ऑनलाइन सॉफ्टवेअरचा (Online Application) वापर करून जात प्रमाणपत्र तपासणीसाठी (Cast Validity) अर्ज कसा करावा त्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Documents Needed)

 ऑनलाइन सॉफ्टवेअरचा वापर करून जात प्रमाणपत्र तपासणीसाठी अर्ज कसा करावा त्यासाठी आवश्यक कागदपत्रे.


विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सॉफ्टवेअरचा वापर करून जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी

http://barti.maharashtra.gov.in

वरील वेबसाईटचा वापर करून जात तपासणी प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी वेबसाईटवर असलेल्या CCVIS या लिंक वर क्लिक केल्यावर सी सी व्ही आय एस CCVIS ही साईट सुरू होईल.

सर्वप्रथम आपण खात्री कराल की आपण वापरत असलेल्या ब्राउझर हा इंटरनेट एक्सप्लोररच आहे ना कारण सध्या सी सी व्ही आय एस ही वेबसाईट फक्त इंटरनेट एक्सप्लोर च्या माध्यमातूनच वापरता येते.

ऑनलाइन सॉफ्टवेअरचा वापर करून जात प्रमाणपत्र तपासणीसाठी अर्ज सादर करण्यासाठी अर्जदारास सॉफ्टवेअरमध्ये रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे त्यासाठी अर्जदाराकडे खालील किमान दोन बाबी असणे आवश्यक आहे.

1) ई-मेल अकाउंट म्हणजेच ईमेल ऍड्रेस पासवर्ड आपल्याला माहीत असायला हवा किंवा मोबाईल मध्ये किंवा एखाद्या डिवाइस मध्ये तो लॉगिन असायला हवा म्हणजे त्यावर आलेले मेल आपण पाहू शकतो.

2) आपल्याकडे सद्यस्थितीत चालू असलेला मोबाईल नंबर.


जर अर्जदाराकडे कोणताही इमेल ऍड्रेस नसेल तर त्याने सर्वप्रथम गुगल डॉट कॉम या वेबसाईटचा वापर करून ई-मेल ऍड्रेस प्राप्त करून घ्यावा व त्याचा वापर युजर रजिस्ट्रेशन मध्ये माहिती भरताना करावा. सॉफ्टवेअरचा वापर करण्यासाठी अर्जदाराने युजरनेम म्हणून त्याचा ईमेल ऍड्रेस वापरायचा असून अर्जदाराने सॉफ्टवेअरचा वापर करून त्याच्या जात प्रमाणपत्र तपासणीसाठी अर्जाची प्रिंट काढून अर्जासोबत आवश्यक अशी कागदपत्रे जोडून अर्जावर ज्या समितीचे नाव व पत्ता आहे त्या समितीकडे सादर केल्यावर त्याचे ईमेल ऍड्रेस वर अर्जावर समितीमार्फत केलेली कार्यवाही कळवणारे ईमेल सॉफ्टवेअर मार्फत पाठवण्यात येतात.

हल्ली मोबाईल फोनचा वापर सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात वाढलेला असून त्याद्वारे माहितीची देवाण-घेवाण केली जात आहे अर्जदारास त्याचे अर्जाची स्थिती वेळोवेळी एसएमएस नी कळविण्यात येते त्यासाठी मोबाईल नंबरची आवश्यकता असणार आहे अर्जदाराकडे स्वतःचा मोबाईल नंबर नसल्यास त्यांनी त्याच्या पालकांचा अथवा मित्राचा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन मध्ये माहिती भरताना नमूद करावा.

अर्जदारांनी सॉफ्टवेअर मध्ये रजिस्ट्रेशन करून झाल्यावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुरुवात करण्यापूर्वी त्याच्याकडे खालील दोन बाबी असल्या पाहिजेत.

1) कॉलेजमध्ये प्रवेश घेताना कॉलेजनी दिलेला जनरल रजिस्टर नंबर अथवा पर्मनंट रजिस्टर नंबर.

2) कॉलेजचे आयडेंटी कार्ड ज्यात अर्जदाराचा वर्ग तुकडी रोल नंबर या बाबींचा उल्लेख असेल.

जनरल लिस्ट नंबर अथवा परमनंट रजिस्टर नंबर हा प्रत्येक विद्यार्थ्यास कॉलेजमध्ये प्रवेश देताना संबंधित कॉलेजच्या विद्यार्थ्यास प्रवेश दिल्याची नोंद कॉलेजच्या जनरल ऍडमिशन रजिस्टर मध्ये घेत असते व त्या विद्यार्थ्यास एक जनरल ऍडमिशन रजिस्टर नंबर रजिस्टर नंबर देत असते सदर क्रमांक हा विद्यार्थ्यास माहीत असणे आवश्यक आहे.

कॉलेजचे आयडेंटी कार्ड याबाबत सर्वांना माहीत असल्याने त्याबाबत स्वतंत्र लिहिण्याची आवश्यकता नाही.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे:-

प्रत्यक्ष अर्ज भरताना अर्जासोबत जोडायची कागदपत्रे हाताशी ठेवावीत या कागदपत्रांच्या झेरॉक्स अटेस्टेड असावेत.

नातेवाईकांची कागदपत्रे:- अर्जदार त्याच्या जातीच्या दाव्याच्या पुष्ट्यार्थ त्याच्या ज्या नातेविकांची कागदपत्रे जोडू शकतो ती नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील काका आजोबा हत्या अर्जदाराची चुलत आजोबा चुलत काका अर्जदाराची भाऊ बहीण चुलत भाऊ चुलत बहीण.

कागदपत्रांचे प्रकार अर्जदार अर्ज सोबत खालील प्रकारची कागदपत्रे जोडू शकतो.

1) प्राथमिक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र दाखला.

2) माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला.

3) कॉलेज सोडल्याचा दाखला.

4) प्राथमिक शाळा प्रवेश रजिस्टर चा उतारा.

5) माध्यमिक शाळा प्रवेश रजिस्टर उतारा.

6) जन्म मृत्यू नोंदवही चा उतारा.

7) कोतवाल नोंदवहीचा राष्ट्रीयत्वाचा नोंदवही चा उतारा.

8) जमिनीचा सातबाराचा उतारा.

9) सेल डिड महसूल विभागाकडी कागदपत्रे.

10) नावामध्ये अथवा आडनावामध्ये बदल यासंबंधीचे राजपत्र.

11) जातीचे प्रमाणपत्र.

12) सेवा पुस्तकाच्या पहिल्या पाण्याचा उतारा.

13) वारसा हक्क प्रमाणपत्र.

14) जात वैधता प्रमाणपत्र.


अर्जासोबत जोडाव्याच्या सर्व कागदपत्रांवर ती व्यक्ती ज्या व्यक्तीची असतील त्या व्यक्तीशी असलेले अर्जदाराचे नाते लिहावे.


 Compulsary Documents To Be Attached

1 Original Caste Certificate of the Applicant 

2 Certified Copy of Caste Certificate of the Applicant

3 Original Affidavit (In Specimen Form 3 Rule - 4(1)) 

4 Original Affidavit (In Specimen Form 17 Rule - 14)

5 Certificate by the Principal of College (As per the last para of FORM-16, Rule–14) 

6. Attested Xerox copy of identity card issued by the college. 



काही महत्त्वाच्या सूचना.


A) अनुसूचित जातीचा दावा असल्यास 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा जातीचे पुरावे असणे आवश्यक आहे.

B) विमुक्त जाती भटक्या जमाती यांचे करिता 21 नोव्हेंबर 1961 पूर्वीचा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.

C) इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.

D) त्याचबरोबर इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या अर्जदारांसाठी वर नमद केलेल्या कालावधीपासूनचा वास्तव्याचा पुरावा आवश्यक आहे.

E) वरील तारखेनंतर इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या व ज्यांचे जात प्रमाणपत्र स्थलांतरित नमुन्यात आहे त्यांनी समितीकडे अर्ज करू नये.




विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन सॉफ्टवेअरचा वापर करून जात प्रमाणपत्र तपासणीसाठी अर्ज सादर करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शिका पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर Download क्लिक करा.


Download




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.