प्रोजेक्ट "Let's Change" अंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्याबाबत शासन आदेश चित्रपट लिंक

 प्रोजेक्ट "Let's Change" अंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्याबाबत शासन आदेश.


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्यात बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर अशी जबाबदारी स्वीकारण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम राबवण्याबाबत प्रस्ताव सादर केलेला आहे.

उपरोक्त प्रोजेक्ट अंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम मुख्यता इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना केंद्रित करून राबविण्यात येणार आहे. या अन्वये राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांच्या अंगी स्वच्छतेची आवश्यकता निर्माण करून परिसरात स्वच्छता टिकून राहावी यासाठी विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करणे अशी योजना आहे.

त्या अनुषंगाने संक्षिप्त योजना खालील प्रमाणे.

2020 पासून अनेक शाळा ऑनलाईन संप्रेषण पद्धतीने विद्यार्थ्यांची जोडल्या गेल्या आहेत शाळेतील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ लिंक शेअर करावी जी विद्यार्थ्यांनी 2 ऑक्टोबर रविवार रोजी पहावी.

व्हिडिओ लिंक👇




स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी स्वीकारणे या कल्पनेचा परिचय माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या व्हिडिओ संदेश द्वारे करण्यात येईल.

संदेशानंतर याच लिंकवर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 75 मिनिटांचा स्वयंस स्पष्टीकरणात्मक मजेदार चित्रपट लेट्स चेंज प्रसारित केला जाईल.

सदर उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी लेट्स चेंज या चित्रपटानंतर लोकप्रिय व्यक्तींच्या व्हिडिओ संदेशातून विद्यार्थ्यांसाठी कृती योजनेच्या आराखड्याची माहिती देण्यात आली आहे.

3 ऑक्टोबर रोजी कृती आराखडा बद्दल शंकांचे स्पष्टीकरण देण्यासाठी वर्गशिक्षक यांनी संवाद सत्राचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करावे व उपक्रमाच्या अंमलबजावणी विषयी माहिती द्यावी.

उत्तम कामगिरी करणाऱ्या स्वच्छता मॉनिटर यांचा जाहीर सत्कार करून त्यांना प्रोत्साहन द्यावे असे कार्यक्रम आयोजित केल्याने स्वच्छता मॉनिटर ची जबाबदारी सातत्याने निभावण्याची उत्सुकता बळकट होऊन विद्यार्थ्यांच्या अंगी स्वच्छतेची जाणीव निर्माण होईल.

विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवणे सर्वात योग्य आहे कारण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण होणार व या वयोगटातील विद्यार्थ्यांकडून झालेल्या मनाई बद्दल किंवा व्यक्तीचा निष्काळजीपणा निदर्शनास आणून दिल्यास नागरिकांमध्ये या उपक्रमाचा अधिक प्रसार होईल यामुळे परिसर स्वच्छ राहील आणि साफसफाई कर्मचाऱ्यांवर चा भार कमी होईल.

विद्यार्थ्यांनी वेळोवेळी व्यक्तीचा निष्काळजीपणा निदर्शनास आणून दिल्यावर त्यांच्या असमाजिक वागणुकीवर आळा बसेल.

या उपक्रमांतर्गत प्रसिद्धी नियोजन व समन्वयासाठी लागणारा वित्तविषयक खर्च सी एस आर उपक्रमांतर्गत जाहिरात आणि प्रायोजकांद्वारे पूर्ण करण्यात येणार असून शासनावर कोणताही आर्थिक भार येणार नाही या अटीच्या अधीन राहून सदर उपक्रम राबविण्यास परवानगी देण्यात येत आहे. तसेच सदर उपक्रम समाज उपयोगी असल्यामुळे उपरोक्त मार्गदर्शक सूचना आयुक्त शिक्षण पुणे यांनी आपल्या स्तरावरून राज्यातील सर्व शाळांना द्याव्यात ही विनंती.


स्वच्छता मॉनिटर ही कल्पना नेमकी काय आहे? 

विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवणे हा सर्वात योग्य पर्याय आहे कारण क्वचितच एखाद्या व्यक्तीला लहान मुलांनी त्याच्या निष्काळजीपणाबद्दल निदर्शनास आणून दिल्याने नाराजी होईल.

मुलांनी दोन-तीन वेळा निदर्शनास आणून दिल्यावर प्रत्येक जण निष्काळजी होण्यास कचरेल.

परिसर स्वच्छ राहील आणि साफसफाई कर्मचाऱ्यांवरचा भार बराच कमी होईल.




वरील संपूर्ण शासन निर्णय व संचालकांचे पत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.