"शिक्षणामधील नाविन्यपूर्ण पद्धती व प्रयोगांना प्रोत्साहन" (Promoting Innovative Practices and Experiments in Education for Schools and Teacher Education Institutions) या कार्यक्रमांतर्गत सन २०२६-२७ साठी प्रकल्प प्रस्ताव मागविणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे कार्यालयाने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
प्रति,
१. विभागीय उपसंचालक (सर्व)
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
४. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)
५. प्रशासन अधिकारी, बृहन्मुंबई म.न.पा., मुंबई
६. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) (सर्व)
७. शिक्षण निरीक्षक, दक्षिण, उत्तर, पश्चिम मुंबई
विषय : "शिक्षणामधील नाविन्यपूर्ण पद्धती व प्रयोगांना प्रोत्साहन" (Promoting Innovative Practices and Experiments in Education for Schools and Teacher Education Institutions) या कार्यक्रमांतर्गत सन २०२६-२७ साठी प्रकल्प प्रस्ताव मागविणेबाबत..
संदर्भ : १. शिक्षक शिक्षण विभाग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली, यांचे पत्र दि. १९ जून २०२६.
२. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावरील माहिती पत्रक लिंक
https://ncert.nic.in/pdf/programmes/INFORMATION_BULLETIN_२०२५-२६.pdf
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांच्या शिक्षक शिक्षण विभागामार्फत दरवर्षी "Promoting Innovative Practices and Experiments in Education for Schools and Teacher Education Institutions" हा कार्यक्रम राबविण्यात येतो. सदर कार्यक्रमांतर्गत शालेय शिक्षण व शिक्षक शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रयोगांना प्रोत्साहन देण्यात येते.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांच्याद्वारे सन २६-२७साठी शिक्षक व शिक्षक प्रशिक्षकांकडून नवोपक्रम प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. सदर प्रस्ताव हे प्राचार्य, क्षेत्रीय शिक्षा संस्थान, (RIE) एन. सी. ई. आर. टी. भोपाळ यांना सादर करावयाचे आहेत. निवड झालेल्या प्रत्येक नाविन्यपूर्ण प्रकल्पास रु. १०,०००/- इतकी बीज निधी (Seed Money) देण्यात येणार आहे. तरी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, शिक्षक शिक्षण संस्था, शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक, तसेच सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी अश्या संबंधितांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती व्यापक स्वरूपात पोहोचवावी. पात्र शिक्षक व शिक्षक प्रशिक्षकांना प्राचार्य, क्षेत्रीय शिक्षा संस्थान, (RIE) एन. सी. ई. आर. टी. श्यामला हिल्स, भोपाळ -४६२००२ यांना दि. ३१ जुलै, २०२६ पर्यंत टपालाद्वारे पोहोचतील अशापद्धतीने नवोपक्रम प्रस्ताव सादर करण्याबाबत अवगत करावे व मार्गदर्शन करावे. नवोपक्रम प्रस्ताव मराठी / हिंदी / इंग्रजीतून सादर करता येतील.
कार्यक्रमाची सविस्तर माहिती NCERT च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे :
इंग्रजीसाठी https://ncert.nic.in/teacher-innovation.php?ln=en
हिंदीसाठी https://ncert.nic.in/teacher-innovation.php?in=hi सदर बाबीस प्राधान्य देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी.
नवोपक्रम प्रस्ताव टपालाद्वारे पाठवण्यासाठी पत्ता प्राचार्य, क्षेत्रीय शिक्षा संस्थान, (RIE) एन. सी. ई. आर. टी. श्यामला हिल्स, भोपाळ ४६२००२
सोबत - माहितीपत्रक
(डॉ. कमलादेवी आवटे)
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
संपूर्ण परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.



0 टिप्पण्या