मुदतवाढ! - राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022-23 साठी उपक्रम सादर करणे करता मुदतवाढ देणेबाबत एस सी इ आर टी चे पत्र

 राज्यस्तरीय नवोपक्रम  स्पर्धा सन 2022-23 साठी उपक्रम सादर करणे करता मुदतवाढ देणेबाबत एस सी इ आर टी चे पत्र.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे च्या दिनांक 21 नोव्हेंबर 2022 च्या पत्रानुसार राज्यस्तरीय उपक्रम स्पर्धा 2022 23 साठी नवोपक्रम सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.

 राज्यातील शिक्षक शिक्षक प्रशिक्षक पर्यवेक्षितीय अधिकारी विषय साधन व्यक्ती विषय सहाय्यक ग्रंथपाल अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांच्याद्वारे विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्य केले जाते. त्यांच्या या उपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी सन 2022 23 मध्ये राज्यस्तरावर उपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धकांनी आपले नवोपक्रम

https://scertmaha.ac.in/innovation/

वरील लिंक वर सादर करण्यासाठी 20 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. अनेक स्पर्धकांनी उपक्रम अहवाल सादर करणे विषयी मुदतवाढ मिळावी अशी मागणी सदर कार्यालयाकडे केलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावे यासाठी दिनांक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे जेणेकरून सदर स्पर्धेत इच्छुक स्पर्धकांनी सहभागी होण्याची संधी मिळेल व त्यानुसार आपल्या अधिनिस्त शिक्षक शिक्षक प्रशिक्षक पर्यवेक्षकीय अधिकारी विषय साधन व्यक्ती विशेष सहाय्यक ग्रंथपाल अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांना.

https://scertmaha.ac.in/innovation/


वरील लिंक वर दिनांक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत आपले नवोपक्रम अहवाल सादर करणेबाबत सुचित करण्यात यावे. व जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व, प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक मुंबई, प्रशासनाधिकारी महानगरपालिका सर्व यांना देण्यात आल्या आहे.



वरील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे नवोपक्रम स्पर्धा 2022 23 ला मुदतवाढी बाबत पत्र पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.