"हर घर तिरंगा २०२६" अभियानांतर्गत राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत ध्वज संहितेनुसार मार्गदर्शक सूचना.
क्र. सांकासं/२५६ ३
दिनांक: 10 AUG 2026
१. सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन विभाग.
२. विभागीय आयुक्त, सर्व विभाग.
३. सर्व जिल्हाधिकारी.
४. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
५. सर्व आयुक्त, महानगरपालिका.
६. सर्व मुख्याधिकारी.
विषय : "हर घर तिरंगा २०२६" अभियानांतर्गत राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत ध्वज संहितेनुसार मार्गदर्शक सूचना.
महोदय / महोदया,
भारत सरकारच्या "हर घर तिरंगा २०२६" अभियानाच्या अनुषंगाने नागरिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांनी राष्ट्रध्वज फडकविताना भारतीय ध्वज संहितेतील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रध्वज फडकविण्याबाबतच्या खालील बाबी सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहेत.
१. अभियानाचा कालावधीः
"हर घर तिरंगा २०२६" अभियानाचा कालावधी दि. ९ ऑगस्ट २०२६ ते दि. १७ ऑगस्ट २०२६ असा आहे. या कालावधीत नागरिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांना अभियानाच्या कालावधीतील कोणत्याही दिवशी राष्ट्रध्वज फडकविता येईल. तथापि, राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा, सन्मान व पावित्र्य अबाधित राहील, याची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.
२. दिवस व रात्र राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत :
केंद्र शासनाने जुलै २०२२ मध्ये भारतीय ध्वज संहितेत केलेल्या सुधारणेनुसार, खुल्या जागेत किंवा नागरिकांच्या घरावर फडकविण्यात आलेला राष्ट्रध्वज दिवस तसेच रात्र अशा दोन्ही वेळेस फडकविता येतो.
३. राष्ट्रध्वज फडकविण्याच्या वेळेबाबत :
वरील तरतुदींनुसार, "हर घर तिरंगा २०२६" अभियानाच्या कालावधीत राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी विशिष्ट दिवस अथवा वेळेचे बंधन नाही. नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार अभियान कालावधीत कोणत्याही दिवशी व कोणत्याही वेळी राष्ट्रध्वज फडकविता येईल. मात्र, राष्ट्रध्वज फडकविताना त्याचा योग्य सन्मान राखणे तसेच भारतीय ध्वज संहितेतील सर्व नियम व तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे.
केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्देशाप्रमाणे कार्यवाहीबाबत विनंती करण्यात येत आहे.
आपला विश्वासू,
सहायक संचालक,
सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई
वंदे मातरम" गाताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रम/उपक्रमाबाबत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दिनांक 18 मार्च 2026 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
दिनांक : १८ मार्च, २०२६
प्रति,
१. जिल्हाधिकारी, सर्व जिल्हे.
२. आयुक्त, सर्व महानगर पालिका
३. पोलीस अधिक्षक/पोलीस आयुक्त, सर्व जिल्हे
४. मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषदा
५. तहसीलदार सर्व तालुके
६. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद
७. जिल्हा क्रीडा अधिकारी
८. जिल्हा शिक्षणाधिकारी
९. गटशिक्षण अधिकारी
१०. जिल्हा माहिती अधिकारी, सर्व जिल्हे.
११. निवासी उपजिल्हाधिकारी सर्व जिल्हाधिकारी कार्यालय.
विषयः - "वंदे मातरम" गाताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रम/उपक्रमाबाबत.
विषेश टप्पा-३ दिनांक २३/०३/२०२६ ते ३०/०३/२०२६ साजरा करण्याबाबत.
संदर्भ :- १) समंक्रमांकाचा दिनांक ३१.१०.२०२५ रोजीच शासन निर्णय
२) संचालक, संस्कृति मंत्रालय, नवी दिल्ली यांचे क्रमांक सीएम-२१ /१/२०२५-सी & एम, दिनांक ०१.११.२०२५ रोजीचे पत्र.
३) संचालक संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांचे दिनांक १४/०३/२०२६ चे पत्र.
महोदय,
उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन दिनांक १४/०३/२०२६ रोजीच्या पत्राचे कृपया अवलोकन करावे. (सुलभ संदर्भासाठी प्रत सोबत जोडली आहे.)
०२. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संचालक, सांस्कृतीक मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत दिनांक १६.०३.२०२५ रोजी दूरदृश्य (V.C) प्रणालीद्वारे दिनांक २३/०३/२०२६ ते ३०/०३/२०२६ या कालावधीमध्ये विशेष
टिप्पा साजरा करण्याबाबत सुचित करण्यात आले, त्याबाबतचे सादरीकरण सोबत जोडण्यात येत आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेतः-
भारत सरकार "वंदे मातरम्" या राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ ७ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. हे कार्यक्रम राष्ट्रीय अंमलबजावणी समितीच्या (NIC) कृती आराखड्यानुसार होत असून या कार्यक्रमाचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत.-
टप्पा १:७ ते १४ नोव्हेंबर २०२५
टप्पा २ः १९ ते २६ जानेवारी २०२६ (प्रजासत्ताक दिनाच्या आसपास)
विशेष टप्पा-३:२३ ते ३० मार्च २०२६ (शहीद दिनावर केंद्रिव)
टप्पा ४:७ ते १७ ऑगस्ट २०२६ (हर घर तिरंगा २०२६ आणि अगस्त क्रांती दिनासोबत)
टप्पा ५: १ ते ७ नोव्हेंबर २०२६ (समारोप आठवडा)
पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वीपणे पार पडल्यावर, केंद्रीय सचिव, संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली "शहीद दिवस" निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यास सुचित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने सदरचा टप्पा ३- दि. २३ ते दि. ३० मार्च २०२६ (शहीद दिनावर केंद्रित) च्या अमंलबजावणीकरता दिनांक १६ मार्च, २०२६ रोजी केंद्रशासनाकडून बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीकरीता PPT पुरविण्यात आली होती. या Pग मध्ये कार्यक्रमाच्या अंमलबजावणी विषयी सविस्तर सुचना देण्यात आल्या आहेत. (सुलभ संदर्भासाठी प्रत सोबत)
दिनांक २३ ते ३० मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या "शहीद दिनावर केंद्रित" कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवसांवर विशेष कार्यक्रम घेऊन लोकसहभाग वाढवणे आणि "वंदे मातरम्" या गीताचे ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करणे यावर भर दिला जात आहे.
राज्यभरात विविध ठिकाणी होणारे कार्यक्रम:-
"वंदे मातरम्" या राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षाच्या स्मरणार्थ प्रस्तावित विशेष टप्पा-३ मध्ये राज्यभरात विविध कार्यक्रम घ्यावयाचे असून, त्याबाबत केंद्र शासनाकडून जारी करण्यात आलेल्या महत्वाच्या सूचना खालील प्रमाणे आहेत:-
केंद्रशासनाने सूचित केल्याप्रमाणे दिनांक २३ ते ३० मार्च २०२६ या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
कार्यक्रम स्थळे, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये तसेच जिल्हा मुख्यालय, नगरपालिका आणि तहसील स्तरावर "बंदे मातरम्" पूर्ण गीताचे सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात यावे.
राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (Live Broadcast) राज्यांच्या समांतर कार्यक्रमांमध्ये समाविष्ट करण्यात यावे.
गटगायन, नृत्यरचना, संगीत नाट्य इत्यादी, ज्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचे जीवन, त्याग आणि "बंदे मातरम् ची भावना दर्शवली जाईल या करीता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावे.
लोकांचा सहभाग वाढावा या करीता परस्परसंवादी उपक्रम राबवावेत- जसे "वंदे मातरम्" आधारित द्वीट बॉल आणि सेल्फी बूथ, "VM Frames" चित्रपट स्पर्धा- घोषणात्मक चित्रपटाचे प्रदर्शन आणि स्पर्धेचा प्रचार.
शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांना पत्र लिहिण्यास प्रोत्साहन देणे, तसेच देशभक्ती आणि त्यागाच्या मूल्यांवर चिंतन करणे विद्यार्थी सहभाग उपक्रम केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून "शहीद दिन" या विषयावर तयार केलेले प्रदर्शन राज्य राजधानी, जिल्हा मुख्यालय, तसेच संग्रहालये, सांस्कृतिक केंद्रे, रेल्वे स्थानके, कॅम्पस आणि सरकारी इमारती येथे लावण्यात यावे. (हे प्रदर्शन https://www.vandemataram150.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल.)
"वंदे मातरम्" संबंधित संदेश, लघुपट किंवा व्हिज्युअल सामग्री सार्वजनिक ठिकाणी LED स्क्रीन किंवा डिजिटल (ऑडिओ/व्हिडिओ प्रसारण) माध्यमांद्वारे प्रसारित करावेत.
नागरिकांना "Sing Along" आणि "Selfie" फीचर्स वापरण्यास प्रोत्साहित करुन, वंदे मातरम् उपक्रमांशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ वेबसाइटवर अपलोड करावेत.
आपला,
(महेश किसन वाव्हळ)
उपसचिव, महाराष्ट्र शासन
सोबतः- वरीलप्रमाणे.
प्रत माहिती तथा आवश्यक कार्यवाहीसाठी सादर अग्रेषितः-
१ अपर मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
२ अपर मुख्य सचिव, गृह विभाग, मंत्रालय मुंबई.
३ प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
४ प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबइ
५ प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
६ प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
७ प्रधान सचिव, कौशल्य विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
(वरील सर्व प्रशासकीय विभागांना विनंती करण्यात येते की, सदर कार्यक्रम/उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी आपल्या स्तरावरुन संबंधितांना योग्य ते आदेश देण्यात यावेत)
८ मा. मंत्री (सांस्कृतिक कार्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
९ सचिव (सां.का.) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
१० उप सचिव (सां.का.४) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
११ संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय इमारत, पहिला मजला, एम. जी. रोड, मुंबई. १२ निवड नस्ती, सां.का.४
दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ (कार्तिक शुद्ध नवमी) ते दि. ०७ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीदरम्यान राज्यातील सर्व शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम् चे गायन होण्याबाबत व प्रदर्शनी लावण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी चा आदेश पुढीलप्रमाणे.
महोदय,
उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भाधीन पत्राची प्रत या पत्रासोबत पाठविण्यात येत आहे.
२. स्व. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित 'वंदे मातरम्' या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी तिथीनुसार म्हणजेच कार्तिक शुद्ध नवमीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील शाळांमधून रोज वंदे मातरम् या गीताची पहिली दोनच कडवी गायिली जातात, परंतु १५० वर्षपूर्तीचे औचित्य साधून दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी सर्व शाळांमधून संपूर्ण वंदे मातरम् चे गायन व्हावे व वंदे मातरम् गीताचा इतिहास सांगणारी प्रदर्शनी शाळांच्या दर्शनी भागात लावण्यात यावी अशी विनंती संदर्भाधीन पत्रान्वये करण्यात आलेली आहे. तसेच, दैनंदिन वापरातील ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, दि. ०७ नोव्हेंबर, २०२५ रोजी 'वंदे मातरम्' या गीताच्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत.
४. त्या अनुषंगाने, दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ ते दि. ०७ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीदरम्यान, राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम् चे गायन होण्याबाबत व वंदे मातरम् गीताचा इतिहास सांगणारी प्रदर्शनी शाळांच्या दर्शनी भागात लावण्याबाबत राज्यातील सर्व शाळांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे, ही विनंती.
सहपत्र- वरीलप्रमाणे
आपला,
Digitally signed by Aniruddha Avinash Kulkarni Date: 2025.10.27 11:21:05+05'30'
(अ.अ. कुलकणी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.








0 टिप्पण्या