बदली अपडेट - उद्यापासुन सॉफ्टवेअरद्वारे अवघड क्षेत्रासाठीचा राऊंड बदली पोर्टलवरुन बदली प्रक्रिया सुरु होइल.

उद्यापासुन सॉफ्टवेअरद्वारे बदली पोर्टलवरुन अवघड क्षेत्रासाठीचा राऊंड बदली प्रक्रिया सुरु होइल.


अवघड क्षेत्र बदली फेरी अंतिम शिक्षक यादी


   दि.२४-०२-२०२३.



  📌 संवर्ग दोन मधून बदली करून आलेल्या शिक्षकांच्या जोडीदारांना अवघड क्षेत्रासाठी  पात्र ठरवले होते त्यांची नावे वगळले आहेत..


 📌 यादीमध्ये संवर्ग २ च्या जोडीदाराचे एक नाव कमी होवुन एक पात्र नविन नाव समाविष्ट झालेले आहे  इतर कोणताही बदल झालेला नाही.


📌 संवर्ग ०१ होकार किंवा  नकारचा या यादीशी काहीही संबंध नाही. सर्व यादी ही जिल्ह्यातील सुगम क्षेत्रातील एकुण सेवेने सेवाजेष्ठ शिक्षकांचा यादीमध्ये समावेश आहे.


📌 सर्व यादी हे सेवाजेष्ठतेने आहे.

 

📌 ही यादी अंतिम आहे.


📌 उद्यापासुन सॉफ्टवेअरद्वारे बदली पोर्टलवरुन बदली प्रक्रिया सुरु होइल.


               बदली कक्ष

       शिक्षण विभाग (प्रा)

      जिल्हा परिषद नांदेड




बदली अपडेट - अवघड क्षेत्र रिक्त पदांची यादी व शिक्षक सेवा जेष्ठता यादी.


बदली पोर्टलवर दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री उशिरा जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी लॉगिन वर जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची यादी व अवघड क्षेत्रातील बदलीसाठी पात्र अशा शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर यादी जर आपल्याला मिळाली नसेल तर आज दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी अकरा वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांना उपलब्ध होईल.


यवतमाळ जिल्ह्यातील अवघड क्षेत्रासाठी बदली पात्र सेवा जेष्ठ शिक्षकांची यादी पाहिली असता अवघड क्षेत्रासाठी बदली पात्र यादीमध्ये सर्वात सुरुवातीला एक नंबर वर नाव असलेले शिक्षक जे आहेत त्यांची एकूण सेवा 34 वर्ष झालेली असून सध्याच्या शाळेतील त्यांची सेवा चार वर्ष पूर्ण झालेली आहे.

व सदर शिक्षक हे भाषा विषयाचे विषय शिक्षक आहेत.


अद्याप बदली पोर्टलवर शिक्षक लॉगिन सुरू झालेले नसून सर्व जिल्ह्यांच्या याद्या प्रसिद्ध होऊन त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी असलेल्या बदली राऊंडमध्ये प्रसिद्ध झालेल्या यादीतील शिक्षकांना आपला प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात येईल.




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

Post a Comment

4 Comments

  1. 6 मार्च पासून बदली प्रक्रिया सुरु होणार आहे काय

    ReplyDelete
    Replies
    1. हो आयुष प्रसाद साहेबांनी शिक्षक संघटनांच्या लोकांना सांगितले असे म्हणतात

      Delete
  2. 6 वा टप्पा राउंड फॉर्म भरणे केव्हा सुरु होणार आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. प्राधान्यक्रम भरता येणार नाही डायरेक्ट शाळा मिळेल

      Delete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.