शिष्यवृत्ती अपडेट - शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी/आठवी संदर्भात परीक्षा परिषदेची दोन परिपत्रके

शिष्यवृत्ती अपडेट - शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी/आठवी संदर्भात परीक्षा परिषदेची दोन महत्वपूर्ण परिपत्रके.


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आयोजित केली आहे.


दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी दोन महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्मिती केली आहेत ती पुढील प्रमाणे.


उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकच वेळेस घेण्यात येणार आहे सदर परीक्षेचे पूर्वनियोजन गोपनीय व गोपनीय साहित्य तसेच इतर तद अनुषंगिक माहिती देण्याकरता दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी साडेअकरा वाजता झूम मीटिंग आयोजित करण्यात आली आहे.

सदर झूम मीटिंग करिता सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहण्याचे निर्देश परीक्षा परिषदेच्या आयुक्त माननीय शैलाजा दराडे यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रशासनाधिकारी महानगरपालिका सर्व गटशिक्षणाधिकारी व वार्ड ऑफिसर यांना दिले आहेत.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दुसऱ्या परिपत्रकानुसार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2023 परीक्षा केंद्र ठिकाणात बदल करणे बाबत पुढील प्रमाणे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणाऱ्या परीक्षा केंद्रांचे निश्चितीचे कामकाज हे गटशिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांच्या स्तरावर पूर्ण करण्यात आलेले आहे. सध्या परीक्षेचे प्रवेश पत्र निर्गमित झालेले असून गोपनीय साहित्य जिल्हास्तरावर पोहोचवण्यास सुरुवात झालेली असल्यामुळे परीक्षा केंद्रातील बदलाबाबत विद्यार्थी किंवा काळा किंवा आपणाकडून आलेल्या विनंती मान्य करता येणार नाही असे स्पष्टीकरण परीक्षा परिषदेच्या आयुक्त माननीय शैलाजा दराडे यांनी सदर परिपत्रकानुसार दिले आहे.नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.