आज दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने परिपत्रक निर्गमित करून काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत त्या पुढील प्रमाणे.
बदली झालेल्या शिक्षकांना 30 एप्रिल किंवा त्यानंतर कार्यमुक्त करणार.
अवघड क्षेत्रात जागा भरण्यासाठी पोर्टलवर 30 एप्रिल पर्यंत संभाव्य रिक्त पदांचा तपशील अपडेट करणार..
30 एप्रिल 2023 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना बदली प्रक्रियेतून वगळणार...
यानंतरचा बदली प्रक्रियेत होणारा राऊंड म्हणजे अवघड क्षेत्रात जर जागा रिक्त राहिल्या असतील तर त्या भरण्याचा राऊंड आता या राऊंडमध्ये अवघड क्षेत्रात कोणाची बदली होऊ शकते..?
ज्या शिक्षकांची एकूण सुगम क्षेत्रातील सेवा दहा वर्षापेक्षा जास्त आहे व एका शाळेवरील सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे असे सर्व शिक्षक या राऊंडसाठी पात्र आहे.
परंतु वरीलपैकी ज्यांची या अगोदरच बदली झाली आहे असे शिक्षक वगळण्यात येतील.
प्रशासकीय स्तरावर अर्ज भरून ज्यांना अजूनही शाळा मिळाली नाही अजूनही या राऊंडसाठी पात्र आहेत त्यांची अवघड क्षेत्रात बदली होऊ शकते.
ज्या शिक्षकांची सेवा सुगम क्षेत्रात जास्तीत जास्त दिवस झाली आहे व ज्यांनी 2022 म्हणजेच चालू बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एक चा लाभ घेऊन नकार नाही अशा सेवाजेष्ठ शिक्षकांचा समावेश या यादीमध्ये होऊ शकतो.
53 प्लस च्या जवळजवळ आलेले शिक्षक.
53 प्लस झालेले परंतु नकार न दिलेले शिक्षक.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏

5 टिप्पण्या
53+ आहे पण शाळेवर कमी सेवा असल्यामुळे *बदली पात्रच्या* यादीत नाव नव्हते त्यामुळे नकार, होकार दिला नाही.व सेवा अवघड क्षेत्रात जास्त आहे मग अवघड क्षेत्रात आता या शेवटच्या राउंडला अशा शिक्षकाची बदली होईल काय..?
उत्तर द्याहटवाअवघड नाही.. सोप्या क्षेत्रात जास्त आहे.
उत्तर द्याहटवाHo
हटवासध्याच्या बदली प्रक्रियेत ज्यांची बदली झाली त्यांना या राऊंड मधून वगळले जाईल काय?
उत्तर द्याहटवाYes
हटवा