दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ रोजी "माहिती अधिकार दिन" साजरा करण्याबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.
जा.क्र./प्राशिसं/८०२/संकीर्ण/२०२६-२७/२२०
दिनांक २४/०९/२०२६
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
विषय :- दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ रोजी "माहिती अधिकार दिन" साजरा करण्याबाबत.
संदर्भ :- १. सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दि. २०.०९.२००८.
२. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र दि. २१.०९.२०२६.
३. कक्ष अधिकारी, एसडी-४, यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.२२०/ई-१८६२४८१/एस.डी.४, दि. २४.०९.२०२६.
उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रान्वये माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ बाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी "माहिती अधिकार दिन" साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ रोजी "माहिती अधिकार दिन" प्रभावीपणे साजरा करण्यात यावा.
सदर दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रश्नमंजुषा, निबंध, वक्तृत्व, चित्रकला इत्यादी स्पर्धांचे आयोजन, तसेच चर्चासत्रे, व्याख्याने व इतर जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यात यावेत. तसेच, सदर उपक्रमांच्या आयोजनासाठी आवश्यकतेनुसार संबंधित शासकीय कार्यालये व स्थानिक सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्यात यावे. आपल्या स्तरावरून अधिनस्त सर्व संबंधितांना आवश्यक त्या सूचना देऊन उपक्रमांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी.
दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांचा संक्षिप्त अहवाल, उपक्रमांची छायाचित्रे व सहभागींची माहिती आपल्या स्तरावर संकलित करून या कार्यालयास सादर करण्यात यावी. सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
प्रत माहितीस्तव सादर.
१. मा. आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
२. संजय जगताप, कक्ष अधिकारी, एसडी-४, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 टिप्पण्या