बाला उपक्रम म्हणजे काय? BaLA चा फुल फॉर्म काय होतो? बाला उपक्रमांतर्गत ABL (Activity Besed Learning)पुस्तिका

 बाला उपक्रम म्हणजे काय? 

BaLA चा फुल फॉर्म काय होतो? 

बाला उपक्रमांतर्गत ABL (Activity Besed Learning)पुस्तिका.


बाला उपक्रम बाला उपक्रम म्हणून आपण बऱ्याच वेळा ऐकले आहे. आपण आपल्या शाळा बाला उपक्रमांतर्गत रंगविला आहे अशा प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला विचारले गेली आहेत. जाणून घेऊया या बाला उपक्रमाबद्दल.

BaLA चा फुल फॉर्म म्हणजेच पूर्ण रूप.. 

Building as Learning Aid

वरील प्रमाणे बालाचा फुल फॉर्म होतो.

मराठीमध्ये आपण यालाच

(शालेय इमारत शिकण्याचे साधन) 

असे भाषांतरित करू शकतो.


बाला उपक्रमाची उद्दिष्टे


@ शाळा इमारतीला उत्तम शैक्षणिक साधन म्हणून उपयोगात आणणे.

@ विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लावणे.

@ क्षमतेनुसार अध्ययनाची संधी उपलब्ध करून देणे.

@ आनंददायी पद्धतीने अध्ययन अध्यापन प्रक्रिया घडवून आणणे.

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे स्वतः ज्ञानाची निर्मिती करणे.

@ आनंददायी रचनात्मक शैक्षणिक वातावरण निर्मिती करणे.

@ विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व कुतूहल निर्माण करणे.

@ विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये निपुण करणे.

@ विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची भीती काढून टाकने.

@ शालेय इमारतीमध्ये आनंददायी रमणीय उत्साहवर्धक वातावरण निर्माण करणे.


मार्गदर्शक सूचना


बालम उपक्रमांतर्गत पुस्तके मधील शैक्षणिक चित्रांचे रेखाटन प्रत्येक शाळेमध्ये असणे अनिवार्य असून शिक्षकांनी आपल्या कल्पकतेनुसार त्यात भर घालावी.

याव्यतिरिक्त आपण इमारतीच्या उपलब्धतेनुसार कल्पकतेने शैक्षणिक साधना साठी वापर करू शकता.

काही साहित्याला लागणारे आवश्यक शैक्षणिक साधने जसे गोट्या अंक कार्ड अक्षर कार्ड हे आपणास स्वतंत्ररित्या उपलब्ध करून घ्यावी लागेल. 

विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आवश्यक उपक्रमांची एकापेक्षा जास्त वेळा आरेखन करून घेता येईल. 

प्रत्येक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे अध्ययन चालू असताना सुरुवातीला शिक्षकांच्या मदतीची गरज असते. विद्यार्थी चुकीच्या मार्गाने त्यांचे अध्ययन करणार नाही याची सर्व शिक्षकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. 


बाल उपक्रमांतर्गत शाळेच्या भिंतीवर/ शाळेच्या इमारतीमध्ये रंगवता येणारे उपक्रम. 
बाला उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तयार केलेली उपक्रम पुस्तिका संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.