अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील संवर्ग १ व २ मधील बदलीप्राप्त शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची होणार चौकशी..!

 अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील संवर्ग १ व २ मधील बदलीप्राप्त शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची होणार चौकशी..!
👉प्रहारची शिक्षक संघटनेची विभागीय आयुक्तांकडे तक्रार. जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत संवर्ग १ व २ चा लाभ घेवुन बदली करणाऱ्या शिक्षकांच्या कागदोपत्रांची चौकशी व वैद्यकीय तपासणी करण्याचे सुतोवाच विभागीय आयुक्त डॉ.निधी पांडे यांनी प्रहारच्या शिष्टमंडळाला दिले. बोगस प्रमाणपत्राच्या आधारे बदलीचा लाभ घेतल्याचा आरोप प्रहारच्या वतीने निवेदनाव्दारे केला आहे.त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी यावेळी राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी रेटली होती.


शासन आदेशाप्रमाणे १ व २ नुसार जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक संवर्ग ची आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे ग्राम विकास शासन स्तरावरून राबविण्यात आली. या बदली प्रक्रीयेमध्ये विशेष संवर्ग भाग १ मध्ये दिव्यांग, विविध गंभीर आजार व संवर्ग २ मध्ये पती पत्नी एकत्रीकरणाचा समावेश होतो.या दोन्ही संवर्गात बदलीमध्ये सुविधा आहे.याकरीता त्यांना प्रमाणपत्र दाखल करावे लागते. परंतु या बदली प्रक्रियेत लाभ घेतलेल्या कित्येक शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र दाखवुन बदलीचा लाभ घेतल्याच्या अनेक तक्रारी संघटनेकडे आहेत.असा आरोप देखील यावेळी प्रहारच्या वतीने करण्यात आला आहे.त्यामुळे अशा सर्वच शिक्षकांच्या कागदोपत्रांची चौकशी करण्याची मागणी यावेळी निवेदनाव्दारे प्रहारचे महेश ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसह वैद्यकीय तपासणी करण्याबाबतचे सुतोवात विभागीय आयुक्त डॉ.पांडे यांनी केले आहे. 


विभागातील अमरावती सह यवतमाळ, वाशिम, अकोला व बुलडाणा या जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक संवर्गाच्या सन २०२२-२३ मधील आंतरजिल्हा बदलीने आलेल्या व जिल्हांतर्गत बदली मध्ये लाभ घेतलेल्या विशेष संवर्ग भाग १ मधील शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची, कागदोपत्री पुराव्यांची आपले स्तरावरून विशेष समिती द्वारे तपासणी करण्यात यावी, आंतरजिल्हा बदलीने उपस्थित झालेल्या विशेष संवर्ग भाग १ मधील व त्यागाधारे पदस्थापना घेतलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची सदर विशेष समितीद्वारे कसून तपासणी करण्यात यावी. दोषी आढळणाऱ्या शिक्षकांची पदस्थापना रद्द करून त्यांना दुर्गम भागात पदस्थापना देण्यात याव्या अथवा अश्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली रद्द करणेबाबत शासन स्तरावर आपले स्तरावरून प्रस्ताव देण्यात यावा, जिल्हा परिषद प्रशासन स्तरावर दोन्ही बदली प्रक्रियेतील विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांच्या कागदोपत्री पुरावे, प्रमाणपत्रांची फेर तपासण करण्यात यावी तसेच जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील विशेष संवर्ग भाग २ (पती-पत्नी) मधील लाभ घेलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची फेर तपासणी करण्यात यावी शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया प्रक्रिया अद्याप पूर्णत्वास गेलेली नसून बदली झालेल्या शिक्षकांना या सत्र अखेर म्हणजेच मे २०२३ मध्ये कार्यमुक्त व रुजू केले जाणार आहे. 


करीता विशेष संवर्ग भाग १ मधील लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची आपले स्तरावरून तपासणी करून

दोषी आढळणाऱ्या शिक्षकांची बदली रद्द करून त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.

दोन्ही बदली प्रक्रियेत अनेक शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग १ मधून लाभ मिळावा म्हणून खोटी व बनावट प्रमाणपत्रे मिळविली असल्याने अश्या विशेष करून पक्षाघाताने आजारी असलेले, दिव्यांग, मेंदूचा आजार असलेले शिक्षकांच्या प्रमाणपत्रासह त्यांच्या आजाराची व दिव्यांगत्वाची नियंत्रक मेडिकल बोर्ड द्वारे वैदकीय तपासणी करण्यात यावी. ( शिक्षकांचे जोडीदार अथवा पालक असल्यास त्यांची सुद्धा याच प्रमाणे तपासणी व्हावी).


शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये विशेष संवर्ग भाग १ मधील शिक्षकांची विभगातील सर्व जिल्हा परिषद मध्ये संख्या लक्षणीय असल्याने अश्या लाभाकारीता खोट्या व बनावट प्रमाणपत्रांचा आधार घेतल्याच्या तक्रारी आहेत. तेंव्हा अश्या दोषी सिध्द होणार्या शिक्षकांवर कार्यवाही होणे गरजेचे आहे.जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील विशेष संवर्ग भाग २ (पती-पत्नी) मधील लाभ घेलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची फेर तपासणी करण्यात यावी. काही शिक्षक नोकरीला ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यातून दिव्यांग प्रमाणपत्र न काढता दुसर्या जिल्ह्यातून प्रमाणपत्र काढल्याचे दिसून येते. काही दुर्धर आजारांना वाहन चालविण्याचा परवाना दिला जात नाही मात्र व्याधीग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र असल्यावरही अश्या शिक्षकांकडे दुचाकी, चारचाकी चालविण्याचा परवाना आहे. गेंद आजार किंवा गंभीर आजारी असणार्या शिक्षकांनी मागील चार पाच वर्षात उपचारासाठी दीर्घ रजा घेण्याची नोंद सेवा पुस्तिकेत आहे का? याबाबतही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


याबाबत विविध मागणीचे निवेदन यावेळी विभागीय आयुक्त डॉ.निधी पांडे यांना प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.लवकरच आयुक्त स्तरावरून चौकशीचे आदेश संबंधित जिल्हा परिषदेला निर्गमित होणार आहे. शिष्टमंडळात जिल्हा सरचिटणीस अमोल वऱ्हेकर, जिल्हा संघटक दिलीप इंगळे, अमोल पंडीत,अचलपूर तालुका अध्यक्ष रमेश कडु, सतीश दातीर, राजेंद्र काळे आदींची उपस्थिती होती.नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.