जिल्हा अंतर्गत बदली अपडेट - दिनांक 22 नोव्हेंबर 2022 चे बदली प्रक्रिये चुकीची माहिती अथवा कागदपत्रे यांच्या आधारित सादर केलेल्या पडताळणी बाबत ग्रामविकास विभागाचे पत्र

 दिनांक 22 नोव्हेंबर 2022 चे बदली प्रक्रिये चुकीची माहिती अथवा कागदपत्रे यांच्या आधारित सादर केलेल्या पडताळणी बाबत ग्रामविकास विभागाचे पत्र.


आज दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत चुकीची माहिती कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर केलेल्या अर्जाच्या पडताळणी बाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी दिनांक सात एप्रिल 2021 च्या शासन निर्णय सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानंतर दिनांक 21 ऑक्टोबर 2022 व 18 नोव्हेंबर 2022 च्या पत्रांमुळे सन 2022 मधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलांबाबतची सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बदलांची कार्यवाही सुरू आहे सदर सुधारित वेळापत्रकानुसार दिनांक 18 नोव्हेंबर 2021 ते दिनांक 21 नोव्हेंबर 2022 दरम्यान विशेष संवर्ग शिक्षक भाग एक व विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यांनी संगणकीय बदली प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेले आहे. अशा शिक्षकांनी खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज सादर केले असल्यास व त्या आधारे अशा शिक्षकांच्या बदल्या झाल्या तर संबंधित संवर्गाची पात्रता धारण करणाऱ्या खऱ्या पात्र शिक्षकांवर अन्याय होतो. शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत त्यामुळे अशा शिक्षकांनी सादर केलेल्या अर्जाच्या पडताळणी बाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना खालील प्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येत आहे.

1) जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. सदर संवर्गीय शिक्षकांनी भरलेल्या अर्जाची काटेकोर पडताळणी करण्यात यावी संबंधित संवर्गाची पात्रता धारण करीत नसतानाही जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे भरलेले अर्ज आढळल्यास नैसर्गिक न्याय म्हणून संबंधित शिक्षकांना म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देण्यात यावी सदर पडताळणीची काम कोणत्याही परिस्थितीत दिनांक 22/11/2022 ते 24/11/2022 या दरम्यान कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावी.

पडताळणी आणि तिच्या शिक्षकांनी जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरण्याची सिद्ध होईल त्यांचा अर्ज ऑनलाईन बदली प्रणालीत संबंधित संवर्गातून बाद करण्यात यावा व अशा शिक्षकांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करावी. मात्र बदल्या संदर्भात विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यांनी ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज करण्याची मुदत संपली असल्यामुळे अशा शिक्षकास नव्याने अर्ज भरण्याची मुभा अनुज्ञेय असणार नाही.
बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

0 Comments