खाजगी विना अनुदानित व्यवस्थापनाच्या वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांची माहिती मुख्याध्यापक लॉगिनद्वारे भरणे आदेश २३/०७/२०२६

 "खाजगी विना अनुदानित व्यवस्थापनाच्या वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांची माहिती मुख्याध्यापक लॉगिनद्वारे भरणे बाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 23 जुलै 2026 रोजी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहे. 

जा.क्र. शिसंमा-२६/१०१/विना-अनु बदली/टी-२/

प्रति,

दिनांक:-Digital Signed Date

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.

२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.

३) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, (द/प/उ).


विषयः- खाजगी विनाअनुदानित ते अनुदानित शिक्षक बदली पोर्टलवरील माहिती भरण्याचे कामकाज पूर्ण करणेबाबत...

संदर्भ :- १. संचालनालयाचे पत्र जा.क्र. शिसंमा/विना-अनु बदली/कार्यासन-टि-२/२९६४२३३/, दि. १३.०७.२०२६.

२. वरिष्ठ तांत्रिक संचालक, NIC पुणे यांचे कडील प्राप्त माहिती/सुविधा.

उपरोक्त विषयी संदर्भाकीत पत्रान्वये, राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळांमधील वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांची शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पर्यंतची माहिती संचमान्यतेमध्ये भरण्यासाठी मुख्याध्यापक (HM) लॉगिनला Tab उपलब्ध करून देण्याबाबत वरिष्ठ तांत्रिक संचालक, राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्र (NIC), पुणे यांना कळविण्यात आले होते.

त्या अनुषंगाने वरिष्ठ तांत्रिक संचालक, NIC यांच्याकडून सदर सुविधा (Access) पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर माहिती भरण्याची/अद्ययावत करण्याची सुविधा दि.०८.०८.२०२६ पर्यंतच उपलब्ध असणार आहे. तसेच सदर माहिती भरण्याबाबतचा "खाजगी विना अनुदानित व्यवस्थापनाच्या वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांची माहिती मुख्याध्यापक लॉगिनद्वारे भरावी" हा संदेश पोर्टलवरती Running strip द्वारे Highlight केला जाईल.

तरी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना तात्काळ सूचित करून, बदली पोर्टलवरील वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांची माहिती भरण्याचे/अद्ययावत करण्याचे सर्व कामकाज दि.०८.०८.२०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत प्राधान्याने पूर्ण करून घेण्यात यावे. दिलेल्या मुदतीनंतर पोर्टलवरील सुविधा बंद झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची व कार्यालयाची राहील, याची नोंद घ्यावी.


Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 23-07-2026 16:43:21

(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) म.रा.पुणे.


प्रत :- १. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-०१ यांना माहितीस्तव सविनय सादर.

२. वरिष्ठ तांत्रिक संचालक, राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्र (NIC), पुणे.


School Portal link

https://education.maharashtra.gov.in/school/users/login/4


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.