शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित झाल्याबरोबरच कर्मचारी हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करू देण्याबाबत आदेश ११/०३/२०२६

 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित झाल्याबरोबरच कर्मचारी हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करू देण्याबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 11 मार्च 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे. 

प्रति.

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व विभाग)

२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषदा सर्व

३) शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम)

४) शिक्षणाधिकारी/शिक्षण प्रमुख/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका/नगरपालिका (सर्व)

विषय :- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित झाल्याबरोबरच कर्मचारी हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करू देण्याबाबत.

संदर्भ :- अनिल महादेव शिवणकर, अध्यक्ष भापज शिक्षक आघाडी, पूर्व विदर्भ यांचे दि.१२/०२/२०२६ रोजीचे पत्र.

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेत गेल्यानंतर शालेय कामकाज सुरु होण्या आगोदरच सुरुवातीला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची हजेरीवर स्वाक्षरी होणे अनिवार्य आहे. परंतु बऱ्याच शाळेत मुख्याध्यापक आपली मनमर्जी करुन त्या संबंधित शिक्षकांना शिक्षक हजेरीवर स्वाक्षरी करु न देता शालेय कामकाज पूर्ण झाल्यावर स्वाक्षरी करायला स्वाक्षरी हजेरी देतात ही बाब अतिशय गंभीर व नियमबाह्य असल्यबाबत कळविले आहे.

त्याअनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विहित वेळेत शाळेत हजर झाल्यानंतर लगेचच त्यांची हजेरी पत्रकावर स्वाक्षरी घेण्यात यावी तसेच स्वाक्षरीच्या वेळी हजेरी पत्रक उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्याबाबत आपल्या अधिनस्त सर्व शाळा/ उच्च माध्यमिक शाळांना कळविण्यात यावे.


Digitally signed by

PALKAR MAHESH MADHUKAR Date: 11-03-2026 14:42:24 

(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक,)

माहितीस्तव सविनय सादर,

मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. ४११०४१.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.