निलंबन कालावधी बाबत महत्त्वाचा शासन निर्णय

 निलंबन कालावधी बाबत महत्वपूर्ण शासन निर्णय.


महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक नऊ जुलै 2019 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील 1979 निलंबित शासकीय सेवकांना 90 दिवसांच्या कालावधीत दोषारोप पत्र बजावणी बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

निलंबित शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनांची कारणे व त्यांचे गांभीर्य यानुसार त्यांच्या प्रकरणांचा आढावा घेण्यास गर्भात शासनाने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित केले आहेत श्री जयकुमार चौधरी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया सिविल क्रमांक 1912 2015 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत.


माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 16 फेब्रुवारी 2015 च्या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र सरकारचा दिनांक 23 ऑगस्ट 2016 रोजीचा कार्यालयीन आदेश सोबत जोडला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व केंद्र सरकारच्या कार्यालयीन आदेश पाहतात निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांना 90 दिवसाच्या मुदतीत दोषारोप पत्र बजावून त्यांना निलंबनाच्या आढाव्या संदर्भातील तरतुदी मध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.


निलंबित शासकीय सेवकांच्या ज्या प्रकरणी तीन महिन्यांच्या कालावधीत विभागीय चौकशी सुरू करून दोषारोप पत्र बजानात आले आहे अशा प्रकरणी निलंबन केल्यापासून तीन महिन्यात निलंबनाचा आढावा घेऊन निलंबन पुढे चालू ठेवायचे असल्यास त्याबाबत निर्णय सुस्पष्ट आदेशासह कारण मी माणसे सह सक्षम प्राधिकार्‍याच्या स्तरावर घेण्यात यावा.


निलंबित शासकीय सेवकांच्या ज्या प्रकरणी तीन महिन्यांच्या कालावधीत विभागीय चौकशी सुरू करून दोषारोप पत्र बजावण्यात आले आहे अशा प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाहता निलंबन समाप्त करण्याशिवाय अन्य पर्याय राहत नाही त्यामुळे निलंबित शासकीय सेवकांबाबत विभागीय चौकशीची कार्यवाही सुरू करून दोषारोप पत्र बजावण्याची कार्यवाही निलंबनापासून 90 दिवसाच्या आत काटेकोरपणे केली जाईल याची दक्षता खबरदारी घेण्यात यावी.


फौजदारी प्रकरणात विशेषतः लाचलुचपत प्रकरणी निलंबित शासकीय सेवकावर विभागीय चौकशी सुरू करून दोषारोप पत्र बजावणी बाबत आवश्यक तो अभिलेख लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित प्रशासकीय विभागास उपलब्ध करून देणे आवश्यक राहील.


वरील प्रमाणे निर्देश शासन आदेशानुसार देण्यात आले आहेत.




वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

4 Comments

  1. श्रीमान निलंबन काळात मुख्यालयात 2 वेळेस हजेरी लावण्या संबंधीत शासननिर्णय आहेका ।आणि 2 वेळेस हजेरी लावणे बंधन कारक आहे का कृपया मार्गदर्शनकरावे
    कपिल अवचार वाशिम पोलीस 9370990480

    ReplyDelete
  2. ९० दिवस झाले वर पुनर्स्थापित करण्याचे शासन निर्णय असेल तर पाठवावे

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.