दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी समूह राष्ट्रगीत गायनाबाबत दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी चे शासन परिपत्रक

 समूह राष्ट्रगीत गायनाबाबत दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी चे शासन परिपत्रक.


महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र आजादी का मृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे दिनांक 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहणाऱ्या या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम विविध पातळीवर आयोजित करणे अपेक्षित आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये राज्यात स्वराज्य महोत्सव चे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे स्वराज्य महोत्सव अंतर्गत राज्यस्तर जिल्हास्तर तालुका सर्व ग्रामस्थ आयोजित करावयाच्या कार्यक्रम उपक्रम यांचे स्वरूप निश्चित केले आहे.


स्वराज्य महोत्सव अंतर्गत परिषद नमूद केल्यानुसार राज्यातील कार्यक्रमाच्या नियोजनामधील समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम आता दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता राबवायचा आहे.

स्वराज्य महोत्सव अंतर्गत समोर राष्ट्रगीत गायन या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व मंत्रालय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांना खालील प्रमाणे सर्वसाधारण सूचना देण्यात येत आहे.


दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता एकाच वेळी राज्यात सर्वत्र समूह राष्ट्रगीत गायन होईल याची दक्षता घेण्यात यावी.


या राष्ट्रगीत गायनासाठी राज्यातील खाजगी शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था विद्यापीठे यामधील विद्यार्थी शिक्षक यांचा सहभाग अनिवार्य असेल.

सकाळी ठीक अकरा वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल व सकाळी 11 ते 11 वाजून 1 मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.

समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये सर्व स्तरावर जाणीव जागृती निर्माण करण्याची व सर्व संबंधितांनी विशेष काळजी घ्यावी.

सर्व संबंधित यंत्रणांनी राज्यातील सर्व नागरिकांना दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचे आवाहन करावे.

खाजगी आस्थापना व्यापारी प्रतिष्ठाने संस्था शासकीय व निमशास्त्रीय कार्यालय केंद्र शासन व राज्य शासनाची संबंधित कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक राहील याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.

शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था विद्यापीठे येथे या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांना अगोदरच विस्तृत माहिती देण्यात यावी सर्व सरकारी खाजगी शाळा महाविद्यालय विद्यापीठे सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सदर उपक्रमात सहभागी होणे अनिवार्य राहील.

राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण वर्गखोली किंवा हॉल या ठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शैक्षणिक संस्थांची पदाधिकारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग होणे आवश्यक आहे यासाठी शालेय शिक्षण विभाग व उच्च तंत्रज्ञान शिक्षण विभागाकडून सर्व संबंधितांना निर्देश द्यावे.

जिल्हाधिकारी यांनी या उपक्रमासाठी जिल्ह्याचे सनियंत्रण करावे तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय सहकारी तसेच खाजगी आस्थापना व्यापारी प्रतिष्ठाने संस्था यांना जिल्हाधिकारी स्तरावरून या वक्रमाबाबत अवगत करून समूह राष्ट्रगीत गायनासाठी जाहीर आवाहन करावे तसेच तालुकास्तरावर तहसीलदार यांनी या उपक्रमाचे सनियंत्रण करावे.

या कार्यक्रमाच्या जाणीव जागृती आणि प्रचार प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात मुद्रित साधने समाज माध्यमे खाजगी वाहिन्या रेडिओ एफ एम रेडिओ कम्युनिटी रेडिओ इत्यादी माध्यमांचा वापर करावा.

स्थानिक स्वराज्य संस्था महसूल यंत्रणा सर्व विद्यापीठे शाळा व महाविद्यालय पोलीस यंत्रणा अशा सर्व सामान्य नागरिकांच्या दैनंदिन बाबीशी निगडित यंत्रणांद्वारे समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी या उपक्रमाच्या जाणीव जागृती व प्रसार व प्रचार मध्ये सर्व प्रशासकीय विभागाचे मुख्य योगदान राहील याची सर्व संबंधितांनी खातरजमा करावी.


वरील प्रमाणे समूह राष्ट्रगीत गायन करण्यासाठी शासन परिपत्रकानुसार निर्देश देण्यात आले आहेत.





वरील महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.