पुढील वर्षी इयत्ता पहिली व दुसरीची पुस्तके बदलणार! यावर्षी सर्वच शाळांना मिळणार एकात्मिक द्विभाषिक पुस्तके.

 पुढील वर्षी इयत्ता पहिली व दुसरीची पुस्तके बदलणार! 

यावर्षी सर्वच शाळांना मिळणार एकात्मिक द्विभाषिक पुस्तके.


महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारती च्या संचालकांनी एका परिपत्रकाद्वारे पाठ्यपुस्तकांसंदर्भात परिपत्रक निर्गमित करून शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


शैक्षणिक वर्ष २०२३ २०२४ साठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भाने झालेल्या बदलाबाबतची माहिती या परिपत्रकाद्वारे कळविण्यात  आली आहे.


१) संदर्भीय शासन निर्णय क्रमांक १ अन्वये राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने एकात्मिक व विभाषिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक २३ जून २०२२ यादवारे अधिक्रमित करण्यात आला आहे.


२) संदर्भीय शासन निर्णय क्रमांक २ अन्वये राज्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित व अंशत: अनुदानित तसेच खाजगी व बिना अनुदानित शाळांमधील इयत्ता १ तीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३ २०२४ (जून २०२३) मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांची एकूण ४ भागांमध्ये विभागणी करून यामध्ये सरावासाठी आवश्यकतेनुसार स्वाध्यायाची पृष्ठे समाविष्ट करून नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातील. गुजराती, कन्नड, तेलुगु, सिंधी, तमिळ व बंगाली या उर्वरित माध्यमांसाठी नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातील.


३) शैक्षणिक वर्ष २०२३ २०२४ (जून २०२३) पासून पथदर्शी स्वरूपात इयत्ता २ री ते इयत्ता ८ चीच्या विद्याथ्र्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तके एकूण ४ भागात उपलब्ध करून दिली जातील. यामध्ये प्रत्येक घटक / पाठ / कविता यानंतर वहीची पाने समाविष्ट करण्यात येतील. त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करावी. गुजराती, कन्नड, तेलुगु, सिंधी, तामिळ व बंगाली या उर्वरित माध्यमांसाठी नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातील.


४) इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण ४ भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून दिली जातील.


५) खाजगी आणि विना अनुदानित शाळांमधील इयत्ता २ री ते इयत्ता ८ वीच्या विदयार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच पाठ्यपुस्तक मंडळाकडे नियमित पाठ्यपुस्तकांचा शिल्लक असलेला यापूर्वीचा साठा तसेच पुस्तक विक्रेत्याकडे असलेला साठा संपुष्टात आल्यानंतर अनुक्रमांक ३ मध्ये नमूद केल्यानुसार पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातील.


६) इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या पाठ्यपुस्तकांतील आशयामध्ये कोणताही बदल झालेला नसल्याने मंडळाच्या विभागीय भांडारामधून विक्री झालेली पाठ्यपुस्तके परत घेतली जाणार नाहीत..


(७) नियमित पाठ्यपुस्तकांपैकी एखादया विषयाचे पाठ्यपुस्तक मंडळाकडे शिल्लक नसल्यास व पुस्तकांचा संच पूर्ण होण्यासाठी कमी पडणा-या विषयांच्या पाठ्यपुस्तकांची मागणी विक्रेत्यांनी मंडळाकडे नोंदविल्यास सदर पाठ्यपुस्तकांची नव्याने छपाई करून जुन्या किंमतीप्रमाणे सदर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. मात्र अशी पाठ्यपुस्तके विक्रेत्यांकडे शिल्लक राहिल्यास ती मंडळ परत घेणार नाही.


८) मंडळाच्या सर्व प्रकाशनांचे पुर्नमुल्यांकन झालेले असल्याने जुनी किंमत असलेली व नवीन किंमत असलेली पाठ्यपुस्तके यावर्षी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे पाठ्यपुस्तकांवर छापलेल्या किंमतीनुसार पाठ्यपुस्तकांची विक्री करणे बंधनकारक आहे. ( जुनी किंमत असलेली पाठ्यपुस्तके नवीन किंमतीने विक्री करण्यात येऊ नये.)


९) शैक्षणिक वर्ष २०२४ २०२५ साठी बालवाटीका, बालवाडी, अंगणवाडी तसेच इयत्ता १ ली व इयत्ता २ रीसाठी प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२३ २०२४ (जून २०२३) हे इयत्ता १ ली व इयत्ता २ री या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी.


तरी वरीलप्रमाणे पाठ्यपुस्तकांची रचना व बदलाबाबतची नोंद राज्यातील सर्व अधिकृत पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्था व इतर सर्व संबंधितांनी घ्यावी.
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.