इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत सरसकट पास करण्याच्या धोरणाचा फेर आढावा घेणार शिक्षण मंत्री मा. दीपक केसरकर

 इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत सरसकट पास करण्याच्या धोरणाचा फेर आढावा घेणार शिक्षण मंत्री मा. दीपक केसरकर. 
आरटीई 2009 चा आधार घेत विद्यार्थ्यांचे सत्य पूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून त्यांना दरवर्षी नापास न करता पुढील इयत्तेत बसवण्यात येते म्हणजेच पास केले जाते. 

व या धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे अनेक विद्यार्थी आठवी पास झाले तरी त्यांना लेखन आणि वाचन देखील करता येत नाही त्यामुळे नववीला नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. 

सदर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केसकर हे या धोरणाचा फ़ेर आढावा घेण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करणार आहे. 

व किमान तिसरीपासून तरी परीक्षा घेता येईल का? 

त्यासाठी धोरणात काय बदल करणे गरजेचे आहे? यावर विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे संकेत महाराष्ट्र राज्याचे माननीय शिक्षण मंत्री दीपकजी केसकर यांनी दिले आहेत. 

सदर बदल करण्यासाठी आरटीई 2009 म्हणजेच शिक्षण हक्क कायद्यामध्ये बदल करता येईल का किंवा इतर दुसरी कोणती उपाययोजना करता येईल याबद्दल माननीय शिक्षण मंत्री तज्ञांची चर्चा करून सदर धोरण निश्चित करणार असल्याचे कळते. 

या अगोदर माननीय शिक्षण मंत्र्यांनी पुढच्या वर्षीपासून प्रायोगिक तत्त्वावर विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी वेगळी वही सोबत न बाळगता पुस्तकासोबतच कोरे पेज जोडण्याचे संकेत दिले आहे. 

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.