शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्व साधारण नोंदवही म्हणजेच जनरल रजिस्टर नमुना सुधारित करणे बाबत - शासन निर्णय.
शाळा सोडल्याची प्रमाणपत्र हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक प्रमाणभूत महत्त्वाचा दस्तावेज आहे. विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणे जातीचा दाखला पारपत्र मिळवणे व इतर अनेक बाबींसाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. हे प्रमाणपत्र म्हणजे विद्यार्थ्यांची व शाळेची परिपूर्ण ओळख असते. सध्या माध्यमिक शाळा संहिता नियम 17 व परिशिष्ट चार मध्ये शाळा सोडल्याचा प्रमाणपत्राचा नमुना दिला आहे तसेच परिशिष्ट 18 मध्ये सर्वसाधारण नोंदवही चा नमुना म्हणजेच जनरल रजिस्टर चा नमुना दिलेला आहे. असे असले तरी शाळांमधून शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात एक वाक्य तर नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्था स्वयंसेवी संस्था शिक्षक संघटना पालक आणि विद्यार्थ्याकडून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि सर्वसाधारण नोंदवही जनरल स्टोर मधील नोंदी राज्यभर एक वाक्यता असणे बाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. तसेच सरल प्रणालीमार्फत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि लिखित करण्यासाठी काही बदल करणे आवश्यक होते.
शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात व त्या अनुषंगाने सर्वसाधारण नोंदवही मध्ये कोणत्या नोंदी आवश्यक आहे याबाबत पालकांकडून व शाळा मुख्याध्यापकांकडून सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. त्या सूचनांच्या आधारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या सर्व मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांसाठी शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात व सर्वसाधारण नोंदवहीत राज्यभर एक सारखेपणा असण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील बालकाच्या प्रवेशाबाबतच्या तरतुदी सरल प्रणाली मध्ये घ्यावयाच्या आवश्यक नोंदी तसेच पालक व शाळांचे मुख्याध्यापकाकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा साकल्याने विचार करून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व त्या अनुषंगाने सर्वसाधारण नोंदवही म्हणजेच जनरल रजिस्टर यातील नोंदी बाबत राज्यभर एकसारखेपणा आणण्यासाठी सोबत जोडलेल्या सुधारित नमुन्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. हा शासन निर्णय 2016-17 या वर्षापासून लागू राहील. सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना हा निर्णय लागू राहील. शाळा सर्व शाळा प्रमुखांनी आपापल्या शाळांमध्ये रजिस्टर व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यांची छपाई नवीन नमुन्याप्रमाणे करून घ्यावी. असे निर्देश सदर शासन निर्णया अन्वये सर्व शाळांमधील मुख्याध्यापक यांना देण्यात आले आहेत.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments