बदल्यांचा सहावा टप्पा म्हणजेच अवघड क्षेत्रातील बदल्या (रद्द होऊ शकतात) बाबत ग्राम विकास विभागाचे नवीन परिपत्रक.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 23 मार्च 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना बदलीचा सहावा टप्पा रद्द करण्याची मागणी झाल्यामुळे प्रस्तुत प्रकरणी अवघड क्षेत्रातील फेरीमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत व शिक्षक संघटनेने उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने संपूर्ण वस्तुस्थितीदर्शक सविस्तर अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वयं स्पष्ट अभिप्राय शासनास म्हणजेच ग्रामविकास विभागात तात्काळ ई-मेल द्वारे सादर करण्यात यावा असे निर्देश दिले आहे.
बदलीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी समोर आल्यामुळे त्या मध्ये बदल करून त्यानंतर पुन्हा बदली प्रक्रिया राबवण्यात आली तरी देखील यामध्ये अनियमित्तास झाल्याचे निवेदन ग्राम विकास विभागास शिक्षक समन्वय समिती ने दिले यानुसार सदर बदलीच्या सहावा टप्पा रद्द करण्याबाबत ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अभिप्राय मागितला आहे.
सदर परिपत्रक फक्त यवतमाळ जिल्ह्यासाठी लागू आहे. जर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या अहवालानुसार बदलीच्या सहाव्या टप्प्यामध्ये म्हणजेच अवघड क्षेत्रात मध्ये जागा भरण्याच्या टप्प्यांमध्ये अनियमितता झाल्याचे आढळून आल्यास फक्त यवतमाळ जिल्ह्याच्या अवघड क्षेत्रात साठीच्या राऊंड मधील बदल्या रद्द होऊ शकतात इतर जिल्ह्यांसाठी त्या जिल्ह्या मधील तक्रारी प्राप्त होऊन अशा प्रकारचा आदेश निर्गमित होणे आवश्यक आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments