अवघड क्षेत्रात असलेल्या शाळेतील शिक्षकाला कार्यमुक्त करण्यात येऊ नये - मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश

नेमका ज्यांच्या बदल्यांसाठी शासन निर्णयानुसार सर्व खटाटोप झाला अशा अवघड क्षेत्रातील शाळेत कार्यरत असलेल्या व बदली प्रक्रियेत बदली झालेल्या शिक्षकांना सध्या कार्यमुक्त करण्यात येऊ नये असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी दिनांक 17 मे 2023 रोजी दिले आहेत.

माननीय आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे हे बदली अभ्यास गटाचे अध्यक्ष देखील आहे त्यामुळे जिल्हा परिषद पुणे यांचा कित्ता इतर जिल्हा परिषदही गिरवू शकतात हे विशेष.

त्यांनी नेमके काय आदेश दिले? 👇


जिल्हा परिषद पुणे अधिनस्त कार्यरत असलेल्या शिक्षकांची महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाचे शासन निर्णय क्र. जिप ४८२० / प्र.क्र. २९० / आस्था-१४ दि. ०७/०४/२०२१ नुसार बदली करण्यात आली आहे. सदर शिक्षक बदली मध्ये अवघड क्षेत्रातील कार्यरत असलेल्या शिक्षकांची बदली ही करण्यात आली आहे. संदर्भ 2 अन्वये सन 2022 मधील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेतील ज्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये याचिकाकर्त्यांची बदली

करण्यात येऊ नये किंवा याचिकाकर्त्याच्या बदलीस स्थगिती देण्याबाबत मा. न्यायालयाचे निर्देश आहेत, असे शिक्षक वगळता अन्य शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत.


त्यामुळे टप्पा क्र. 6 मध्ये बदली झालेले संबंधित शिक्षक रिट पिटिशन क्र. १०२३४/२०२३, ३९१५/२०२३, ३९१३/२०२३, ६११२/२०२३ न्यायालयामध्ये असल्यामुळे अशा शिक्षकांना पुढील आदेश प्राप्त होत नाही तो पर्यन्त त्यांना सध्याच्या शाळेतून कार्यमुक्त करता येणार नाही असे निर्देश दिले आहे.


टप्पा क्र. 6 (अवघड क्षेत्र भरणे) मध्ये न्यायप्रविष्ट बाबीतील संबंधित शिक्षकांची बदली अवघड क्षेत्रातील शाळेमध्ये झाली आहे. अशा अवघड क्षेत्रातील शाळेमधील शिक्षकाची बदली, अन्य ठिकाणी झाली असेल तर मा. न्यायालयाचे अंतरिम आदेश प्राप्त झाल्यानंतरच अवघड क्षेत्रातील शाळेमधील संबंधित शिक्षकांस प्रचलित पद्धतीने कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करण्यात यावी.


टप्पा क्र.6 मधून न्यायप्रविष्ट बाबीतील संबंधित शिक्षकाची बदली झालेली आहे सदर शिक्षक जो पर्यन्त त्या शाळेत रुजू होत नाही तो पर्यन्त संबंधित शाळेमधील बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करू नये. न्यायप्रविष्ट बाबीतील न्यायालयीन अंतरिम आदेश प्राप्त होण्यापूर्वीच जर अशा शिक्षकांना कार्यमुक्त केले तर त्या शाळेमध्ये शिक्षक राहणार नाही आणि विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होईल. अवघड क्षेत्रातील व पेसा क्षेत्रातील शाळांमधील पद रिक्त ठेवता येत नाहीत. सबब सदर अवघड शाळेतील शिक्षकाला कार्यमुक्त करण्यात येऊ नये. 




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.