युडायस प्लस 2022-23 ऑनलाईन माहिती ची होणार तपासणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई चे परिपत्रक.
भारत सरकार शिक्षा मंत्रालयाकडून समग्र शिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने यु-डायस प्लस 2022 23 प्रणालीची सर्व माहिती अचूक भरण्याच्या सूचना या कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत तसेच वेळोवेळी झूम मीटिंग घेऊन सर्व गटशिक्षणाधिकारी जिल्हास्तर प्रोग्राम वर तालुकास्तर एम आय एस कॉर्डिनेटर डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना यु डायस प्लस 2022 23 प्रणालीमध्ये माहिती भरण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. तसेच whatsapp ग्रुप वर दररोज प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट मेसेज द्वारे पाठवला जातो तरी देखील अद्याप राज्यातील 9341 शाळांचे स्टुडन्ट एन्ट्री चे काम शून्य आहे तसेच राज्याचे स्टुडन्ट अँड टी चे काम अद्यापही पस्तीस टक्के अपूर्ण आहे साधारण 17 लाख विद्यार्थ्यांची माहिती अद्याप भरलेली नाही शिवाय शाळांनी भरलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये अनेक चुका आढळून आल्या आहेत.
यु-डायस 2022 23 प्रणाली माहितीचे विश्लेषण केले असता शाळा शिक्षक यांच्या संदर्भासह त्रुटी आढळून आले आहेत यामुळे राज्याच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तरी गटशिक्षणाधिकारी यांनी यु-डायस प्रणाली वरील सर्व माहिती अचूक भरण्यासाठी आपल्या स्तरावरून मुख्याध्यापकांना लेखी सूचना देण्यात याव्यात विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख व समग्र शिक्षा कर्मचारी यांच्याकडून यु-डायस प्लस 2022 23 फॉर्म तपासणी काटेकोरपणे करून फॉर्म मधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्यावी. मुख्याध्यापकांकडून त्रुटी राहिल्या असल्यास त्यांच्याकडून त्वरित दुरुस्त करून घ्याव्यात.
यु-डायस फॉर्म तपासणी करताना खालील महत्त्वाच्या मुद्द्यांची मदत घ्यावी.
शाळा पोर्टल बाबत माहिती तपासत असताना खालील बाबी अचूक असल्याची खात्री करावी-
1) शाळेच्या व्यवस्थापनाचा प्रकार
2) शाळेची इमारत आहे/नाही व प्रकार
3) वर्ग खोल्यांची माहिती
शाळेचा अक्षांश व रेखांश स्थान
शाळा निवासी अनिवासी अंशतः निवासी
शाळा स्थापनेचे वर्ष
गाव वार्ड एल जी डी नुसार
मुख्याध्यापकाचे नाव व संपर्क क्रमांक
अधिकाऱ्यांनी शाळेला दिलेल्या भेटीची माहिती
शाळेला मिळालेल्या विविध अनुदानांची माहिती
शाळेला मिळालेल्या पाठ्यपुस्तक व गणवेशाची माहिती
ग्रंथालय शाळेत उपलब्ध असलेल्या पुस्तकांची अचूक संख्या
शाळेचे ठिकाण ग्रामीण किंवा शहरी.
शाळेत उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची माहिती तपासताना खालील बाबी अचूक असल्याची खात्री करावी. .
पिण्याच्या पाण्याची सुविधा व स्त्रोत.
सर्व मुले व मुलींसाठी उपलब्ध असलेले स्वच्छतागृह.
सी डब्ल्यू एस एन मुले व मुलींसाठी उपलब्ध असलेले स्वच्छतागृह कमोड खुर्ची सुद्धा चालेल.
किचन गार्डन, कंपाउंड वॉल, खेळाचे मैदान, रॅम, विद्युत सुविधा, किचन शेड, कंपाउंड वॉल दुरुस्ती, स्वच्छतागृह दुरुस्ती, शाळा इमारत दुरुस्ती,
शिक्षक पोर्टल वर माहिती तपासत असताना खालील बाबी अचूक असल्याची खात्री करावी.
शिक्षकांची पूर्ण नाव, लिंग स्त्री किंवा पुरुष, जन्मदिनांक, प्रवर्ग आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, शिक्षकांनी घेतलेल्या प्रशिक्षणाची माहिती.
विद्यार्थी पोर्टल वर माहिती तपासत असताना खालील बाबी अचूक असल्याची खात्री करावी.
विद्यार्थ्यांची पूर्ण नाव, लिंग स्त्री/पुरुष/तृतीय, आधार क्रमांक, वर्ग शाळा प्रवेश क्रमांक व दिनांक, दिव्यांग चा प्रकार, बीपीएल ची माहिती, दिव्यांग विद्यार्थ्यांचा तपशील, शैक्षणिक वर्षात मिळालेल्या सुविधा शिष्यवृत्ती इत्यादी माहिती, प्रतिभावंत विद्यार्थ्यांची माहिती.
पी आय जी संदर्भात महत्त्वाच्या बाबी अचूक असल्याची खात्री करावी.
आपत्ती व्यवस्थापन व शाळा सुरक्षितता, शालेय पोषण आहार, फिट इंडिया सर्टिफिकेट, शिक्षक आधार सीडेड माहिती, शिक्षक ओळखपत्र व फोटो, शाळेतील इको व युथ क्लब, विद्यार्थी मूल्यमापन व प्रगती पत्रक, संगणक व डिजिटल साहित्य, वोकेशनल एज्युकेशन.
शाळा विद्यार्थी यांना द्यावयाची विविध लाभ पीआयजी गुणांकन शिक्षण विभागाची सांख्यिकी माहिती इत्यादी घटकांची सदर माहिती निगडित असल्याने गांभीर्याने कार्यवाही करायची दक्षता घ्यावी ज्या शाळांची यु-डायस फ्रॉम मध्ये सर्व माहिती अचूक भरून पूर्ण झालेली आहे त्यांनी फॉर्म फायनलाइज करावा आपल्या तालुक्यातील सर्व शाळांची यु डायस प्लस 2022 23 प्रणालीमधील माहिती अचूक असल्याची खात्री करून गटशिक्षणाधिकारी यांनी तालुका स्तरावरील यु-डायस प्लस माहिती दिनांक 29 मार्च 2023 पर्यंत अंतिम करावी.
वरील प्रमाणे सूचना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने दिल्या आहेत.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments