Kendrapramukh Padonnati Update - केंद्रप्रमुख पदोन्नती प्रारूप माहिती सादर करणेबाबत शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र

केंद्रप्रमुख पदोन्नती प्रारूप माहिती सादर करणेबाबत शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र.शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर यांनी केंद्रप्रमुख पदोन्नती बाबत प्रारूप माहिती सादर करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


केंद्रप्रमुख पदोन्नती प्रारूप माहिती सादर करणे बाबत खालील दिलेल्या बाबींची पूर्तता करून सादर करण्यात यावी असे निर्देश गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

1) सेवाजेष्ठता यादीतील अनुक्रमांक अचूक नमूद करण्यात यावा.

2) सलग सेवा दिनांक हा जिल्हा परिषदेतील हजर दिनांक असावा.

3) जन्म दिनांक अचूक नमूद करण्यात यावा.

4) पदवी उत्तीर्ण असेल तर बीएससी बीकॉम बीए असा उल्लेख करण्यात यावा.

5) पदवीचा विषय विज्ञान विज्ञान गणित भाषा मराठी हिंदी उर्दू समाज अभ्यास इतिहास भूगोल विज्ञान भाषा समाज अभ्यास यासाठी वरील विषयांचा उल्लेख हा पदवीचा विषय म्हणून करण्यात यावा.

6) पदवीला प्राप्त गुण यामध्ये गुण नमूद करताना प्राप्त गुण व किती पैकी गुण असा उल्लेख करण्यात यावा उदाहरणार्थ 600 पैकी 450 गुण असतील तर सदर गुण 450/600 असे नमूद करावीत.

7) व्यावसायिक अहर्ता यामध्ये डीएड उत्तीर्ण दिनांक नमूद करावा तसेच डीएड किंवा समक्ष पदवी उत्तीर्ण असेल तर ती नमूद करून बीएड किंवा समक्ष पदवी प्राप्त गुण यामध्ये गुण नमूद करताना प्राप्त गुण व किती पैकी गुण असा उल्लेख करण्यात यावा.

8) विभागीय चौकशी चालू अथवा प्रलंबित आहे किंवा कसे? आहे किंवा नाही नमूद करावे.

9) शिस्तभंग विषयक कार्यवाही झाली आहे किंवा नाही? झाली असल्यास कोणती शिक्षा झाली असेल तर कोणती शिक्षा झाली हे नमूद करावी.

10) स्थायिक व प्रमाणपत्र दिले आहे किंवा नाही? आहे किंवा नाही नमूद करावे.

11) आत्ता दायित्व सादर केले आहे किंवा नाही: आहे किंवा नाही असे नमूद करावे.

12) नवीन नाव समाविष्ट करावयाचे असेल तर तालुक्यातील शेवटच्या नावानंतर समावेश करण्यात यावा.

13) सदर यादीतील कर्मचारी सेवानिवृत्त मयत पदाऊनत इत्यादी असेल तर नोंद शेरा रकान्यात करावी. 

सदर माहिती ही मूळ अभिलेखके यावरून नमूद करण्यात यावी तसेच शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची नोंद ही गुणपत्रक व प्रमाणपत्र यावरून घेण्यात यावी सदर माहिती माहिती गार कर्मचाऱ्यांचे मार्फत समक्ष हार्ड व सॉफ्ट कॉपी सादर करण्याची दक्षता घ्यावी.
केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांनी पुढील प्रमाणे पत्र निर्मित केले आहे. 


जिल्हा परिषद यवतमाळ ने केंद्रप्रमुख पदोन्नती सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे या तात्पुरत्या यादीवर दिनांक 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत आक्षेप घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

सदर यादी ह्या विषयी निहाय प्रसिद्ध केलेले असून यादीतील भाषा विषय शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापकांनी पदवी मध्ये इंग्रजी साहित्य इंग्लिश लिटरेचर हा विषय असल्यास फक्त त्याच शिक्षकांनी अथवा मुख्याध्यापकांनी दिलेल्या मेलवर अंतिम वर्षाची मार्कलिस्ट आणि गुणपत्रिका मेल करावयाच्या सूचना देखील देण्यात आले आहेत. 


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.