औरंगाबादचे एक मा. आमदार म्हणतात घरभाडे भत्ता बंद करा तर दुसरे मा. आमदार घरभाडे भत्ता सुरू ठेवण्यासाठी मुकाअ यांना पत्रच देतात

औरंगाबादचे एक आमदार म्हणतात घरभाडे भत्ता बंद करा तर दुसरे आमदार घरभाडे भत्ता सुरू ठेवण्यासाठी मुकाअ यांना पत्रच देतात. 


(Amadar-Udaysinha-Rajaput-Sena-Amadar-Kannad-Vidhansabha-Yanche-HRA-Suru-Thevanyasathi-Patra) 


औरंगाबाद मधील एका आमदार महोदयांनी शिक्षकांच्या घरभाडेबत्त्याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करून अनेक वेळा शिक्षका ंच्या घर भाडे भत्त्याबाबत प्रश्न उपस्थित केले व सर्व शिक्षकांचे घरभाडे फक्त बंद करण्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिले. अर्थात त्यांचे विरोधात सर्व शिक्षक संघटनांनी रान देखील उठवले आणि विरोध देखील दर्शवला. 


परंतु आज त्याच औरंगाबाद जिल्ह्यातील माननीय उदयसिंग राजपूत आमदार कन्नड विधान सभा मतदारसंघ यांनी मुख्यालय व घरभाडीभत्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांना पत्र लिहून सर्व शिक्षकांचा घर भाडे भत्ता सुरू ठेवण्याबाबत सांगितले आहे. 


त्यांच्या पत्रात ते म्हणतात की शिक्षकांनी मुख्यालय राहणे बंधनकारक करण्याचा विषय धोरणात्मक असून पंचायतराज समितीच्या याबाबत शिफारशी तसेच आणि वित्ताने उपस्थित होणारा ग्रामीण भागातील निवासस्थानाचा प्रश्न पती-पत्नी कर्मचाऱ्यांबाबत शासनाचे प्रचलित धोरण तसेच मुख्यालय बाबत असलेली संदीप दत्ता अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात या आदेशात काल सुसंगत बदल करण्याच्या दृष्टीने सविस्तर निवेदनाद्वारे विधानसभा सभागृह मी माझी भूमिका येथे अधिवेशनात मांडणार आहे. तोपर्यंत आपण कन्नड तालुक्यातील शिक्षकांच्या मुख्यालयाबाबत आपण काढलेल्या मुख्यालय व घरभाडे भत्ता बंद आदेश तूर्तास रद्द करावा आपण याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ मला सादर करावा. 

वरील प्रमाणे निर्देश सदर आमदार महोदय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांना दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजीच्या पत्रानुसार देतात. नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.