
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
प्रत- माहितीस्तव सविनय सादर.
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण क्रिडा विभाग मंत्रालय मुंबई-३२
२) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे-१
प्रत माहितीस्तव -१) मा. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे-३१
२) मा. अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य मंडळ पुणे
३) प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे-०१
४) शिक्षण संचालक (योजना) योजना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे-०१
शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्विस रेकॉर्डस कागदपत्रे अपलोड करणेबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भः संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२५/टि-७/शालाथ/१४७००६१/दि.०६.१०.२०२५
उपरोक्त विषयास अनुसरुन शालार्थ प्रणालीमध्ये पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.
१) शालार्थ प्रणालीवर योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकीत वेतन, वैद्यकीय बील माहे १५. फेब्रुवारी २०२६ पासून खाजगी अनुदानित शाळांमधील अदा करता येणार नाही. ज्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे शालार्थ प्रणालीवरील कागदपत्रे डि.डि.ओ-२/शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक सचिव रिजेक्ट झाली असल्यास त्याबाबत वैध/अवैधचा निर्णय संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी तातडीने देणे अनिवार्य असेल.
२) डिडिओ -२ स्तरावरील लॉगीन मधून डिजिटल सर्विस रेकॉर्डस नोंदी संदर्भात आवक नोंदीबाबत कार्यवाही न केल्यास डिडिओ २ करता येणार नाहीत. या प्रणाली अंतर्गत अपलोड झालेल्या यांना त्या देयकांचे MTR 44 A जनरेट
३) चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे वय ६० पेक्षा जास्त, व इतर करीता वय ५८ पेक्षा जास्त तथा कमांडन्ट पदावरील वय ६२ असल्यास अशा कर्मचा-यांच्या जन्म तारखेबाबत डिडिओ १ व डिडिओ २ यांनी तपासणी करुन जर काही बदल असल्यास उपसंचालक यांच्याकडून सदर जन्म तारीख बदल करुन घेण्याची कार्यवाही १५ फेब्रुवारी २०२६ पूर्वी पूर्ण करावी. याबाबत आवश्यक ते तांत्रीक व्हॅलिडेशन शालार्थ प्रणालीमध्ये होणार आहे.
४) संच मान्यता मधील मंजूर पदांपेक्षा अधिकच्या पदांचे वेतन व भत्ते, थकीत देयके इ. अदा करता येणार नाही.
५) युडायस क्रमांक एका शाळेचा एकच असणे आवश्यक आहे. प्राथमिक/माध्यमिक/यापैकी एका स्तरावर एकाच युडायसवर दोन किंवा अधिक शाळेचे देयक अदा होत असल्यास असे देयक अदा करता येणार नाही.
अधिकची सर्व पदे अकार्यान्वित करण्यात येत आहेत. यापुढे कोणत्याही कारणास्तव पद रिक्त झाल्यास सदर पद अकार्यान्वित करण्यात येईल.
(७) संच मान्यता मंजुर पदापेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असल्यास संचमान्यतेमधील मंजुर पदांच्या मर्यादित पद नव्याने कार्यान्वित करावयाचे असल्यास डि.डि.ओ. १ ऑनलाईन विनंती प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांबाचत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्याकडे करतील. त्याची संचमान्यतेप्रमाणे पडताळणी करुन शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) हे सदर प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पद निर्मितीच्या शिफारशीसह पाठवतील. त्यानुषंगाने विभागीय उपसंचालक यांनी संचमान्यतेतील मान्य पदांच्या मयर्यादित राहून पद निर्मिती करण्याची कार्यवाही करावी.
तरी वरील दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे
Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
प्रतः श्री. पवन जोशी, बिझनेस अॅनालिस्ट, (शालार्थ सिस्टीम) महा आयटी, मुंबई. /- याचाबत आवश्यक ते तांत्रीक बदल शालार्थ प्रणालीवर करण्यात यावेत.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.






0 Comments